कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष?

धार्मिक कट्टरतावादी मुर्दाबाद ! सामान्य जनतेचा आपसातील बंधुभाव जिंदाबाद ! कोण कालवतंय सामान्य लोकांच्या मनात जाती-धर्माच्या नावाने विष ? कोण आहेत जे घेवून जाताहेत सामान्य तरुणांना इसीसच्या मार्गानं ? मित्रहो, नुकतंच तीन-चार दिवसांपूर्वी राजस्थान मधल्या राजसमंध मध्ये झालेल्या एका हत्येचा विडीओ सगळ्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला.विडीओ इतका हिंसक व बीभत्स आहे कि किमान संवेदना शिल्लक असलेला कुणीही खचितच पूर्ण पाहू शकेल. ज्याची हत्या झाली तो एक प्रवासी कामगार होता . त्याचा गुन्हा फक्त एवढाच कि तो एक गरीब मुस्लीम होता. नाव अफ्रजुल खान ,वय ५०. हत्येचा विडीओ बनवून सोशल मिडीयावर…

मानखुर्द (मुम्‍बई ) के एक मेहनतकश परिवार पर दीवाली की पहली रात टूटा दुखों का पहाड़

एक मेहनतकश परिवार अपनी पाई पाई जोड़कर दिवाली की तैयारी कर रहा था। बच्‍चे भी खुश थे व गलियों में चहकते घूम रहे थे। भूमिका की उम्र मात्र साढे चार साल है। वो गलियों में अपने दोस्‍तों के संग खेल रही थी। मानखुर्द के इस भीड़भाड़ वाले इलाके में संकरी गलियों में लगातार आते जाते वाहन हमेशा दुर्घटना का सिग्‍नल देते रहते हैं। यहां अक्‍सर छोटी-मोटी दुर्घटनाएं भी होती रहती हैं। पर भूमिका के लिए कल की दुर्घटना प्राणान्‍तक सिद्ध हुई। मुर्गी ढोने वाले एक टेम्‍पो के नीचे आने से…

देशभर वाढत्‍या दलित विरोधी अत्‍याचारा विरुद्ध सर्व कष्‍टकऱ्यांनो एक व्‍हा

सवर्णवादी वर्चस्‍वाच्‍या या घृणास्‍पद पाशवी रूपाचा सामना गरीब, कष्‍टकरी दलितांनाच करावा लागतो आहे. जरी जातीगत अपमानाला दलित नोकरशहा, नेता व इतर उच्‍चवर्गीय दलितांनाही सामोर जावं लागत असले,तरी जातीगत उत्‍पीडनाच्‍या अशा पाशवी घटना प्रामुख्‍याने कष्‍टकरी दलितांच्‍या विरोधातच घटत असतात. एकुण काय, जर आकडे गोळा केले तर दिसेल की जातीय अत्‍याचाराच्या १०० पैकी ९९ प्रकरणांमध्‍ये कष्‍टकरी गरीब दलितचाच बळी जातो.

भगतसिंहाच्या 110व्या जयंतीनिमित्त – शहीदांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा!

संघ परिवार कोणत्यातरी बहाण्याने सतत मुसलमानांना हिंदूंचा शत्रू म्हणून प्रस्तुत करत असतो. संघ परिवाराची राजकीय संघटना असलेल्या भाजपचे सरकार एकीकडे श्रीमंतांच्या फायद्यासाठी जनतेला मिळत असलेल्या सुविधांमध्ये कपात करत चालली आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या खोटारड्या मुद्यांवर जोर देत आहे जेणेकरून लोक आपापसात लढत रहावेत आणि यांच्या लूटीवर  प्रश्नच उपस्थित होऊ नये. तरूणांना या विरुद्ध उठावेच लागेल नाहीतर देश भयंकर विध्वंसाकडे चालू लागला आहे. जनतेला हे समजवावेच लागेल की त्यांच्या बरबादीचे कारण एखादा दुसरा देश किंवा धर्म नाही तर लूट आणि अन्यायावर टिकलेली आजची व्यवस्था आहे.

भगतसिंह – हिंदुस्‍तान सोशालिस्‍ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा

भारतीय भांडवलदारवर्ग आपल्‍याच जनतेचा विश्‍वासघात करून त्‍याच्‍या मोबदल्‍यात परकीय भांडवलदारांकडून  सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. म्‍हणूनच कष्‍टकरी वर्गाच्‍या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्‍या आहेत. त्‍यातूनच संपूर्ण स्‍वातंत्र्य मिळवण्‍याच्‍या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्‍ट करण्‍याच्‍या दिशेने यशस्‍वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्‍य आता तरुणांच्‍या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्‍टा सहन करण्‍याची त्‍यांची तयारी, त्‍यांचे निडर शौर्य आणि आत्‍मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्‍य त्‍यांच्‍या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्‍हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्‍थान दोन्‍ही आहेत. या आंदोलनाच्‍या मागे त्‍यांची प्रेरणा, त्‍यांचे बलिदान आणि त्‍यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्‍वातंत्र्याच्‍या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्‍तीच्‍या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”

भगतसिंह – बॉॅम्‍बचे तत्‍तवज्ञान

हिंसा या शब्दाचा अर्थ आहे, अन्यायासाठी केला गेलेला बलप्रयोग. परंतु क्रांतिकारकांचा तर हा मुळीच उद्देश नाही. दुसऱ्या बाजूला अहिंसेचा सामान्यतः जो अर्थ समजला जातो, तो म्हणजे आत्मिक शक्तीचा सिद्धांत. त्याचा उपयोग व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय अधिकार मिळवण्यासाठी केला जातो. आत्मक्लेशाद्वारे शेवटी आपल्या विरोधकाचे हृदय परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा ठेवली जाते.

भगतसिंह – बॉम्‍ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन

क्रांतीच्‍या ध्‍येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्‍या युद्धाच्‍या शेवटी, सर्वहारा वर्गाच्‍या सर्वाधिकारशाहीची स्‍थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्‍या ध्‍येयाची पूर्ती करण्‍याचा मार्ग प्रशस्‍त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्‍मजात अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्‍वातंत्र्य हा प्रत्‍येक माणसाचा जन्‍मसिद्ध अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्‍या सर्वंकष सत्‍तेची स्‍थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्‍ट आहे.

भगतसिंह – विद्यार्थी आणि राजकारण

विद्यार्थ्यांचे मुख्‍य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्‍हांला मान्‍य आहे आणि त्‍यांनी आपले पूर्ण लक्ष त्‍यावर केंद्रित करावे; पण देशाच्‍या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्‍याचे उपाय यांचा विचार करण्‍याची क्षमता वि‍कसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्‍त कारकूनी करण्‍यासाठी घेतले जाते, त्‍या शिक्षणालाही आम्‍ही निरुपयोगी मानतो. मग अशा शिक्षणाची गरजच काय? काही महाचतुर लोक असे म्‍हणतात, “मुला, तु राजकारण बघून जरूर शिक आणि विचार कर, पण प्रत्‍यक्ष राजकारणात कोणत्‍याही प्रकारचा सहभाग घेऊ नकोस. तू अधिक लायक बनलास तर तेच देशाच्‍या दृष्‍टीने फायद्याचे आहे.”

गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय – खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात

संघच नाही तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवण्यात पटाईत आहेत. उदाहरणार्थ, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी एक फोटो सामायिक (शेअर) केला होता ज्यात लोक तिरंग्याला आग लावत होते. खाली लिहिले होते की प्रजासत्ताक दिनी हैदराबाद मध्ये तिरंग्याला आग लावली जात आहे. आता गूगल इमेज सर्च (गुगलची  चित्र शोधणारी सोय)  एक नवीन सुविधा देत आहे ज्यात कोणताही फोटो टाकला की समजते की फोटो कधीचा आणि कुठला आहे. प्रतिक सिन्हांनी हे काम केले आणि गडकरींच्या खोटारडेपणाला समोर आणले. असे दिसून आले की हा फोटो हैदराबादचा नाही तर पाकिस्तानातील आहे जिथे एका बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनेनेने भारताच्या विरोधात तिरंगा जाळला होता. 

क्रांतिकारी लोकस्‍वराज्‍य अभियान : भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, तरुण, कष्टकरी करतील पूर्ण 

सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे हे कार्य मोजके धाडसी तरुण नाही करू शकत. हे कार्य व्यापक कष्टकरी जनतेची एकजूट आणि संघटनेशिवाय होऊ शकत नाही. सामान्य जनतेच्या भागीदारीशिवाय ते होऊ शकत नाही. या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही प्रामुख्याने तरुणांना करीत आहोत. इतिहासात अवरोधाचा बर्फ नेहमीच तरुणांच्या रक्तांच्या उष्णतेने वितळला आहे.