पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे! पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे. पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहऱ्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे. संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत. त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. धर्माच्या नावाने होणाऱ्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे. भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे. त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे. पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी, तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे. यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत, पण बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत. म्हणून मित्रांनो, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या; धर्मवादी फॅशिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका. काश्मीरी आणि गरीब, स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा, कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे.

नौजवान भारत सभा तर्फे सुरू होत आहे शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब !

 आम्हा तरुणांना निरोगी शरीर आणि स्वस्थ मन असण्याचा हक्क नाहीये का? सगळीकडे असे म्हटल्या जाते की भविष्य तरुणांच्या हातात आहे, पण आज जेव्हा आपण आपल्या आजुबाजूची परिस्थिती पाहतो तर दिसते की आपले तरुण आधीपेक्षा जास्त निराश, गोंधळलेले आणि एकाकी झाले आहेत. आज आपण एका सडक्या समाजात राहतोय. सार्वजनिक शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांवर, विशेषतः कष्टकरी जनतेतून आलेल्या तरुणांवर आज खूप वाईट परिणाम झाला आहे. शिक्षण अर्ध्यातच लवकर सोडणे आणि नोकरी करणे आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. ही ढासळत चाललेली सडकी समाजव्यवस्था तरुणांचे भविष्य गोंधळात टाकत आहे. हा…

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 93 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!

बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

“अग्निपथ” मुद्द्यावर नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना यांचे संयुक्त वक्तव्य: फॅसिस्ट मोदी सरकारचे नवीन फर्मान : आता ठेकेदारीने करावी लागेल “राष्ट्र-सेवा”

‘अग्निपथ’ हा लाखो विद्यार्थी आणि तरुणांच्या रोजगाराच्या हक्कावरचा हल्ला आहे, हे हुकूमशाही फर्मान तात्काळ रद्द करा! ‘अग्निपथ’ च्या विरोधातील युवकांचे बंड सामान्यपणे बेरोजगारीच्या विरोधातील युवकांच्या बंडाचा भाग आहे. बंधू-भगिनी आणि मित्र-मैत्रिणींनो! दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार असलेल्या नोकऱ्याही हिसकावून घेत आहे. विविध विभागांतील पक्क्या नोकऱ्या समाप्त करून कंत्राटी व करारावर आधारित नोकऱ्या सुरू केल्या जात आहेत. आता मोदी सरकारने ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत देशाच्या लष्कर आणि निमलष्करी दलांच्या कंत्राटीकरणाची योजना सादर केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या मुला-मुलींच्या रोजगारावर थेट आघात होणार आहे. पहिली चार वर्षे सैन्यात…

अमर शहीद करतार सिंह सराभा जिंदाबाद!

साथींनो! एकोणवीस वर्षाच्या वयात शहीद होणारे गदर पार्टीचे नायक करतार सिंह सराभा यांचा 24 मे हा जन्मदिवस आहे. करतार सिंह सराभा यांचा जन्म 24 मे 1896 रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात झाला होता. लुधियाना येथून मॅट्रिक पास केल्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे गेले होते. अमेरिकेमध्ये लाला लाला हरदयाल, मुहम्मद बरकतउल्ला, सोहन सिंह भकना इत्यादी देशप्रेमींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘हिंदी असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ नावाच्या पार्टीची स्थापना केली होती. पार्टीद्वारे ‘हिंदुस्तान गदर’ नावाचे वृत्तपत्र काढले जात होते, त्यामुळे पार्टी गदर पार्टीच्या नावाने ओळखली जाऊ लागली.…

शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…

अमर शहीद रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसा (11जून) निमित्त

काकोरी च्या वीरांचा परिचय – विद्रोही नावाने शहीद भगतसिंह यांचा लेख (9 ऑगस्ट, 1925 ला शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि त्यांच्या इतर कांतिकारी साथींनी मिळून क्रांतिकारी पार्टी साठी धन जमा करण्याच्या उद्देशाने लखनौ नजिक काकोरी जवळ रेल्वे थांबवून सरकारी खजिना लुटला. यानंतर चंद्रशेखर आझाद यांना सोडून बाकी सगळे क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागले. भगतसिंह पण तेव्हा कानपूर येथे निवासी असताना हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टीमध्ये भरती झालेले होते. ‘विद्रोही’ नावाने मे, 1927 ला भगतसिंह यांनी ‘काकोरी च्या वीरांशी परिचय’ मथळ्याचा लेख पंजाबीत प्रकाशित केला. तो लेख प्रकाशित होताच भगतसिंह यांना अटक झाली. खाटेवर…