पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे!

पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण? पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बहाणा करून देशाला धर्मवादाच्या आगीत झोकून देण्याचा संघपरिवाराचा डाव हाणून पाडा! साथींनो, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. नौजवान भारत सभा या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते. या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांचे नागरिक आणि एक परदेशी नागरिकही ठार झाला आहे. हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाच्या अतिरेकी गटाने घेतली आहे, जो पाकिस्तानी अतिरेकी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे, असे मानले जाते. हल्ल्यादरम्यान…

पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे! पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे. पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहऱ्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे. संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत. त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. धर्माच्या नावाने होणाऱ्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे. भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे. त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे. पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी, तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे. यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत, पण बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत. म्हणून मित्रांनो, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या; धर्मवादी फॅशिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका. काश्मीरी आणि गरीब, स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा, कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे.