निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!
गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या !
फॅसिस्ट गुंडागर्दी नाही चालणार!

जेव्हापासून या देशात फॅसिस्ट सरकार सत्तेमध्ये आले आहे तेव्हापासून विरोधी विचारांचा प्रत्येक आवाज या देशात दाबून टाकण्यात येत आहे. फक्त पुण्यामध्ये गेल्या दोन आठवड्यातली ही तिसरी घटना आहे . नुकतेच एफ.टी.आय.आय. आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. देशातील विद्यार्थ्यांवर, पत्रकारांवर, धार्मिक अल्पसंख्यांकांवर अशा प्रकारचे हल्ले होत आहेत. सामान्य जनतेच्या लोकशाही नागरी अधिकारांवर हिंदुत्ववादी हल्ले चढवत आहेत. अशा वेळेस हे समजणे गरजेचे आहे की निवडणुकांच्या मार्गे फॅसिझमला हरवणे कधीही शक्य होणार नाही. फॅसिझमला फक्त आणि फक्त सामान्य जनतेची वर्गीय एकजूटच उत्तर देऊ शकते.
हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस प्रशासनासोबत मिळून सुरू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा नौजवान भारत सभा तीव्र निषेध करते.