निंबोडी दुर्घटनेतील प्रभावित विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे निदर्शने करण्यात आली.हा एक अपघात नसून प्रशासकीय हत्या असल्याचे यावेळी मांडण्यात आले.ही घटना व या पूर्वीच्या बिहार मधील मध्यान्ह भोजन विषबाधा,कुभकोणम, केरळमधील जळीतकांड, दिल्लीतील सरकारी शाळाची दुरावस्था,देशातल्या कुपोषणात मरणारी ५०००बालके यांच्या संबंधातून न पहाता, केवळ दुर्दैव, अपघात म्हणून पहाणं म्हणजे अजून एका घटनेची वाट बघणं होय.सरकारची असणारी उदासीनता, दुर्लक्ष, अनास्था व बेजबाबदारपणा अशा घटनांना आवतन देत असतो.ओढा किंवा नदी जवळ शाळा असणं हे कारण कधीच नसतं, समुद्रात पुलं बांधता येण्याच्या जमान्यात हे हास्यास्पद कारणं देता येत…
निंबोडी जिल्हा.प.शाळेच छत कोसळून ३ मुलांचा मृत्यू व ३०मुलं जखमी.
अनेक मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमधली परिस्थिती सांगितली.अक्रोश नी अक्रोश आहे.गरीबांची मुलं कुठंच सुरक्षित नाहीत,हेच खरं आहे.गोरखपुर,निठारी मधील घटना काय किंवा निंबोडी शाळा काय ? गरीबांची मुलं इथल्या व्यवस्थेला असून नसून सारखीच.खरंतर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करुन त्या तात्काळ खाली करणं, दुरुस्त करनं किंवा नुतनीकरण करण्याची प्राथमिकता व गंभीर जबाबदारी शासनप्रशासनाची आहे,पण ही जबाबदारी कुणाची व याबाबत काय पावले उचलली जाताहेत या बाबतचा करंटेपणा सर्वांना माहीत आहे.त्यात झेपी शाळा अगोदरच नकोश्या ,शासनाला भार मग त्याची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी विकास असल्या गोष्टींसाठी कुणाच्या गावीही नसतात.सगळं काही कागदावर आणि वरवर केलं जातं…
भगत सिंह – धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम
प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमकुवत बनवणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच नष्ट करणे आहे.
नौजवान भारत सभा , अहमदनगर युनिट द्वारे गोरखपूर मधिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेज मधील बालकांच्या सरकारी हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी सभा घेण्यात आली.
अहमदनगर बस स्थानकात सदर निषेध सभा घेऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले.योगी-मोदी मुर्दाबाद,या हत्येला जबाबदार कोण योगी सरकार,योगी सरकार , गोरखपूर मधल्या ७० मुलांच्या मृत्यला जबाबदार योगी सरकारचा धिक्कार असो देशभक्तीची नाटकबाजी,गोप्रेमाची ढोंगबाजी,ही जनतेशी दगलबाजी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
बीआरडी मेडिकल कॉलेज हत्याकाण्ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्ता द्वारा मुम्बई के दादर स्टेशन पर प्रदर्शन
गोरखपुर के बीआरडी मेडिकल कॉलेज में एक हफ्ते पहले हुए मासुमों के सरकारी हत्याकाण्ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्ता द्वारा मुम्बई के दादर स्टेशन पर प्रदर्शन किया गया। प्रदर्शन के दौरान सैंकड़ों की संख्या में मराठी व हिन्दी पर्चे बांटे गये। 70 बच्चों की मौत हुई, कौन है इसका जिम्मेदार, योगी सरकार योगी सरकार : शिक्षा, स्वास्थ्य सबका अधिकार, बन्द करो इसका व्यापार जैसे नारे लगाते हुए नौजवान भारत सभा के कार्यकर्ताओं ने लोगों के बीच इस घटना की असलियत रखी व स्वास्थ्य के…
कष्टकरी सामान्य जनतेच्या आरोग्याचा पंचनामा आणि मोदी-योगीच्या जुमलेबाजीचं नग्न वास्तव
खरंतरं संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच आज आजारी आहे. भारतीय राज्यघटना भाग ३ कलम २१ मध्ये ‘जीवितांच्या रक्षणाचा अधिकार’ तर देते, पण जगण्यासाठीच्या पूर्वअटी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षणाच्या जबाबदारीतून अंग बाहेर काढत आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या(पीपीपी) नावाखाली आता आरोग्यसेवेच खाजगीकरण होतंय. परीणामी आरोग्य सेवा महाग होणं आलंच. एका बाजूला १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती केंद्रित झाल्याच अहवाल आहे, अन्न धान्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या वल्गना केल्या जाताहेत, तर दुसऱ्या बाजूला दिवसाला ५००० मुलं कुपोषणामूळं व भुकेमूळं मरताहेत. भांडवलशाहीत प्रत्येक गोष्ट पैशाच्या बाजारात तोलली जाते व कामगार-कष्टकरी सामान्य गरीब जनतेच्या जीवांची पर्वा या व्यवस्थेला नक्कीच नाही.
जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे
आज भारत असंख्य जातींमध्ये वाटला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांच्या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्या होते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्यांवरून समजते की २००७ पासुन उत्तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्या २५ आत्महत्यापैकी २३ आत्महत्या या दलित विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
भगत सिंह – अस्पृश्यता समस्या
तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्हान द्या. मग तुम्ही पाहाल की तुम्हांला अधिकार देण्याला नकार देण्याची भाषा करण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोकरशाहीच्या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे.
भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, श्रमिक-तरुण करतील पूर्ण
भगतसिंहाच स्वप्न फक्त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं मर्यादीत नव्हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्यवस्थाच इतिहासाच्या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच भगतसिंह म्हणाला होता की ‘आम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या शोषणाच्या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्यांच्या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्यांचा उद्देश ‘लुट करण्याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्यामुळे यांच्या लढ्याचा अंत कुठल्या ना कुठल्या सांमजस्यात, तडजोडीच्या रुपांत होईल’.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस–आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय!
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (8 मार्च) 107 व्या दिनानिमित्त आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय! ऐकी करुन लढायच हाय रं हाय!! बहिणींनो ! साथीनो! आपण एका बिघडलेल्या वातावरणात 107 वा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहोत. हा दिवस स्त्रीयांची समानता, त्यांची मुक्ती आणि त्यांच्या अधिकारांसाठी केलेल्या दिमाखदार संघर्षाची साक्ष देतो. या 10 मार्चला आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या अशा शिक्षिका होत्या ज्यांनी जातीव्यवस्थे बरोबरच स्त्रियांच्या गुलामी विरोधातही संघर्ष केला. आज तर स्त्रियांची सामाजिक स्थिती अजूनच बिघडत चालली आहे. स्त्रीविरोधी अपराधांचा आलेख सतत वाढतच चाललाय. देशांतील कुठल्या…
