निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध! गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या ! फॅसिस्ट गुंडागर्दी नाही चालणार! आज 9 फेब्रुवारी 2024 रोजी “निर्भय बनो”च्या कार्यक्रमात भाषण द्यायला येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हला केला. या अगोदर पुण्यामध्ये “निर्भय बनो”ची सभा होऊ देणार नाही अशी धमकी भाजप पुणे शहर अध्यक्षांनी दिली होती. पोलिसांना याची सगळी कल्पना असतानाही हा हल्ला झाला. भाजपचे गुंडे पूर्ण तयारीनिशी काठ्या, मोठे दगड घेऊन आले होते आणि त्यांनी हल्ला केला.अजूनसुद्धा भाजपाच्या गुंडांना अटक करण्यात आलेली नाहीये. एकीकडे शांततेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनांना पोलिस परवानगी…
Category: फासीवाद
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!
बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.
देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन! – ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!
जनतेचे अधिकार हिसकावण्याचा, विरोधकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा आणि जनतेचे दमन करण्याचा भाजपचा अजेंडा इथेच थांबणार नाही. उद्या येन-केन प्रकारेण राजकीय विरोधकांना सुद्धा नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचल्या जाऊ शकते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. जनतेला शिक्षण-रोजगार-आरोग्य यासारख्या त्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर संघटित करणाऱ्यांना त्यांचे सर्व कायदेशीर अधिकार हिसकावून तुरुंगात किंवा डिटेन्शन सेंटर (स्थानबद्ध केंद्र) मध्ये टाकून दिल्या जाईल! जनतेचा संघटित विरोधच संघींच्या समाजविघातक कारवायांचे उत्तर असू शकतो, तसेच सर्व तऱ्हेच्या जनविरोधी धोरणांचा विरोधच आपण जिवंत असल्याचा पुरावा होऊ शकतो.
झुंजार जनएकजूट अभियान – गरीबी, शिक्षणाचा अभाव ,बेरोजगारीच्या कारणांना ओळखा!
शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू!
कोणीच वाचणार नाही
काय नोटबंदीमुळे मृत्यू होताना जात धर्म विचारला होता काय? जीएसटी लागू झाल्यानंतर जेवढे उद्योग बरबाद झाले आणि त्यामुळे कितीतरी लोक मजबुर होऊन रस्त्यावर आलेत त्यात किती हिंदू होते? मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात जी हलाखी पसरली आहे तीने हिंदू-मुस्लिम भेद नाही केला! परंतु जेव्हा मत घ्यायची वेळ येते तेव्हा हिंदू-मुस्लिम विभाजन पद्धतशीरपणे केले जाते.
गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय – खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात
भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, श्रमिक-तरुण करतील पूर्ण
भगतसिंहाच स्वप्न फक्त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं मर्यादीत नव्हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्यवस्थाच इतिहासाच्या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच भगतसिंह म्हणाला होता की ‘आम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या शोषणाच्या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्यांच्या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्यांचा उद्देश ‘लुट करण्याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्यामुळे यांच्या लढ्याचा अंत कुठल्या ना कुठल्या सांमजस्यात, तडजोडीच्या रुपांत होईल’.
क्रांतीशिवाय जातीचे उच्चाटन संभव नाही! जातिविरोधी संघर्षाशिवाय क्रांती संभव नाही!
उठा, आपली शक्ती ओळखा! संघटित व्हा! स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. स्वातंत्र्यासाठी स्वाधीनतेची इच्छा बाळगणाऱ्यांना प्रयत्न करावे लागतात. म्हणच आहे, लातों के भूत बातों से नही मानते. म्हणजेच, संघटित होऊन आपल्या पायांवर उभे राहून पूर्ण समाजाला आव्हान द्या. आणि पाहा, कोणीही तुम्हांला तुमचे अधिकार देण्यास नकार देण्याचे धाडस करणार नाही. तुम्ही इतरांचा आहार बनू नका. दुसऱ्याच्या तोंडाकडे आशेने पाहू नका.
ओळखा, कोण खरा देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही?
आज आपण हिटलरच्या अनुयायांचे खरे रूप ओळखले नाही आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही, तर उद्या फार उशीर झालेला असेल. देशातील महागाई, बेरोजगारी आणि गरिबीची भीषण परिस्थिती पाहता, तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला न आलेल्या आपल्यापैकी प्रत्येकालाच आज ना उद्या आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा लागेल. अशा वेळी प्रत्येकालाच हे सरकार आणि त्याच्या संरक्षणाखाली काम करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या देशद्रोही ठरवतील. विचार करावाच लागेल, आवाज उठवावाच लागेल. नाहीतर, फार उशीर झालेला असेल.
सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा
६७ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ज्यावेळी देशात आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी,भूकबळी आणि गरीबी वाढली त्याच वेळी दंगे कां भडकले? सांप्रदायिक शक्ती नेहमी तेव्हाच कां सक्रिय होतात ज्यावेळी देशातील जनतेमध्ये व्यवस्थेच्या विरोधात चीड निर्माण होते? नेहमी मंदिर आणि मशिदीचा आणि धर्मांतरणाचा मुद्दा तेव्हाच कां वर काढला जातो ज्यावेळी देशात एक राजकीय संकट निर्माण होते आणि व्यवस्था धोक्यात येते? मित्रांनो, जरा विचार करा! ६७ वर्षांमध्ये झालेल्या दंग्यांतून कधी आपल्याला काही मिळाले आहे का?गरीब कष्टकरी जनतेसाठी मंदिर मशिद बनणे वा न बनणे हा खरा मुद्दा आहे की महागाई, गरीबी आणि बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे? मित्रांनो, आपण किती काळ या निवडणुकांतील मदाऱ्यांना आपल्याला धर्म आणि जातीच्या नावाने गंडवण्याची संधी देत राहणार?