नौजवान भारत सभा : जाहीरनामा आणि घटना
प्रास्ताविक
‘नौजवान भारत सभा‘ नावाच्या एका क्रांतिकारक युवक संघटनेचा जाहीरनामा आणि घटना आम्ही या देशातील क्रांतिकारी आणि पुरोगामी युवकांसमोर प्रस्तुत करत आहोत. या संघटनेचे उद्दिष्ट देशातील विखुरलेल्या युवक आंदोलनाला एका योग्य दिशेच्या समजदारी आधारावर एकजूट करणे आणि व्यापक जनसमुदायाच्या साम्राज्यवाद व भांडवलशाही विरोधी संघर्षाचे एक अविभाज्य अंग म्हणून पुढे नेणे आहे.
‘नौजवान भारत सभे‘ची बांधणी 2005 साली करण्यात आली व त्याच वेळी जाहीरनाम्याचा मसुदा आणि घटनेचा मसुदा देशातील युवकांसमोर सादर करण्यात आला. 2005 च्या संमेलनानंतर संयोजन समितीच्या नेतृत्वात संघटनेने काम केले. 26, 27, 28 सप्टेंबर 2014 रोजी राजधानी दिल्लीमध्ये शहीद भगतसिंह यांच्या एकशे सातव्या जयंतीच्या निमित्ताने संघटनेचे पहिले राष्ट्रीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात देशभरातून निवडून आलेल्या दीडशे प्रतिनिधींनी भाग घेतला होता. संमेलनाचे पहिले दोन दिवस प्रतिनिधी सत्रांचे आयोजन करण्यात आले, तसेच तिसऱ्या दिवशी खुले सत्र आयोजित करण्यात आले. देश-विदेशातून विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवींनी पाठवलेले अभिनंदनपर संदेश वाचले गेले. प्रतिनिधी सत्रांच्या दरम्यान पहिल्या दिवशी संयोजन समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षांतील कार्याचा अहवाल प्रस्तुत करण्यात आला. नंतर संघटनेचा जाहीरनामा आणि घटना प्रस्तावित करण्यात आली, त्यांच्या विविध अंगांवर चर्चा झाल्या आणि त्यानंतर जाहीरनामा आणि घटना मंजूर करण्यात आली. पुढील दिवशी निवडणुकीच्या माध्यमातून 17 सदस्य हे केंद्रीय परिषदेच्या रूपाने, संघटनेचे केंद्रीय नेतृत्व म्हणून निवडले गेले. नंतर केंद्रीय परिषदेने 7 सदस्यांची केंद्रीय कार्यकारणीच्या स्वरूपात निवड केली; तसेच कार्यकारणीने 4 पदाधिकाऱ्यांची निवड केली. संमेलना दरम्यान विविध विषयांवर एकूण 13 प्रस्ताव प्रस्तुत करण्यात आले, तसेच त्यांना सर्व संमतीने स्विकारण्यात आले. या शिवाय सदनातून नौभासच्या अनेक सदस्यांनी विविध विषयांवर आपले वक्तव्य ठेवले. अशाप्रकारे संघटनेने आपले पहिले राष्ट्रीय संमेलन सफलतापूर्वक संपन्न केले.
आता संघटनेचे संमेलन संपन्न झाले असल्या कारणाने, संघटनेच्या केंद्रीय परिषदेच्या नेतृत्वात, आपल्या संमत घोषणापत्र आणि घटनेच्या आधारावर संघटना काम करेल.
केंद्रीय परिषद
नौजवान भारत सभा
मार्च 2015
नौजवान भारत सभा जाहीरनामा (मॅनिफेस्टो)
“जेव्हा कोंडीची स्थिती लोकांना आपल्या तावडीत जखडते, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाला लोक घाबरू लागतात. या जडतेला आणि निष्क्रियतेला तोडण्यासाठी एक क्रांतिकारी चैतन्य निर्माण करण्याची गरज असते, नाहीतर पतन आणि बरबादीचे वातावरण पसरते. लोकांना भरकटवणाऱ्या प्रतिक्रियावादी शक्ती जनतेला चूकीच्या रस्त्यावर घेऊन जाण्यात सफल होतात. माणसाची प्रगती यामुळे थांबते आणि त्यामध्ये बाधा निर्माण होते. या परिस्थितीला बदलण्यासाठी आवश्यक आहे की क्रांतीचे चैतन्य ताजे केले जावे जेणेकरून मानवतेच्या आत्म्यामध्ये खळबळ निर्माण होईल.”
– शहीद भगतसिंह
आज आपण एका अशा युगात जगत आहोत जेव्हा औदासिन्याने लोकांना आपल्या तावडीत जखडले आहे. हा एक अभूतपूर्व काळ आहे जेव्हा समाजाच्या सर्व नियंत्रणकारी शिखरांवर रूढीवादी आणि प्रतिक्रियावादी शक्ती मजबुतीने एकत्र झाल्या आहेत. क्रांतीच्या लाटेवर प्रतीक्रांतीची लाट सतत शिरजोर झालेली आहे.
अशा कठीण ऐतिहासिक वेळी नौजवान भारत सभा मानवतेच्या आत्म्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण करण्यासाठी आणि क्रांतीचे चैतन्य पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातील सर्व शूर, स्वाभिमानी, जागरूक, न्यायप्रिय आणि पुरोगामी तरुणांना आवाहन करत आहे. आमचे हे संबोधन त्या तरुणांसाठी नाही जे नशिबाचे आणि परिस्थितीचे रडगाणे गात शोषक-शासकांच्या परजीवी जमातींद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या अत्याचाराचा मार झेलण्यासाठी पाठ वाकवून उभे असतात. आम्ही त्या तरुणांची अजिबात बाजू घेत नाही ज्यांचा “स्वर्ग” याच जुलमी व्यवस्थेमध्ये सुरक्षित आहे किंवा जे आपला स्वर्ग प्राप्त करण्यासाठी रक्ताच्या दलदली आणि अन्यायाचे खाचखळगे डोळे झाकून पार करण्यासाठी तयार आहेत. आम्ही सामान्य जनतेच्या त्या शूर मुला-मुलींना आवाहन करत आहोत, ज्यांना रक्त आणि अश्रूंच्या सागरामध्ये ऐश्वर्याची बेटं आणि विलासितेच्या मनोऱ्यांचे अस्तित्व स्वीकार नाही, जे हत्यारांच्या ढिगावर बसलेल्या भांडवली लुटखोरांच्या विजयाला अंतिम मानत नाहीत आणि जे इतिहासाच्या अंतामध्ये विश्वास ठेवत नाहीत. आम्ही त्या सर्वांना आवाहन करत आहोत जे खऱ्या अर्थाने तरुण आहेत, जे अंगणातील कोंबडीसारख्या उड्या मारण्यापेक्षा, वादळांमध्ये गर्विष्ठ गरुडाप्रमाणे उड्डाण करण्याचे साहस ठेवतात, ज्यांनी स्वप्न बघण्याची सवय सोडलेली नाही आणि जे नव्या दमाने मुक्तीची योजना बनवण्यासाठी आणि तिला अंमलात आणण्यासाठी तयार आहेत.
नौजवान भारत सभेचे नाव स्वतःच, एका महान क्रांतिकारी वारशाला पुर्नजागृत करण्याच्या आणि पुढे घेऊन जाण्याच्या, संकल्पाचे प्रतीक आहे. महान युवा विचारवंत क्रांतिकारी भगतसिंह यांनी वसाहतिक गुलामी विरोधात भारताच्या क्रांतिकारी आंदोलनाला नवीन वैचारिक आधार देण्यासाठी आणि नव्याने सुरुवातीपासून संघटित करण्यासाठी आपल्या साथीदारांसोबत मिळून एक नवीन सुरुवात केली, तेव्हा त्यांचे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल होते 1926 साली नौजवान भारत सभेच्या झेंड्याखाली तरुणांना संघटित करणे. याच्या दोन वर्षांनंतर भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ नावाने नवीन क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आणि स्पष्ट शब्दांमध्ये घोषणा केली की वसाहतिक सत्तेला उखडून फेकल्यानंतर भारतातील सामान्य जनतेला भांडवलशाही समाप्त करण्यासाठी आणि समाजवादाची स्थापना करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. फक्त तेव्हाच भारतीय जनतेची मुक्ती वास्तविक आणि कायमस्वरूपी होऊ शकेल. आज हे सत्य सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे की देशी विदेशी भांडवलाच्या पकडीला तोडूनच बहुसंख्यांक कष्टकरी जनता आणि सामान्य मध्यमवर्गीय लोक आपली वास्तविक मुक्ती साध्य करू शकतात. आपल्याकडे आज एकच पर्याय आहे आणि तो आहे भांडवलाच्या सत्तेविरुद्ध एका नव्या जनमुक्ती संघर्षाची सुरुवात… भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या महान क्रांतिकारी वारशापासून प्रेरणा आणि शिकवण घेत, आम्ही पुन्हा एकदा नौजवान भारत सभेच्या झेंड्याखाली सर्व पुरोगामी आणि शूर, युवक-स्त्रिया व पुरुषांना, संघटित करण्याच्या एका नव्या सुरुवातीचा संकल्प घेत आहोत. या संघटनेला एका नव्या क्रांतीच्या तरुण शिपायांच्या भरती आणि शिक्षण-प्रशिक्षणाचे केंद्र बनवणे आमचे सर्वोपरी उद्दिष्ट आहे.
शहीद भगतसिंह यांनी देशाचे राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होण्याच्या बरेच अगोदरच, गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकात, हे स्पष्ट केले होते की काँग्रेस देशी नफेखोरांचा पक्ष आहे जे साम्राज्यवादाशी सौदेबाजी करत स्वतःसाठी सत्ता मिळवू इच्छितात. क्रांतिकारकांसाठी मात्र स्वातंत्र्याचा अर्थ, गोऱ्या चामडीच्या जागी काळ्या चामडीचे शासन स्थापन होणे नाही, किंवा लॉर्ड रीडिंग आणि लॉर्ड इरवीन च्या जागी पुरुषोत्तमदास ठाकुरांचे सत्तारूढ होणेही नाही. त्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या 92 टक्के लोकांच्या स्वातंत्र्याच्या रूपात, विदेशी प्रभुत्वासोबतच देशी-विदेशी प्रत्येक प्रकारच्या भांडवलाद्वारे जनतेच्या होणाऱ्या शोषणाच्या समाप्तीच्या रूपात केली होती आणि कष्टकरी सामान्य जनतेच्या सत्तेची स्थापना, तसेच एका समानतापूर्ण सामाजिक संरचनेच्या निर्माणाला क्रांतीचे उद्दिष्ट सांगितले होते. त्यांनी 1930 मध्येच ही भविष्यवाणी केली होती की काँग्रेसच्या लढाईचा अंत कोणत्या ना कोणत्या तडजोडीच्या रूपातच होईल आणि तुरुंगाच्या कोठडीतून संदेश पाठवून तरुणांना आवाहन केले होते की त्यांना क्रांतीचा संदेश घेऊन कारखाने आणि शेतांपर्यंत जावे लागेल. आज आपल्या चहू बाजूला अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार-लूट-पाशविकता आणि निराशेचा घुसमटवणारा आणि दुर्गंधी असलेला अंधार पसरलेला आहे, त्यामध्ये भगतसिंहाचा संदेश सामान्य जनतेच्या शूर, मुक्तीप्रिय मुला-मुलींसाठी क्षितिजावर जळत असलेल्या एका मशाली समान आहे, भविष्याचा रस्ता प्रकाशमान करणाऱ्या एका प्रकाश स्तंभासमान आहे.
स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे सगळे शाब्दिक खेळ आज उघडे पडले आहेत. ज्या स्वातंत्र्याला प्रसिद्ध कवी फैज यांनी ‘दाग-दाग उजाला’ म्हटले होते ते जणू आज भाद्रपदातील काळी अमावस्या बनले आहेत. सामान्य जनतेचे स्वप्न छिन्नविच्छिन्न झाले आहे व भगतसिंहाची भविष्यवाणी दशकांअगोदरच शब्दशः खरी सिद्ध झाली होती. आता या देशातील तरुणांसमोर उभे आहे एक ज्वलंत ऐतिहासिक प्रश्नचिन्ह—शासक वर्गाचे फसवे दावे, भ्रम, भरकटवणे, काही सुरुवातीच्या प्रयत्नांचे अपयश किंवा पराजयाने फक्त घाबरून जाणे किंवा उदास होण्याची प्रवृत्ती.शेवटी कधी आपण व्यक्तिवाद आणि स्वार्थाच्या प्रवृत्तींपासून मुक्त होऊन भगतसिंहाच्या आवाहनावर लक्ष देणार? कुंठीतावस्थेत असलेला इतिहास तरुणांच्या गरम रक्त इंधनानेच पुन्हा एकदा गतिमान होऊ शकतो. सामान्य जनतेच्या विचारसंपन्न, साहसी आणि प्रत्येक बलिदानासाठी तयार असलेल्या मुला-मुलींना समोर यावेच लागेल आणि क्रांतीचा संदेश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आसामपासून कच्छच्या खाडीपर्यंत, घराघरापर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा लागेल. त्यांना फक्त एकजूट होऊन आपल्या प्रत्येक न्यायसंगत अधिकारासाठी फक्त लढावेच लागणार नाही तर समाजात चालू असलेल्या न्याय आणि अधिकाराच्या प्रत्येक संघर्षात सामील व्हावे लागेल. आपली हाडं गाळून तळाच्या अंधाऱ्या नरकात जगत समाजाचा पाया निर्माण करणाऱ्या कष्टकऱ्यांची त्यांना मनापासून सेवा तर करावीच लागेल सोबत त्यांचे जीवन आणि संघर्षासोबत मिसळून जावे लागेल. त्यांना प्रत्येक प्रकारच्या सामाजिक प्रथा-कर्मकांड, दैववाद ,अंधश्रद्धा आणि जाती-धर्माच्या आत्मघाती झगड्यांपासून मुक्तीसाठी संघर्ष करावा लागेल आणि एका वैचारिक सांस्कृतिक क्रांतीची लाट निर्माण करावी लागेल, जेणेकरून सामान्य जनता मानसिक गुलामीच्या बंधनांना तोडून भांडवलाच्या मानवद्रोही सत्तेविरुद्ध निर्णायक लढाईसाठी तयार होऊ शकेल.
—–
ब्रिटिश गुलामीच्या बेड्यांचे तुटणे कामगार, शेतकरी आणि सामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या न थकणाऱ्या संघर्ष आणि प्रचंड त्यागामुळेच शक्य झाले, परंतु छळ-कपट आणि जनसंघर्षांच्या क्रांतिकारी नेतृत्वाच्या कमजोरीचा फायदा उचलत देशी भांडवलदारांच्या प्रतिनिधींनी 1947 साली उत्पादन, राज्यकारभार, राज्यसत्ता आणि समाजाच्या पूर्ण संरचनेवर ताबा मिळवला. आपल्या निहित स्वार्थासाठी त्यांनी जातीय धार्मिक आधारावर जनतेला वाटून आणि दंगलींची विनाशकारी आग भडकावून देशाला फाळणीच्या टोकापर्यंत पोहोचवण्यात, इंग्रज वसाहतवाद्यांच्या षडयंत्रात सहकाऱ्याची भूमिका निभावली. जनतेची स्वप्न आणि स्वातंत्र्याचा सौदा करून भारतीय भांडवलदारांची प्रतिनिधी असणाऱ्या काँग्रेस पक्षांने ऐतिहासिक विश्वासघात केला. देशाला खंडीत, अपूर्ण आणि विकलांग राजकीय स्वातंत्र्य मिळाले. त्याचा पूर्ण फायदा वरच्या 20 टक्के फुकटखाऊ, परजीवी, श्रीमंत लोकांना मिळाला, जे देशी भांडवलदार आणि साम्राज्यवाद यांचे लाजिंदार चाकर बनण्यासाठी तयार होते. भारतीय भांडवलदारांनी जागतिक भांडवलाच्या परिघामध्ये साम्राज्यवाद्यांचे कनिष्ठ-भागीदार(जुनियर पार्टनर) बनून क्रमशः भांडवली विकासाचा रस्ता निवडला. ज्यामध्ये विदेशी लोकांना लुटण्याचा हक्क कायम राहिला आणि जनतेच्या नसानसातून रक्त शोषले जात राहिले. भांडवली भूमी सुधारणांच्या नावावर जुन्या राजेरजवाडे, जहागीरदार, जमीनदारांना आपली जमीन आणि संपत्ती वाचवणे, तसेच नवीन उत्पादन प्रणाली मध्ये भांडवलदारांच्या जमातीत सामील होणे किंवा भांडवली भूस्वामी बनण्याची पूर्ण संधी दिली गेली. अगोदरचे श्रीमंत शेतकरी आणि काही मधले शेतकरी सुद्धा, जमिनीचे मालक बनल्यानंतर, मजुरांचे शोषण करणारे तसेच बाजारात विकून नफा कमावणारे भांडवली शेतकरी बनले. तथाकथित हरितक्रांती-श्वेतक्रांतीच्या नावावर भांडवली शेतीच्या पद्धतीमध्ये तसेच शेतीमध्ये वित्त भांडवल आणून भांडवलाच्या वाढीला प्रोत्साहन देण्यात आले. गावांमध्ये विकसित झालेले नवीन भांडवलदार सुद्धा औद्योगिक तंत्राच्या मालकासोबत छोट्या भागीदाराच्या नात्याने लूट आणि सत्तेचे भागीदार बनले. यासोबतच व्यापारी, ठेकेदार, उच्चमध्यमवर्गीय बुद्धिजीवी, अधिकारी, नेता, दलाल आणि काळे-धनवाल्या मोठमोठ्या परजीवी जमाती सुद्धा खूप विकसित होत राहिल्या. सारी संपत्ती निर्माण करणाऱ्या जनतेला भांडवली विकासाची फक्त उष्टावळच पदरी आली आणि तीही यासाठीच की तीने शेत कारखान्यांमध्ये आपला घाम आणि रक्त गाळून, मातीमोलाने आपली श्रमशक्ती विकून, भांडवलदारांची संपत्ती वाढवत राहणाऱ्या मोलमजुरी गुलामाच्या रूपाने जिवंत रहावे.
राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर “समाजवादा”चा लोभस मुलामा चढवून, जनतेचे रक्त शोषून, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची विशाल संरचना उभी करण्यात आली, ज्यांच्यामध्ये मजुरांचे शोषण करून अधिकारशाही आणि नेतेशाहीच्या ऐषोआरामाचे बंदोबस्त केले गेले आणि अफाट भांडवल संचय करण्यात आला. जवळपास चाळीस वर्ष सरता-सरता शासक वर्गासाठी सार्वजनिक क्षेत्र उभे करण्याचे मूलभूत उद्दिष्ट पूर्ण झालेले होते, आता हेच क्षेत्र भांडवलशाहीला पुढे जाण्यांमध्ये एक अडथळा बनले होते आणि जनतेच्या नजरेमध्ये नकली समाजवादाचे वास्तव सुद्धा उघड झालेले होते. तेव्हा जनतेच्या रक्त घामातून उभे केलेले राजकीय उद्योग देशी-विदेशी भांडवलदारांना कवडी मोलाने विकण्याच्या, असे म्हणता येईल की जवळपास मोफतच देण्याच्या, प्रक्रियेची सुरुवात झाली. गेल्या शतकाच्या अंतिम दशकात खाजगीकरण-उदारीकरणाच्या धोरणांनी-म्हणजेच नवीन आर्थिक धोरणाच्या नावावर- ही प्रक्रिया खुल्या स्वरूपात सुरू झाली आणि सतत आपला वेग वाढवत आज पुढे चालली आहे. सरकारी उपक्रमांना भांडवली घराण्यांच्या हवाले करण्यासोबतच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे विदेशी लुटीसाठी पूर्णतः उघडले गेले आहेत.
गेल्या शतकाच्या नवव्या दशकापासून आजपर्यंतचा इतिहास हेच दाखवतो की साम्राज्यवादाच्या नव्या युगात भारतातील कष्टकरी जनतेच्या मानेवर देशी-विदेशी भांडवलदारांचा पोलादी पंजा अधिक मजबुतीने आवळला गेला आहे. भांडवलशाही द्वारे दररोज केल्या जाणाऱ्या अन्याय-अत्याचारांची भयंकरता आणि तीव्रता पटीने वाढली आहे. दरवर्षी शेतकरी आपल्या जमिनीपासून उखडले जाऊन विस्थापित होत आहेत आणि कोट्यवधी कामगार बेलगाम टाळेबंदीचे शिकार होत आहेत. मोठ्या संघर्षांमधून मिळवलेले मजुरांचे अधिकार एकेक करून काढले जात आहेत. मोठ्या उद्योगांमध्ये सुद्धा बहुतेक कामे रोजंदारी मजुरांकडून करून घेतली जात आहेत. त्यांच्यासाठी कामाचे तास आणि किमान मजूरी संबंधातील कायद्यांचा काहीच अर्थ राहिलेला नाही आणि मानवी जीवन किमान गरजांपासुनही वंचित आहे.
——
राजकीय स्वातंत्र्याच्या अर्धशतकापेक्षा जास्त कालखंडाच्या तथाकथित विकासाची एकूण बॅलन्स शीट ही आहे की देशातील वरच्या 10 टक्के लोकसंख्येकडे एकूण संपत्तीच्या 85 टक्के संपत्ती गोळा झाली आहे, तर खालच्या 60 टक्के लोकसंख्येकडे फक्त 2 टक्के संपत्ती आहे. देशामध्ये 0.01 टक्के लोक असे आहेत ज्यांचे उत्पन्न संपूर्ण देशाच्या उत्पन्नापेक्षा 200 पट अधिक आहे. सर्वात वरच्या 22 भांडवलदार घराण्यांच्या संपत्तीमध्ये दुप्पट-चौपट नाही तर एक हजार पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या घराण्यांमध्ये ते बहुराष्ट्रीय उद्योग सामील नाहीयेत ज्यांच्या शुद्ध नफ्यामध्ये दुप्पट-चौपट नाही तर सरासरी शेकडोपट वृद्धी झाली आहे. विदेशी कर्जाचे ओझे, दरवर्षी काही घट होऊनही, गेल्या अनेक वर्षांपासून 100 अब्ज डॉलरच्या वरच आहे. देशी आणि विदेशी देणे मिळून केंद्र सरकारच्या एकूण कर्जाचा बोजा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60 टक्क्यांच्या वर आहे. सरकारचे संपूर्ण उत्पन्न, कर्जाचे हप्ते आणि अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या नावाने स्वाहा होते. प्रत्येक प्रकारच्या सरकारी तोट्याच्या भरपाईचा एकच रस्ता शिल्लक राहिला आहे—व्यापक कष्टकरी जनतेचे अधिक शोषण करणे आणि त्यांच्या जीवनाला नरकापेक्षाही वाईट बनवत जाणे. सरकारने जी खोटी आणि माणसाप्रमाणे जगण्याचा हक्काची थट्टा उडवणारी ‘गरिबीरेषा’ ठरवली आहे तिच्या खाली जाणाऱ्यांची संख्या आज लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के आहे, तसेच अनेक अर्थशास्त्रज्ञांचे मानणे आहे की देशातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक दिवस-रात्र हाड-मांस गाळून सुद्धा जगण्याच्या किमान गरजांची पूर्तता करू शकत नाहीत. काम करण्यायोग्य तीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येकडे रोजगार नाहीये किंवा नियमित रोजगार नाहीये. हो, हा विकास नक्कीच होत आहे कि देशामध्ये मोठ्या संख्येने कार-मोटरसायकल-एसी-फ्रीज-टीव्ही-मोबाईल-वॉशिंग मशीन इत्यादींचे नवीन नवीन ब्रांड बाजारात येऊन पडले आहेत. विलासितेच्या टापूंना जोडणारे प्रशस्त राजमार्ग बनत आहेत. देशामध्ये काळ्या धनाची समांतर अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली आहे की तिचा आकार वाढून सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 75 टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे.
देशातील वरची तीन टक्के लोकसंख्या आणि खालची 40% लोकसंख्या यांच्या उत्पन्नातील अंतर आता साठ पट झाले आहे. मुठभर श्रीमंतांच्या जीवनाचा स्तर पाश्चात्य देशांमधील श्रीमंतांच्या बरोबरीला पोहोचत आहे, जेव्हा की सामान्य गरीब लोकसंख्येच्या खाण्या-पिण्याच्या, वापराच्या, इतर वस्तू, आणि औषध-पाण्याच्या किमती त्यांच्या आवाक्यापासून जास्तीत जास्त दूर होत चालल्या आहेत. प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतच्या खर्चा मध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि मुला-मुलींना डॉक्टर इंजिनियर बनवण्याचे स्वप्न तर आता सामान्य मध्यमवर्गीय नागरिक पाहून सुद्धा शकत नाही. उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या परिसरापर्यंत सामान्य घरातील युवकांची पोहोच आता जवळपास अशक्य होत चालली आहे.
देशातील भांडवली लोकशाहीचे वास्तव तर खूप अगोदरच उघड झाले होते आणि आता तिचा सर्वात घाणेरडा आणि नग्न निरंकुश चेहरा आपल्यासमोर आहे. लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या आणि दुरंगी-तिरंगी झेंड्याच्या सर्व निवडणूकबाज पक्षांचे जनविरोधी आर्थिक धोरणांवर मात्र पूर्णपणे एकमत आहे. त्यांच्यामध्ये सर्व झगडे आणि कुत्तरओढ फक्त यावरून आहे की शासक वर्गांचा मुख्य प्रतिनिधी बनून खुर्चीवर कोणी बसायचे. ते आपापसात लढत आहेत याचे कारण हे सुद्धा आहे की संकट काळात सत्ताधारी आपापसात कुत्र्यासारखे लढत असतात, भांडत असतात. त्यांच्या आपापसातील लढायचे एक मूलभूत कारण हे पण आहे की लूटखोरांमध्ये कधीही स्थायी एकता होत नाही. आपल्या देशाचे भांडवली राजकारण आज रसातळाच्या त्या खोलीला जाऊन पोहोचले आहे, जेथे नेते आणि अपराध्यांच्या गटांमध्ये काहीच फरक राहिलेला नाही. प्रशासन तंत्राची जी स्थिती आहे तिच्यामध्ये नोकरशहा आणि ठगांमध्ये काहीच फरक राहिलेला नाही.
लोकशाहीचे नग्न सत्य आता जनतेच्या डोळ्यासमोर सुर्यप्रकाशासारखे उघड आहे. अब्जावधी रुपयांचा खर्च होणाऱ्या निवडणुकात फक्त हे ठरते की पुढील पाच वर्षे सत्ताधारी वर्गाच्या ‘मॅनेजिंग कमिटी’च्या रूपाने कोणता पक्ष किंवा संयुक्त मोर्चा सरकार चालवण्याचे काम करेल. परिस्थितीने जनतेच्या डोळ्यासमोर हे सत्य अगदी उघड केलेले आहे की सैन्याच्या बलाढ्य मशिनरीचे काम देशाचे रक्षण करणे राहिलेले नसून जनतेच्या उठावांपासून सत्ताधाऱ्यांचे रक्षण करणे बनले आहे. अशाच प्रकारे पोलिस यंत्रणेचे काम कायदा-व्यवस्थेच्या नावाने जनतेला दहशतीत ठेवणे आणि भांडवलदारांच्या तिजोऱ्यांचे रक्षण करणे आहे. देशामध्ये दरवर्षी अब्जावधी रुपये तथाकथित लोकप्रतिनिधी आणि संसदेतील गोंधळावर खर्च होतात. अब्जावधी रुपये सैन्यावर खर्च होतात, अब्जावधी रुपये नोकरशाहीचे तंत्र आणि अब्जावधी रुपये पोलिसी तंत्रावर खर्च होतात. हा सर्व खर्च जनता आपल्या पोटाला चिमटा घेऊन देत असते. जे भांडवली दरोडेखोरांचे प्रामाणिक कुत्रे आहेत ते रखवाली करण्याची, भुंकण्याची आणि चावण्याची पूर्ण किंमत वसूल करतात. भांडवलदार ही किंमत स्वतः देत नाहीत, तर लोकशाहीच्या नावाने जनतेकडूनच वसूल करतात जिच्या हाडांपासून ते आपला नफा काढतात.
गेल्या 28 वर्षांपासून चालू असलेल्या नवउदारवादी धोरणांनी भाजप आणि संघ परिवाराच्या कट्टरपंथी राजकारणाचे पोषण होण्यासाठी अनुकूल जमीन तयार केली आहे. भांडवली व्यवस्थेचे गंभीर आर्थिक संकट अशा स्थितीत आहे की एक फॅसिस्ट सत्ता तिची गरज बनली आहे, जी दंडूकेशाहीच्या जोरावर कष्टकरी जनतेचे शोषण करून विरोधाचा प्रत्येक आवाज दाबून भांडवलदारांच्या नफ्याला विनाअडथळा कायम ठेवू शकेल. खरेतर भारतीय भांडवली व्यवस्थेच्या समोर आज जो एकमात्र पर्याय उरला आहे त्याच्यावरच ती अंमल करत आहे. मूलभूत धोरणांवर सर्वसाधारण सहमती असल्यामुळे निवडणूकबाज पक्ष काही गैरलागू मुद्यांवर आपापसात नकली भांडण करत राहतात किंवा जाती-धर्माचे झगडे लावून, जनतेमध्ये दुही माजवून, आपले निवडणुकीचे राजकारण करत राहतात. कामगार हितांचे आश्वासन देणारे सर्व नकली डावे पक्ष सुद्धा विरोधाचे हवाई गोळे सोडत सत्ता प्रपंचामध्ये पूर्णतः भागीदार बनले आहेत. आर्थिक उदारीकरणाची लहर तसेच भांडवली लोकशाहीचे क्षरण व पतन यांनी सामाजिक पटलावर अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या धार्मिक कट्टरपंथी फॅसिस्ट शक्तींना व्यापक ताकद आणि आधार देण्याचे काम केले आहे. या शक्ती दंगली आणि नरसंहारांद्वारे देशाला रक्ताच्या दलदलीत बदलत आहेत आणि आज पुन्हा एकदा द्वेषाची आग पसरवू लागले आहेत, जेणेकरून, जेव्हा देशाची जनता भयंकर शोषणकारी धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरू लागेल तेव्हा तिची एकता तोडता येणे शक्य व्हावे. भांडवली राज्य जास्तीत जास्त निरंकुश होत चालले आहे आणि फॅसिस्ट सत्तेत आल्यानंतर उरलेसुरले भांडवली लोकशाही ‘अवकाश’ समाप्त केले जात आहे. धार्मिक कट्टरपंथी राज्यतंत्र समाजाच्या प्रत्येक स्तरावर आपली घुसखोरी आणि प्रभाव वाढवत आहे. त्यांचे विषारी राजकारण संपूर्ण देशाला एका भयंकर रक्तपातपूर्ण कलहाकडे वेगाने ढकलत आहे. कष्टकऱ्यांची वर्गीय चेतना कुंठीत करून क्रांतिकारकांसमोर एक मोठे आव्हान उभे केले. फॅसिझमच्या उभारानंतर त्याच्या प्रत्येक रूपाविरुद्ध संघर्ष एका क्रांतिकारी युवक संघटनेसाठी एक महत्त्वाचा कार्यभार आहे. तरुणांना यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर वैचारिक-सांस्कृतिक संघर्ष चालवण्या सोबतच आज रस्त्यांवर सुद्धा यांच्यासोबत समोरासमोरच्या लढ्यासाठी तयारी करावी लागेल.
ढोबळ मानाने हेच आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंतचे आपल्या समाजाचे प्रवासवर्णन. भारतीय भांडवलशाहीच्या कमजोर-विकलांग-आजारी शिंगराने भांडवली सामाजिक-राजकीय संरचनेच्या बैलगाडीला ओढत-ओढत एका बंद गल्लीच्या टोकावर आणून उभे केले आहे. इथून पुढे जाण्यासाठी या बैलगाडीला भंगाराच्या दुकानात पोहोचवावे लागेल आणि समोर उभ्या असलेल्या भिंतीला एका नव्या सामाजिक क्रांतीच्या विस्फोटाने नष्ट करावे लागेल. इतिहासाने पुन्हा एकदा ही आव्हानात्मक जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर टाकली आहे, जेणेकरून त्यांनी नव्या शतकाच्या क्रांतीचे ध्वजवाहक बनावे. साम्राज्यवाद-भांडवलशाही विरोधी नवी क्रांती आज इतिहासाच्या अजेंड्यावर सर्वोपरी आहे आणि भारत त्या संभावनापूर्ण देशांच्या रांगेमध्ये पुढे उभा आहे, जिथे एका प्रचंड वेगवान वादळाची परिस्थिती वेगाने तयार होते आहे. नौजवान भारत सभा देशातील तरुणांना आवाहन करत आहे की त्यांनी नव्या मुक्ती संघर्षाच्या तयारीसाठी पुढे यावे, क्रांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा, संघटित होऊन न्याय आणि अधिकारासाठी संघर्ष करावा, आपल्या संघर्षापासून समाजामध्ये प्रेरणेच्या लहरी निर्माण कराव्यात आणि त्यांना व्यापक कष्टकरी जनतेच्या संघर्षांचा भाग बनवावे.
“भारतीय प्रजासत्ताकाच्या युवकांनो, नव्हे शिपायांनो, फळीबद्ध व्हा! ना आरामात उभे रहा, ना निरर्थक कदमताल करा! दीर्घ दरिद्रतेला, जी तुम्हाला निष्काम बनवत आहे, नेहमीसाठी उतरवून फेका. तुमचे मिशन अतिशय योग्य आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक दिशेला पसरून जा आणि भावी क्रांतीसाठी, जिचे येणे निश्चित आहे, लोकांना तयार करा. कर्तव्याच्या बिगुलाचा आवाज ऐका. जीवन असेच रिकामे दवडू नका. चला, तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण या प्रकारच्या पद्धती आणि योजना शोधण्यात घालवा की कशाप्रकारे आपल्या प्राचीन धरतीच्या डोळ्यांमध्ये ज्वाला जागृत होतील आणि एक मोठी जांभई देत ती जागी होइल.”
-शहीद भगतसिंह
(हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशनचे घोषणापत्र)
आमचा कार्यक्रम
1) देशी विदेशी भांडवलाच्या पाशवी लुटीच्या आधारावर उभ्या असलेल्या सामाजिक-आर्थिक संरचनेला नष्ट करून समता, न्याय, मानवीय सन्मानाच्या आधारावर एका नव्या सामाजिक-आर्थिक संरचनेचे निर्माण हे नौजवान भारत सभेचे अंतिम लक्ष्य आहे आणि या ऐतिहासिक महायुद्धाच्या तयारीमध्ये देशाच्या क्रांतिकारी युवक ऊर्जेला सज्ज करणे हा आमचा अटळ संकल्प आहे. हा इतिहासासोबत आमचा करार आणि भविष्याशी आमचा वायदा आहे की आम्ही शहीद भगतसिंहाच्या आवाहनावर अंमल करत, क्रांतीचा संदेश घेऊन कारखाने आणि वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊ आणि व्यापक कष्टकरी जनतेला एक अशी व्यवस्था कायम करण्याच्या संघर्षासाठी एकजूट करू, जिच्यामध्ये उत्पादन, राज्यकारभार, आणि समाजाला चालवण्याचे नियम आणि धोरणे स्वतः उत्पादन करणारे लोकच बनवतील. अशा व्यवस्थेमध्ये जगण्याचा अधिकार फक्त काम करणाऱ्यांनाच असेल, जिच्यामध्ये नफेखोर, ऐतखाऊ, आणि बौद्धिक काम करणाऱ्यांच्या विशेषाधिकाराला कोणतेही स्थान नसेल. फक्त अशीच व्यवस्था भांडवलाच्या जोखडातून मुक्त करून आपल्या समाजाला प्रगतीच्या अस्पर्शित शिखरांपर्यंत घेऊन जाऊ शकेल.
2) आम्हाला चांगलेच माहित आहे की अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता अतिशय दूरचा आणि कठीण आहे, परंतु रस्त्याची आव्हानं दृढ प्रतिज्ञा केलेल्या यात्रेकरूंना यात्रा सुरू करण्यापासून थांबवू शकत नाहीत. हजारो मैलांच्या दूरच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा एक पाऊल उचलण्यानेच होत असते. हेसुद्धा लक्षात ठेवावे लागेल की आम्ही शून्यापासून सुरुवात करत नाही आहोत. आमच्यामागे संघर्ष आणि बलिदानाचा एक समृद्ध वारसा आहे. वर्तमान काळीसुद्धा संपूर्ण देशात वेगवेगळ्या हिश्श्यांमध्ये युवकांचे क्रांतिकारी संघर्ष चालू आहेत. गरज फक्त या गोष्टीची आहे की भूतकाळातील सकारात्मक-नकारात्मक अनुभवांचा सार काढला जावा, वर्तमान परिस्थिती आणि नवीन बदलांचा अभ्यास केला जावा, आणि त्यांच्या आधारावर संघर्षाच्या नीती-रणनीती मध्ये आवश्यक ते बदल केले जावेत. क्रांतिकारी युवकांच्या उरलेल्या संघर्षांना एका योग्य-अचूक कार्यक्रमाच्या आधारावर एकजूट केले जावे. आपल्या कार्यक्रमावर अंमलबजावणी करताना नौजवान भारत सभा देशातील क्रांतिकारी युवक आंदोलनाच्या एकजुटीसाठी आपले प्रयत्न सतत चालू ठेवेल.
3) तरुणांनी भांडवलाच्या सत्तेला उद्ध्वस्त करण्याच्या या लढाईचे लक्ष्य क्षणभरासाठीही विसरले नाही पाहिजे, परंतु त्याच्या तयारीच्या दीर्घ प्रक्रियेमध्ये त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये जनजीवनाच्या विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या समस्यांना घेऊन आपल्या मागण्या आणि अधिकाऱ्यांच्या आंदोलनांमध्ये उतरावे लागेल. रोजच्या जीवनामध्ये सामान्य झालेल्या अत्याचारांविरोधात आवाज बुलंद करावा लागेल. या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये छोट्या-मोठ्या सुधारणांसाठी लढावे लागेल. या प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी तरुणांना जनतेचा विश्वास जिंकण्याची, व्यवहारात स्वतःला सिद्ध करण्याची, तसेच पुढील मोठ्या लढायांमध्ये आपल्या ताकदीचा अंदाज घेण्याची, तसेच त्याच्या पूर्वाभ्यासाची संधी मिळेल. लक्षात रहावे की सुधारणांसाठी लढणे हा प्रत्येक स्थितीमध्ये सुधारवाद नसतो. जर क्रांतिकारी परिवर्तनाचे लक्ष्य आणि सुनिश्चित कार्ययोजना आपल्याकडे असेल तर व्यापक लोकसंख्येशी एकजुटता बनवण्यासाठी, त्यांच्या चेतनेला झुंझार बनवण्यासाठी, तसेच जागरूक, गोलबंद आणि संघटित करण्याच्या उद्दिष्टाने आपण सुधारणा आणि अधिकाराच्या ज्या छोट्या-छोट्या लढायांची सुरुवात करतो त्या एका क्रांतिकारक संघर्षाच्या साखळीच्या कड्या बनत जातात. सुधारणांनाच उद्दिष्ट बनवले गेले तर ती या व्यवस्थेची ठिगळं होऊ लागतात, ज्याला आपण सुधारवाद म्हणू शकतो. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की सुधारणा आणि अधिकारांच्या छोट्या-छोट्या रोजच्या लढायांमध्ये व्यापक सामान्य जनतेला जागरुक आणि संघटित केल्याशिवाय जर काही युवक व्यक्तिगत शौर्य आणि बलिदानाच्या आधारावर क्रांतीचे स्वप्न बघत असतील तर ती मध्यमवर्गीय क्रांतिकारीतेची घाईघाईची मानसिकता असेल ज्याला आपण दुस्साहसवाद सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवावे क्रांती सामान्य जनता करते, मुठभर शूर लोक नाही. क्रांतीचा प्रत्येक शॉर्टकट आपल्याला क्रांतीपासून दूरच घेऊन जातो. सुधारवाद आणि दुस्साहसवाद या दोन्ही टोकांच्या भरकटण्यापासून बचाव करत आंदोलनाला क्रांतिकारी जनदिशेच्या आधारावर पुढे जावे लागेल.
4) भांडवलशाहीच्या पाशवी मानवद्रोही काळाने व्यापक सामान्य युवक लोकसंख्येसमोर जे सर्वात ज्वलंत, तात्कालिक प्रश्न उभे केले आहेत—ते आहेत सतत वाढती महागाई, आवाक्यापासून दूर होत चाललेले शिक्षण आणि रोजगाराच्या संधींची कमतरता. स्थिती आता असहनीय आणि विस्फोटक होत चालली आहे. प्रत्येक वर्षी कारखाने आणि ऑफिसमधून लाखो कामगार व लाखो मध्यमवर्गीयांची छाटणी, तसेच लाखो छोट्या शेतकऱ्यांचे जमिनीपासून उखडले जाण्यामुळे अवस्था अतिशय बिकट होत आहे आणि नफेखोरांना स्वस्तात-स्वस्त दरावर श्रमशक्तीचे शोषण करण्याची संधी मिळत आहे. यामुळे भांडवली व्यवस्थेच्या विरुद्ध क्रांतिकारक युवक आंदोलनाचा जो नारा सर्वात प्रमुख असेल तो आहे— “सर्वांसाठी शिक्षण आणि सर्वांना रोजगाराच्या समान संधी“. बेरोजगारी हा भांडवली उत्पादन पद्धतीचा अपरिहार्य परिणाम आहे. वर्गांमध्ये विभागलेल्या समाजामध्ये शिक्षण वरून खालपर्यंत असमानच असते आणि ही असमानता सतत वाढत जाते. ज्या शिक्षणात रोजगाराच्या संधी अधिक असतात ते वरच्या मूठभर श्रीमंतांच्या औलादींची जहागिरी होत जाते आणि “घटणाऱ्या जागा–वाढणारी फी” हे सर्वसाधारण चलन गरीब आणि सामान्य मध्यम वर्गातील युवकांना उच्च शिक्षणाच्या भवतालातून बाहेर ढकलून देते. यामुळे असमान आणि महागड्या शिक्षणाविरुद्ध संघर्षाचा नारा खरेतर व्यवस्थेच्या एका सामान्य नियमावर, सामान्य प्रवृत्तीवर आघात करतो. हा क्रांतिकारक युवक आंदोलनाचा सर्वोपरी व्युव्हरचनात्मक नारा आहे. समान शिक्षण आणि सर्वांना समान रोजगाराचा संघर्ष असंख्य छोट्या छोट्या संघर्षांच्या कड्यांनी निर्माण होईल आणि अनेक टप्प्यांना पार करून व्यापक आणि उन्नत बनेल. मोफत आणि समान प्राथमिक शिक्षणाची मागणी तसेच शिक्षणाला धंदा बनवण्यावर बंदी आणण्याचे आंदोलन संघटित करणे तसेच या मागणीला घेऊन सामान्य नागरिकांना एकजूट करणे हा युवक आंदोलनाचा एक महत्वाचा कार्यभार आहे, तसेच समान शिक्षण व सर्वांना रोजगाराच्या संघर्षाची एक कडी आहे. सरकार जोपर्यंत प्रत्येक काम करू शकण्या योग्य व्यक्तीला काम देऊ शकत नाही तोपर्यंत भरण-पोषणासाठी बेरोजगारी भत्ता तर नक्कीच द्यावा या मागणीला घेऊन केला जाणारा संघर्ष शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर चालू असलेल्या दीर्घकालिक संघर्षाची सर्वात महत्वपूर्ण कडी आहे. याशिवाय युवकांना उच्च शिक्षणामध्ये सीट कमी कमी होत जाणे आणि फीस वाढणे याच्या प्रत्येक पावलांचा निर्धाराने विरोध केला पाहिजे. याप्रकारे मेडिकल, तांत्रिक आणि व्यवस्थापन व्यवसायाच्या अभ्यासक्रमात डोनेशन व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुद्धा युवक आंदोलनाचा एक मुद्दा आहे, ज्याला पुढे नेण्यामध्ये युवक आंदोलन क्रांतिकारक विद्यार्थी संघटनांसोबत हिरीरीने भागीदारी करेल. शिक्षण क्षेत्रात चालू असलेले अंदाधूंद खाजगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण, म्हणजे शिक्षण संस्थांना देशी-विदेशी भांडवलदारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने सोपवण्याची धोरणं, शिक्षणाला सामान्य जनतेच्या आवाक्यापासून जास्तीत जास्त दूर करणे, तसेच बेरोजगारी वाढवण्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका पार पाडत आहेत. यामुळे समान शिक्षण आणि सर्वांना रोजगाराच्या समान संधीच्या उद्दिष्टांसाठी युवक आंदोलनाला या धोरणांचे वास्तविक चरित्र उघड करावे लागेल. यांच्याविरुद्ध संघर्ष करताना संपूर्ण समाजासमोर पर्यायी जनपक्षधर धोरणांचा आराखडा प्रस्तुत करावा लागेल. लोकसंख्येला बेरोजगारीचे कारण सांगणाऱ्या प्रतिक्रियावादी माल्थसवादी सिद्धांताचे सुविचारित तर्कपूर्ण खंडन करत आपल्याला या सत्याला सतत स्पष्ट करावे लागेल की बेरोजगारीचे मूळ कारण नफ्यासाठी चालणाऱ्या उत्पादन पद्धतीत आहे, ना की वाढत्या लोकसंख्येत. जेव्हा विकासाची अनेक कामे पडलेली आहेत, नैसर्गिक स्त्रोत संसाधने आहेत आणि काम करणारे लोक सुद्धा, तेव्हा रोजगाराची कमतरता नसलीच पाहिजे. उत्पादन बाजारासाठी न होता मानवी गरजांसाठी होईल तेव्हाच तर सर्व काम करणाऱ्यांच्या सर्व आवश्यकता पुर्ण केल्या जातील, जाऊ शकतील. नौजवान भारत सभा, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर संघर्ष करताना बेरोजगारी आणि लोकसंख्या विषयक भ्रामक धारणांच्या विरोधात शिक्षण आणि प्रचार-प्रचाराचे अभियान चालवेल जेणेकरून बेरोजगारीचे मूळ कारण, भांडवलशाही विरोधात तरुणांना एकजूट करता यावे.
5) सामाजिक रुढींविरोधात अविरत, तडजोडविहीन संघर्ष कोणत्याही देशातील युवक आंदोलनाची एक पायाभूत आणि अनिवार्य जबाबदारी आहे. जातीय आणि धार्मिक-सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धा सामान्य जनतेसाठी मानसिक गुलामीच्या बेड्या आहेत. मानसिक गुलामीच्या या बेड्यांना तोडण्यासाठी जर आपण पाऊल पुढे टाकले नाही तर भांडवलशाहीच्या सामाजिक-आर्थिक गुलामी विरुद्ध जनतेचा मुक्तीसंघर्ष सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. जात आणि धर्माच्या आधारावर जनतेमध्ये दुही नेहमीच मुठभर सत्ताधारी जमातींचे हात मजबूत करत आली आहे. इंग्रजांनी सुद्धा याचा भरपूर फायदा उचलला आणि व्होटबॅंकेचे राजकारण करणारे भांडवली पक्ष सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आणि धूर्तपणे हाच खेळ खेळत आहेत. वेगवेगळ्या धार्मिक अंधश्रद्धा जनतेला वैज्ञानिक जीवन-दृष्टीकोण, तर्कशक्ती आणि योग्य इतिहास बोधाने सज्ज होऊ देत नाहीत. त्या जनतेला दैववादी बनवून तिच्या विराट इतिहास निर्मात्या शक्तीला निष्क्रिय करतात. हेच कारण आहे की जी भांडवलशाही भौतिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये विज्ञानाचा वापर करत आहे, ती सिनेमा, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट इत्यादी विकसित संचार माध्यमांद्वारे वेगवेगळ्या रुढी आणि अंधश्रद्धांचा प्रचार करत आहे आणि या प्रकारे वैज्ञानिक जीवन दृष्टीला गुंग करण्यासाठी विज्ञानाने जन्माला घातलेल्या तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा योजनाबद्ध पद्धतीने वापर करत आहे. नौजवान भारत सभा धार्मिक अंधश्रद्धा तसेच धार्मिक आणि जातीय रुढींच्या मान्यतांविरोधात सतत मोहिम चालवेल. ती जनतेला दैववादापासून मुक्ती देण्यासाठी आणि धार्मिक-जातीय आधारावर उभ्या असलेल्या दुभाजक भिंतींना तोडण्यासाठी सतत प्रयत्न करेल. सभा, भांडवली प्रसार माध्यमांद्वारे रूढी आणि अंधश्रद्धांच्या प्रचाराच्या षडयंत्रांचा यथासंभव भांडाफोड करेल. विविध सामाजिक आयोजनांशिवाय नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते आपले जीवन आणि आचरणातून अंधविश्वास आणि जातीवादाचा विरोध करत वैज्ञानिक जीवन दृष्टीचे उदाहरण प्रस्तुत करण्याचा यथासंभव प्रयत्न करतील.
6) ‘क्रांतीची तलवार विचारांच्या सहाणेवर परजली जाते’—भगतसिंहाचे हे कथन आमच्यासाठी एक मार्गदर्शक सूत्रवाक्य आहे. नौजवान भारत सभा पुस्तकालये, अध्ययन मंडळं, प्रचार अभियानं, पत्रक-पॅंफ्लेट, पत्रिका-पुस्तिका, आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये एक नवीन क्रांतिकारक प्रबोधन मोहिम निर्माण करेल, त्यांना वैज्ञानिक जीवन-दृष्टीकोण आणि इतिहास-बोधाने सज्ज करेल, भांडवली उत्पादन, राज्यकारभार आणि समाजाच्या संचरनेला समजण्यासाठी त्यांना सक्षम बनवेल आणि ही समजदारी देईल की या व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी तिचा क्रांतिकारक पर्याय कशाप्रकारे निर्मिला जाऊ शकतो. नौजवान भारत सभा भांडवली जीवन-मूल्ये आणि संस्कृतीच्या मानवद्रोही वास्तवाला उघड करत समाजवादी जीवन-मूल्य आणि संस्कृतीचा सतत प्रचार-प्रसार करेल. एक वैचारिक-सांस्कृतिक क्रांतीची लाट निर्माण केल्याशिवाय कोणत्याही मूलगामी सामाजिक क्रांतीची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही. नौजवान भारत सभा क्रांत्यांचा इतिहास आणि क्रांतिकारक विचारांच्या वारशाशी युवकांना परिचित करवेल आणि नंतर या विचार संपदेला घेऊन सामान्य कष्टकरी जनतेपर्यंत जाण्यासाठी त्यांना आवाहन करेल. आजची मुलंच उद्याचे तरूण आहेत. त्यामुळे नौजवान भारत सभा लहान मुलांच्या मोर्चावर काम करणे सुद्धा आपली महत्वपूर्ण जबाबदारी मानते. सध्याची शिक्षणव्यवस्था, सिनेमा, टीव्ही, आणि बाजारू बाल-साहित्य आजचे बाल मानस वैज्ञानिक दृष्टी संपन्न करण्याऐवजी त्याला रोगी आणि कुंठीत बनवत आहे. आपली सांस्कृतिक-सामाजिक आयोजने, बाल पुस्तकालये, बाल-सभांच्या स्थापना, कार्यशाळा आणि बाल-शिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून नौजवान भारत सभा मुलांना रुढी आणि अंधश्रद्धांपासून मुक्त करण्याचा आणि वैज्ञानिक जीवनदृष्टी देण्याचा प्रयत्न करेल.
7) नौजवान भारत सभा सर्व भांडवली पक्ष आणि कष्टकऱ्यांचे नकली तारणहार बनलेल्या संसदीय डाव्या पक्षांचे जनविरोधी चरित्र सतत उघड करत राहिल, तरूणांना त्यांचे शेपूट बनण्यापासून सावध करत राहिल आणि सामान्य जनतेला सतत इशारा देत राहिल की तिने त्यांच्या बनवाबनवीला फसू नये. नौजवान भारत सभा सर्व भांडवली संसदीय लोकशाहीचा बुरखा फाडत सामान्य कष्टकरी आणि मध्यमवर्गीय़ लोकसंख्येमध्ये प्रचारात्मक कारवायांद्वारे सतत हे सांगेल की ही लोकशाही वास्तवात एक दमनकारी धनिकशाही आहे—ही वरच्या वीस टक्के दरोडेखोर आणि परजीवी लोकसंख्येसाठी लोकशाही आहे आणि उरलेल्या ऐंशी टक्के सामान्य जनतेसाठी निष्ठुर स्वेच्छाचारी निरंकुशतंत्र आहे. भांडवली निवडणुकीच्या राजकारणाचे सगळे छळ-कपट उघड करत नौजवान भारत सभा धार्मिक कट्टरपंथी शक्तींच्या फॅसिस्ट राजकारणाविरुद्ध प्रत्येक स्तरावर संघर्ष करेल, ज्याने भांडवली व्यवस्थेच्या संरचनात्मक संकटाच्या काळात विनाशकारी रूप धारण केलेले आहे. जे जनतेमध्ये अस्तित्वात असलेल्या धार्मिक रूढींचा लाभ घेत नरसंहारांचे तांडव रचत असते आणि नंतर प्रेतांच्या आचेवर निवडणूकीच्या पोळ्या भाजते. इतर निवडणूकबाज पक्ष जे या फॅसिस्टांच्या विरोधात दम भरतात, ते सुद्धा व्होटबॅंकेच्या राजकारणासाठी जाती-धर्माचा वापर करतात आणि नंतर धर्मवादी राजकारणाला खतपाणी घालण्याचे काम करतात. नौजवान भारत सभा व्यापक जनसमुदायला या सत्याशी परिचित करवण्याचा प्रत्येक प्रयत्न करेल की धर्मवादी फॅसिस्ट शक्तीना कधीही भांडवली पक्ष किंवा निवडणुकबाज डाव्यांद्वारे निवडणुकीच्या आखाड्यात मात देऊन समाप्त केले जाऊ शकत नाही. फक्त व्यापक जनतेच्या झुंझार एकजुटतेच्या आधारावर आणि क्रांतिकारक जनसंघर्षांच्या प्रक्रियेतूनच त्यांना वास्तवात मागे ढकलले जाऊ शकते आणि थडग्यापर्यंत पोहोचवले जाऊ शकते. नौजवान भारत सभा ‘सर्वधर्म समभावाचे’ ढोंग उघड करत वास्तविक धर्म-निरपेक्षतेच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करेल आणि जनतेमध्ये हे स्पष्ट करेल की धार्मिक आस्था किंवा अनिश्वरवादी मान्यता प्रत्येक नागरिकाचा खाजगी मामला मानत धर्माला राजकीय-सामाजिक जीवनापासून पूर्णपणे वेगळे करणे हीच वास्तविक धर्मनिरपेक्षता आहे.
8) कोणताही तरूण क्रांतिकारक आहे की नाही याची एकमात्र कसोटी हीच असू शकते की तो सामान्य कष्टकरी जनतेसोबत पूर्णत: मिळून-मिसळून जातो की नाही, त्यांच्या जीवन आणि संघर्षासोबत पूर्णत: जोडला जातो की नाही. नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते साधे आणि श्रमसाध्य जीवन व्यतित करत व्यापक कष्टकरी जनतेसोबत एकजूटता कायम करतील आणि देशातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत करतील. ते आपले खाजगी जीवन आणि राजकीय व्यस्ततांमधून वेळ काढून उत्पादक कारवायांमध्ये भागीदारीचा यथासंभव प्रयत्न करतील, कष्टकरी जनसमुदायामध्ये विविध शैक्षणिक-सांस्कृतिक कारवायांद्वारे त्यांच्या चेतनेचा स्तर उंचावण्याचा सतत प्रयत्न करतील तसेच त्यांचे दैनंदिन जीवन आणि संघर्षांमध्ये सक्रिय भागिदारी करतील. ते सामान्य जनतेला शिकवण्याअगोदर त्यांच्यापासून शिकतील आणि ‘जनतेची सेवा करा‘ या सूत्रवाक्यावर सच्च्या मनाने अंमल करतील. सामान्य जनता आणि उत्पादक कारवायांमध्ये जाऊन नौजवान भारत सभेचे शिपाई त्या समाजाचे बारकाईने अध्ययन करतील ज्याला बदलणे त्यांचे लक्ष्य आहे. कारण गोष्टींना बदलण्याअगोदर त्यांना जाणणे जरूरी आहे आणि गोष्टी बदलण्याच्या प्रक्रियेतच स्वत:ला बदलावे लागते.
9) कोणत्याही व्यवस्थेमध्ये शासक वर्गाची संस्कृतीच संपूर्ण समाजावर प्रभावी असते, तसेच सामाजिक संस्था आणि शिक्षणतंत्रावरही शासक वर्गाचेच वैचारिक-राजकीय वर्चस्व कायम असते. पूर्ण सामाजिक-आर्थिक संरचना तेव्हाच बदलली जाऊ शकते, जेव्हा शासक वर्गाच्या राज्यसत्तेचा ध्वंस करून कष्टकरी जनता आपली राज्यसत्ता स्थापित करेल. विविध शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक रचनात्मक कार्यांद्वारे समाजाला बदलण्याचा विचार एक सुधारवादी दृष्टीकोण आहे, ज्याचा प्रचार भांडवली बुद्धिजीवी नेहमीच करतात. नौजवान भारत सभा या सुधारवादी दृष्टिकोणाला पूर्णत: नाकारते. परंतु राजकीय संघर्षासाठी सामान्य जनतेला तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक रचनात्मक कार्याच्या भुमिकेला तसेच या क्षेत्रांमध्ये वैकल्पिक संस्था उभ्या करण्याच्या उपक्रमाला ती अपरिहार्य मानते. या प्रयत्नांच्या माध्यमातून युवक समूदाय व्यापक जनतेसोबत एकजुटता कायम करतो, त्यांचा विश्वास जिंकतो, जनतेच्या पुढाकाराला जागृत करतो तसेच जनतेसमोर भावी समाजातील शिक्षण, संस्कृती, आणि सामाजिक संस्थांचे एक सामान्य चित्र उपस्थित करतो. नौजवान भारत सभा शहरे आणि गावांच्या गरीब कष्टकरी जनतेमध्ये बाल-शिक्षणाच्या संस्था उभ्या करेल, विविध सांस्कृतिक आयोजन करेल, सांस्कृतिक अभियान चालवेल, कष्टकऱ्यांच्या सांस्कृतिक टोळ्या संघटीत करेल, सहयोगी डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वास्थ्य आणि चिकित्सा शिबिरांचे तसेच जन स्वास्थ्य शिक्षण अभियानांचे आयोजन करेल, प्रौढ शिक्षणासाठी रात्र पाठशाळांचे आयोजन करेल, पुस्तकालये स्थापन करेल, दारूचे व्यसन, जात-पात, अस्पृश्यता आणि सर्व सामाजिक अनिष्ठ प्रथा-परंपराविरोधात व्यापक प्रचार अभियान चालवेल, वेळोवेळी स्वच्छता अभियान चालवेल तसेच विविध प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करेल.
10) नौजवान भारत सभा स्त्री-पुरुष असमानता, स्त्रियांचे उत्पीडन, त्यांची घरगुती गुलामी तसेच पुरुष स्वामित्ववादाच्या संस्कृतीविरोधात सतत आणि निर्धाराने प्रचार-अभियान चालवेल. कारण स्त्रियांच्या अर्ध्या लोकसंख्येच्या पुढाकाराला जागृत केल्याशिवाय, सामाजिक जीवनात त्यांच्या सक्रिय भागिदारीशिवाय कोणाताही जन-मुक्ती संघर्ष मुक्कामी पोहोचू शकत नाही. स्त्रियांच्या मुक्तीसाठी संघर्ष केल्याशिवाय भांडवलशाहीविरुद्धचा संघर्ष पुढे नेला जाऊ शकत नाही आणि भांडवली समाजाच्या बेड्यांपासून समाजाला मुक्त केल्याशिवाय स्त्रियांची मुक्ती सुद्धा पूर्णत: शक्य नाही. नौजवान भारत सभा आपल्या पूर्ण शक्तीनिशी युवा स्त्रियांच्या जास्तीत जास्त भागीदारीसाठी सर्व प्रयत्न करेल. ती स्त्रियांचे उत्पीडन करणाऱ्या सर्व धार्मिक अनिष्ठ प्रथांचे, जातीय रुढींचे, जुनाट सामाजिक चाली-रिती आणि हुंडा प्रथेसारख्या कृर संस्थांचा तीव्र विरोध करण्यासाठी युवकांना एकजूट करेल, कायदा यंत्रणेच्या स्त्री-उत्पीडक चारित्र्याविरोधात सतत आवाज बुलंद करेल आणि स्त्री उत्पीडनाच्या घटनांविरोधात निर्धाराने मोर्चा उभा करेल.
11) नौजवान भारत सभा इंग्रजी भाषेच्या वसाहतिक वारशा विरोधात तसेच इंग्रजीपणाच्या जनविरोधी कुलीन संस्कृतीविरोधात सतत संघर्ष करेल. ती शिक्षण, शासन आणि न्यायपालिकेचे काम भारतीय भाषांच्या माध्यमातून होण्यासाठी तसेच सर्व भारतीय भाषांना समान दर्जा देण्यासाठी संघर्ष करेल.
12) नौजवान भारत सभा देशातील विविध राष्ट्रीयतांंच्या दमन-उत्पीडनाचा विरोध करते आणि त्यांच्या न्यायपूर्ण संघर्षांचे समर्थन करते तसेच त्यांच्या आत्मनिर्णयाच्या लोकशाही अधिकाराला पूर्णत: न्यायोचित मानते. सोबतच, ती भाषा आणि क्षेत्र याआधारावर जनतेला आणि तिच्या संघर्षांना विभाजित करण्याच्या प्रत्येक षडयंत्राला तीव्र विरोध करते, तसेच युवकांना आवाहन करते की त्यांनी आपल्या देशव्यापी एकजुटतेला पोलादी बनवण्यासोबतच व्यापक कष्टकरी जनतेला सुद्धा भाषिक आणि क्षेत्रीय संकुचित वाटणीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी प्रत्येक शक्य तो प्रयत्न करावा.
13) जीवनावर नितांत प्रेम करणारे लोकच चांगल्या जीवनाचे स्वप्न पाहू शकतात आणि त्याला साकार करण्यासाठी सर्व प्रकारचे बलिदान देऊ शकतात. सामाजिक क्रांतीच्या युवा सेनापतींसाठी गरजेचे आहे की ते शारीरिक आणि मानसिक रित्या स्वस्थ असतील, पोलादी-शिस्त आणि अतूट एकतेसोबतच स्फूर्ती, जीवंतता, पुढाकार आणि सर्जनात्मक उर्जेने भरलेले असावेत. या उद्देश्याने नौजवान भारत सभा तरुणांसाठी नियमितपणे खेळ आणि शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करेल, स्वयंसेवी पथकं तयार करेल, उत्पादक कारवायांमध्ये, शिल्प आणि कलेच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन करेल, वेळोवेळी पर्यटन यात्रांच्या कार्यक्रमांचे आयोजन करेल तसेच राजकीय चेतनेसोबतच युवक कार्यकर्त्यांसाठी सांस्कृतिक स्तरोन्नयनाचे विविध कार्यक्रम हाती घेईल.
14) नौजवान भारत सभा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात साम्राज्यवाद आणि देशी भांडवली व्यवस्थेविरुद्ध उभ्या ठाकलेल्या सामान्य जनतेच्या प्रत्येक संघर्षाला समर्थन देईल आणि त्याला शक्य ते सर्व सहाय्य करेल. कष्टकरी आणि सामान्य मध्यमवर्गीय जनतेच्या प्रत्येक न्याय्यपूर्ण संघर्षाला समर्थन आणि त्यामध्ये भागिदारी नौजवान भारत सभा आपले कर्तव्य आणि दायित्व मानते. नागरि स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांच्या प्रत्येक आंदोलनासोबत नौजवान भारत सभा आपली झुंझार एकजूट जाहीर करत आहे आणि त्यामध्ये सक्रिय सहकार्याचे वचन देत आहे.
15) ‘तरुणांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे’, ‘त्यांनी देशाची चिंता सोडून आपल्या करियर वर लक्ष्य दिले पाहिजे’ अशा विचारांना नौजवान भारत सभा पूर्णपणे नाकारते. सामान्य जनतेचे शूर तरूण मुले-मुलीच कोणत्याही देश आणि समाजाचे भाग्य विधाते आणि भविष्य निर्माते असतात हे एक इतिहास सिद्ध सत्य आहे. तरुणांचे अराजकियीकरण आणि समाजविन्मुख आत्मग्रस्तततेच्या सडलेल्या विचारांचा प्रचार करणारे बुद्धिजीवी वस्तुत: सत्ताधारी जमातींची भाड्याची खेचरं आहेत, जी युवक समुदायाला एका चांगल्या भविष्यासाठी संघटीत संघर्षापासून वेगळे करू पाहत आहेत.
16) नौजवान भारत सभा अ-सरकारी संघटना (एन.जी.ओ.) किंवा स्वयंसेवी संघटनांच्या राजकारणाचा तीव्र विरोध करते, त्यांच्या धोकादायक षडयंत्राविरोधात देशातील तरूणांना सचेत करते, आणि त्यांच्या विरुद्ध व्यापक जनतेला जागृत करण्यासाठी आवाहन करत आहे. मुख्यत: साम्राज्यवाद्यांची अनुदानं आणि देशी भांडवलदारांचे ट्रस्ट व सरकारच्या पैशातून चालणाऱ्या या संघटना (i) भांडवली व्यवस्था (आणि समग्रतेमध्ये जागतिक भांडवलाच्या) ‘सेफ्टी व्हॉल्व’च्या रूपाने काम करतात तसेच सुधारवादी ठिगळ लावण्याच्या नवीन नवीन धूर्त पद्धती अवलंबत असतात (ii) जागतिकीकरणाच्या धोरणांच्या प्रभावामध्ये प्रचंड जनविस्फोटांच्या अनिवार्य परिणती पर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यामध्ये ‘स्पीड ब्रेकर’ चे काम करतात (iii) क्रांतीच्या फळीमध्ये भरतीच्या शक्यतेने भरलेल्या रॅडीकल युवकांना सामाजिक कार्यांच्या आडून भ्रमात ठेवून सुधारवादाच्या दलदलीत अडकवतात, “पगारी सामाजिक कार्यकर्ता” बनवून भ्रष्ट करतात आणि व्यवस्थेमध्ये समायोजित करतात (iv) “विनापार्टी सक्रियतावादा”च्या सडलेल्या विचारांचा प्रचार करत ते तरूणांचे आणि संपूर्ण जनतेच्या चेतनेचे अराजकियीकरण करतात (v) सामाजिक समूह, विविध स्तर, अस्मिता, जातीभेद, लिंगभेद किंवा क्षेत्रीय आधारावर असलेल्या भेदांवर जास्त जोर देऊन समाजातील आधारभूत वर्ग-विभाजनला दृष्टीआड करतात, जनतेच्या वर्ग चेतनेला कुंठित करतात, जन संघर्षांना विखंडीत करतात आणि वर्ग संघर्षाच्या पुढे जाणाऱ्या विकासाला थांबवण्याच्या प्रयत्नांमध्ये भांडवलशाहीची सेवा करतात. (vi) या संघटना जागतिकीकरणाच्या धोरणांचा “मानवीय” चेहरा देण्याचा प्रयत्न करत विविध प्रकारच्या मागासलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाच्या घुसखोरीला व्यापक आणि सघन बनवण्यामध्ये साम्राज्यवादी आंतरराष्ट्रीय संस्थांची अनिवार्य पूरक भुमिका निभावतात. ‘एन.जी.ओ.-सुधारवाद’ खरेतर जागतिक भांडवली व्यवस्थेचा एक ट्रॉजन हॉर्स आहे, ही भांडवली व्यवस्थेची एक नवीन सुरक्षाफळी आहे, हे एक धोकादायक साम्राज्यवादी दुष्टचक्र आहे. मेंढीचे रुप घेतलेल्या या लांडग्याचे वास्तव उघड करणे, याविरोधात तरुणांना आणि संपूर्ण जनतेला सचेत करणे नौजवान भारत सभा आपले एक अतिशय आवश्यक कर्तव्य मानते.
(17) नौजवान भारत सभा त्या विभाजनकारी आणि विघटनकारी शक्तींविरोधात दृढ तडजोडविहीन संघर्षाची घोषणा करते ज्या तरुणांना जात, धर्म किंवा क्षेत्राच्या आधारावर विभागून किंवा या वा त्या भांडवली किंवा नकली डाव्या पक्षाचे शेपूट बनवून युवक आंदोलनाला अशक्त करणाचा किंवा त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही त्या अति-प्रतिक्रियावादी शक्तींविरोधात सुद्धा सतत संघर्षाची घोषणा करतो ज्या धर्मांधता आणि उग्र अंधराष्ट्रवादाचा उन्माद उभा करून निराश-संभ्रमित युवकांना फॅसिस्ट फळ्यांमध्ये सामील करण्याचे षडयंत्र रचत राहतात.
(18) नौजवान भारत सभा फक्त पूर्ण देशातील युवक आंदोलनाच्या एकतेचीच पक्षधर नाही, तर ती संपूर्ण जगातील क्रांतिकारक, पुरोगामी, न्यायप्रिय युवकांच्या सर्व संघर्षांचे समर्थन करते. ती क्रांतिकारक युवकांच्या झुंझार आंतरराष्ट्रीय एकजुटीप्रती आपली जबाबदारी घोषित करत आहे.
(19) जगातील कोणत्याही देशात चालू असलेल्या जनतेच्या साम्राज्यवाद विरोधी संघर्षाला नौजवान भारत सभा आपले समर्थन देत आहे. जेथे कुठेही कष्टकरी जनता आपल्या अधिकारांसाठी भांडवलशाही विरोधात संघर्ष करत असेल, नौजवान भारत सभा तिच्याप्रती आपले समर्थन आणि एकजुट जाहीर करत आहे. नौजवान भारत सभा पूर्ण जगात चालू असलेल्या साम्राज्यवादी लूटीचा विरोध करण्यासोबतच कोणत्याही देशावर साम्राज्यवादी हल्ल्याचा, साम्राज्यवादी घुसघोरीचा आणि सत्तांत्तराच्या षडयंत्राचा, तसेच साम्राज्यवादी युद्धांचाही तीव्र विरोध करते. ती वंशवाद, रंगभेद आणि झायोनिझम सारख्या निकृष्ठ जनविरोधी प्रवृत्तींचाही तीव्र विरोध करते.
—–
फाशीच्या तीन दिवस अगोदर भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी पंजाबच्या गव्हर्नरला लिहिलेल्या आपल्या पत्रात लिहिले होते की त्यांचा संघर्ष भांडवलशाही विरोधात सतत चालू असलेल्या युद्धाचाच एक भाग आहे आणि तो तोपर्यंत चालू राहिल जोपर्यंत शक्तिशाली व्यक्ती, मग ते इंग्रज भांडवलदार असोत वा भारतीय, भारतीय जनतेच्या आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार कायम ठेवतील आणि त्यांचे रक्त शोषणे चालू ठेवतील. पत्रात त्यांनी ही घोषणा केली की: “जर तुमची इच्छा आहे की तुम्ही पाहिजे त्या परिस्थितीला निवडावे, तरी हे युद्ध चालत राहिल. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले जाणार नाही. खुप शक्यता आहे की हे युद्ध भयानक रूप धारण करेल. हे तोपर्यंत समाप्त होणार नाही जोपर्यंत समाजाची वर्तमान संरचना समाप्त होत नाही, प्रत्येक व्यवस्थेमध्ये परिवर्तन किंवा क्रांती होत नाही आणि सृष्टीमध्ये एका नवीन युगाचा सुत्रपात होत नाही.” पत्रामध्ये हा दृढ विश्वास प्रकट केला गेला की : नजिकच्या भविष्यामध्ये हे युद्ध अंतिम रुपात लढले जाईल आणि तेव्हा हे निर्णायक युद्ध असेल.”
आज जेव्हा आपण जागतिक भांडवलशाहीच्या स्थितीचे ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करतो आणि तिच्या संरचनात्मक आर्थिक संकटाचा अंदाज घेतो तेव्हा भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे वरील आकलन एकदम योग्य-नेमके असल्याचे दिसून येते. जगाच्या इतिहासाच्या विकासाची सर्वसाधारण दिशा हे सूचित करत आहे की आपण भांडवलशाहीचे युग नष्ट होण्याच्या शतकात प्रविष्ट झालो आहोत. हे शतक भांडवलाच्या सत्तेविरोधात निर्णायक युद्धाचे शतक आहे. जरी गेल्या शतकातील ऐतिहासिक जागतिक-महायुद्धाच्या पहिल्या चक्रात इतिहासाच्या प्रगतीशील शक्तींची हार झाल्यावर, प्रतिक्रियेच्या उन्मत्त शक्तींची आक्रामकता आज जागतिक स्तरावर शिखराला पोहोचलेली आहे, पण आशिया, लॅटीन अमेरिका, आणि आफ्रिकेच्या विविध देशांमधून आदानाचे संकेत सुद्धा मिळू लागले आहेत. आता तर काळच सांगेल की कोणत्या देशातील युवक येणाऱ्या दिवसांच्या ऐतिहासिक वादळाला एक निश्चित दिशा देऊन सामाजिक क्रांतीमध्ये बदलून टाकण्याचे काम पहिले सुरू करतील. या महान कार्यामध्ये जुपून घेण्यासाठी नौजवान भारत सभा भारतातील सर्व साहसी, स्वाभिमानी आणि पुरोगामी युवकांना आवाहन करत आहे. नौजवान भारत सभा सामान्य जनतेच्या सर्व शूर मुला-मुलींना आवाहन करत आहे –
उठा! जागे व्हा!! पुढे चला!!!
एकजूट व्हा! संघटीत व्हा!! संघर्षाला पुढे न्या!!
भूतकाळातील क्रांत्यांच्या वारशापासून शिका! वर्तमानाचा अभ्यास करा!! नवीन भविष्याचे स्वप्न पहा!!! मुक्तीची नवीन योजना बनवा आणि तिच्यावर अंमल करा!!!!
लंगर पडतो थांबलेल्या उथळ पाण्यात
विस्तृत आणि आश्चर्यकारक सागरावर विश्वास करा
जिथे भरती असते नेहमीच जिवंत
आणि शक्तीशाली धारा असतात स्वतंत्र –
तिथे अनायासच, हे नौजवान कोलंबसा
सत्याचे तुझे नवे विश्व असू शकते !
– शहीद भगतसिंह (नौजवान भारत सभा, लाहोर चे घोषणापत्र)
नौजवान भारत सभा
घटना
(कॉंस्टीट्यूशन)
अनुच्छेद – 1
संघटनेचे नाव
संघटनेचे नाव नौजवान भारत सभा असेल. हिंदी आणि मराठी मध्ये याचे संक्षिप्त रूप नौभास आणि इंग्रजी मध्ये एनबीएस(NBS) असेल.
अनुच्छेद – 2
झेंडा आणि प्रतीक
संघटनेच्या झेंड्याच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असेल. झेंडा उर्ध्वाकार रुपाने (vertically) निळ्या आणि लाल रंगात विभाजित होईल. डावीकडे 1/3 भाग निळा असेल आणि उजवीकडे 2/3 भाग लाल असेल. निळ्या रंगाच्या भागात वरच्या डाव्या कोपऱ्यात लाल रंगाचे तीन पंचकोनातील तारे असतील आणि त्यांच्या खाली सफेद रंगाची आवळलेली/ताणलेली मूठ असेल.
झेंड्याचा निळा रंग युवा उर्जेचे आणि स्वप्नदर्शी सर्जनात्मकतेचे प्रतिक आहे, जेव्हाकी लाल रंग युवकांच्या क्रांतिकारक संघर्षांचे झुंझारपण आणि त्यागभावनेचे प्रतिक आहे. तीन लाल तारे युवकांचे क्रांतिकारक आदर्श, पोलादी एकजूट आणि वैचारिक दृष्टीचे प्रतिक आहेत. सोबतच, हे तीन लाल तारे भांडवलशाहीच्या आणि साम्राज्यवादाच्या विरोधात शहरी आणि ग्रामीण कष्टकरी वर्ग, इतर कष्टकरी गरीब आणि अर्ध-सर्वहारा वर्ग तसेच शहरी आणि ग्रामीण मध्यवर्गाच्या युवकांच्या वर्गीय एकजुटीचे सुद्धा प्रतिक आहे. ताऱ्यांमध्ये पाच कोन संपूर्ण जगातील पाच खंडांच्या क्रांतिकारक युवकांच्या झुंझार एकतेचे प्रतिक आहेत. ताणलेली मूठ युवकांच्या दृढ संकल्पाचे प्रतिक आहे. मुठीचा सफेद रंग क्रांतिकारक युवकांच्या सत्यनिष्ठेचे, साधेपणाचे आणि इमानदारीचे प्रतिक आहे.
अनुच्छेद – 3
लक्ष्य आणि उद्देश्य
(i) साम्राज्यवाद आणि भांडवलशाही विरोधात संघर्ष आणि समाजवादी क्रांतीसाठी युवा समुदायाला (युवक आणि युवती) जागृत, एकजूट आणि संघटीत करणे.
(ii) युवा समुदायाला व्यापक कष्टकरी जनतेच्या जीवन आणि संघर्षांशी जोडणे, त्यांच्या सेवेमध्ये सज्ज करणे, आपल्या मागण्या आणि अधिकारांना घेऊन विविध शोषित वर्गांद्वारे केल्या जाणाऱ्या आंदोलनांना आणि संघर्षांना समर्थन देणे आणि त्यांच्यामध्ये सक्रीय भागिदारी करणे.
(iii) ‘सर्वांसाठी समान शिक्षण आणि सर्वांना रोजगाराच्या समान संधी’ – या मागणीला घेऊन भांडवली व्यवस्थेच्या विरोधात देशव्यापी युवा आंदोलन संघटीत करणे. या दीर्घ प्रक्रियेमध्ये संघर्षाच्या तत्कालीन मुद्यांच्या स्वरूपात भरण-पोषणायोग्य बेरोजगारी भत्त्याची मागणी उचलणे. शिक्षण संस्थांमध्ये ‘सीट कमी करणे आणि फी वाढवणे’ तसेच शिक्षणाच्या कुलीनीकरणाच्या षडयंत्राच्या प्रयत्नांचा विरोध करणे. शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर देशव्यापी, क्रांतिकारक विद्यार्थी-युवा आंदोलन संघटीत करण्यासाठी सतत काम करणे. वर्तमान जनविरोधी, अवैज्ञानिक भांडवली शिक्षण पद्धतीला विरोध करणे, वैज्ञानिक, समाजवादी शिक्षण-प्रणालीसाठी संघर्ष करणे तसेच या उद्देश्याने सक्रिय विद्यार्थी संघटनांना सक्रिय सहयोग करणे.
(iv) सर्व प्रकारच्या सामाजिक-धार्मिक रुढी, अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता, महागडी दिखावटी कर्मकांड, जातीय भेदभावाची संस्कृती, दलित-उत्पीडन आणि त्यांच्याप्रती अपमानजनक व्यवहार, अल्पसंख्यांकांचे दमन, स्त्री-उत्पीडन आणि पुरूष-वर्चस्ववादाची मानसिकता व संस्कृतीचा सतत प्रखर विरोध करणे तसेच त्यांच्या विरुद्ध तडजोडविहीन संघर्ष चालवणे. जात, धर्म, भाषा, क्षेत्रीयता, वंश आणि लिंगाच्या आधारावर केले जाणारे भेदभाव आणि शोषण-उत्पीडनाच्या विरुद्ध संघर्ष चालवेल.
(v) खऱ्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रचार-प्रसार करत त्यांच्यासाठी संघर्ष करणे, सामाजिक-राजकीय संस्थांच्या कारवायांपासून धर्माचे पूर्ण पृथक्करण करण्यासाठी संघर्ष करणे, नागरिकांच्या वेगवेगळ्या खाजगी आस्थांच्या समान स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे.
(vi) नागरी स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांसाठी संघर्ष करणे, तसेच अशा प्रत्येक संघर्षाला यशाशक्ती, सच्च्या दिलाने समर्थन देणे. भांडवली लोकशाहीच्या छळ-कपटाचा आणि खोटारडेपणाचा जनतेमध्ये आणि खासकरून युवकांमध्ये सतत भांडाफोड करणे आणि शिक्षित करत राहणे.
(vii) सर्व भांडवली पक्ष आणि संसदीय डाव्या पक्षांच्या जनविरोधी चरित्राला युवक आणि सर्व जनतेसमोर सतत उघड करणे. प्रत्येक प्रकारचा सुधारवाद, आणि विशेषत: ‘एन.जी.ओ. सुधारवादा’चे वास्तव उघड करणे. एन.जी.ओं.च्या धोकादायक षडयंत्रापासून तरुणांना सावध करणे आणि त्याविरुद्ध संघटीत करणे. धार्मिक कट्टरपंथी फॅसिस्टांविरोधात युवकांना झुंझारपणे एकजूट करणे.
(viii) व्यापक जन-समुदायाला जागृत आणि संघटीत करण्याच्या दीर्घ प्रक्रियेतून गेल्याशिवाय थोड्या लोकांचे शौर्य, बलिदान आणि शस्त्रबळाने त्वरीत क्रांती संपन्न करण्याच्या मध्यमवर्गीय दुस्साहसवादी मानसिकतेचा आणि ‘वीरपूजेच्या’ मानसिकतेपासून युवकांना मुक्त करण्यासाठी त्यांना वैचारिक-राजकीय स्वरूपात शिक्षित करणे आणि क्रांतिकारी जनदिशा लागू करणे.
(ix) युवा समुदायाला वैज्ञानिक जीवन दृष्टी आणि योग्य इतिहास बोधाने सज्ज करणे, त्यांचे सांस्कृतिक स्तरोन्नयन आणि वैचारिक-राजकीय शिक्षण-प्रशिक्षणासाठी सर्व शक्य प्रयत्न करणे. जनतेमध्ये क्रांतिकारक सांस्कृतिक अभियान आणि राजकीय प्रचार-अभियानांसाठी युवकांचे पथक तयार करणे. मानसिक श्रम आणि शारिरीक श्रमामधील अंतरातून जन्मलेल्या मानसिकते विरुद्ध आणि संस्कृती विरुद्ध युवा समुदायाला शिक्षित करणे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना उत्पादक श्रमाशी जोडण्याचा प्रयत्न करणे. युवकांमध्ये आणि सर्व समाजात श्रम संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणे. युवकांना साधे आणि श्रमसाध्य जीवन व्यतित करण्यासाठी तसेच कष्टकरी जनतेमध्ये क्रांतीचा संदेश घेऊन जाण्यासाठी तयार करणे. त्यांच्यामध्ये शिस्त आणि सामुहिकतेसोबतच स्फूर्ती, जिवंतता आणि सर्जनशीलता निर्माण करणे.
(x) राष्ट्रीयतांच्या उत्पीडनाचा विरोध करणे आणि वेगळे होण्यासहीत त्यांच्या आत्मनिर्णयाचा स्विकार करणे.
(xi) शासक वर्गांद्वारे सतत पसरवल्या जाणाऱ्या अंधराष्ट्रवादाचा तसेच जनतेमध्ये फूट पाडणाऱ्या क्षेत्रीय-राष्ट्रीय-भाषिक संंकुचितपणाचा विरोध करणे.
(xii) देशाच्या कोणत्याही हिश्श्यामध्ये न्यायोचित मागण्यांना घेऊन चालणाऱ्या युवक आंदोलनाला समर्थन देणे, समान लक्ष्याला घेऊन सक्रीय युवा संघटनांसोबत संयुक्त मोर्चा बनवणे आणि एकता कायम करण्यासाठी तसेच युवा आंदोलनाच्या देशव्यापी एकजुटतेसाठी सतत प्रयत्न चालू ठेवणे.
(xiii) संपूर्ण जगातील क्रांतिकारक युवा संघटना आणि आंदोलनांसोबत एकजुटता कायम करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण नाते कायम करणे आणि क्रांतिकारक युवकांच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीवर जोर देणे.
(xiv) साम्राज्यवाद आणि भांडवलशाही विरोधात जगातील कोणत्याही कोपऱ्यात विविध रूपांनी चालू असलेल्या जनतेच्या क्रांतिकारक संघर्षांना आणि आंदोलनांना समर्थन देणे.
अनुच्छेद – 4
पायाभूत कार्यक्रम
(i) सामान्य युवकांचे जीवन आणि त्यांच्या समस्यांना ठोस रूपाने समजण्यासाठी वेळोवेळी अभ्यास-पडताळणी आणि सर्वेक्षण करणे, वेगवेगळ्या भागांमध्ये अभ्यास-गट पाठवणे. आपला कार्यक्रम आणि समकालीन वस्तुगत परिस्थितीच्या अभ्यासाच्या आधारावर युवकांच्या मागण्या, प्रश्न आणि गरजांना घेऊन, परिस्थिति, शक्ती आणि चेतनेच्या हिशोबाने आंदोलन संघटीत करण्याचा प्रयत्न करणे.
(ii) जिथेही संघटनेचे युनिट अस्तित्वात आहे, तिथे युवकांमध्ये सैद्धांतिक प्रचार आणि शिक्षण, आंदोलनात्मक प्रचार आणि न्यायोचित मागण्यांना घेऊन आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न सतत चालू ठेवणे.
(iii) आपले लक्ष्य आणि उद्देश्याला अनुरूप, युवक आणि व्यापक सामान्य जनतेच्या समस्या आणि न्यायोचित मागण्यांना संबंधित अधिकारी आणि सरकार समोर सतत ठेवणे आणि स्थानीय पासून ते विभागीय स्तरापर्य़ंत आणि नंतर मोठ्यातल्या मोठ्या स्तरावर झुंझार युवक आंदोलन आणि झुंझार जन-आंदोलन उभे करण्याच्या प्रयत्नात सतत प्रयत्नरत राहणे.
(iv) शिक्षण जगताशी संबंधित मागण्यांवर आंदोलनरत असलेल्या विद्यार्थ्यांना सक्रीय समर्थन देणे, रोजगार आणि शिक्षणाच्या मागण्यांवर क्रमश: जास्तीत जास्त व्यापक आणि जास्तीत जास्त झुंझार विद्यार्थी-युवक आंदोलन उभे करण्याच्या दिशेने प्रयत्न चालू ठेवणे.
(v) आपले कार्यक्षेत्र आणि प्रभावक्षेत्रामध्ये स्वत:स्फूर्त पद्धतीने, न्यायसंगत मागण्यांना घेऊन उभ्या राहिलेल्या युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या कोणत्याही आंदोलनाचे समर्थन करणे आणि त्यामध्ये सक्रीय भागिदारी करत योग्य दिशेने पुढे नेण्याचा प्रत्येक प्रयत्न करणे. न्यायोचित मागण्यांना घेऊन चालू असलेल्या आंदोलनांमध्ये सक्रीय जनपक्षधर शक्तींसोबत किमान सर्वसाधारण सहमतीच्या आधारावर संयुक्त मोर्चा बनवण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न करणे.
(vi) कार्यक्रम किंवा युवा आंदोलनाच्या दिशेबद्दल मतभेद असूनही, सर्व समविचारी क्रांतिकारक युवा संघटनांसोबत आणि क्रांतिकारक विद्यार्थी संघटनांसोबत संयुक्त मोर्चा आणि संयुक्त कारवायांसाठी सतत प्रयत्नरत राहणे तसेच क्रांतिकारक संघटनांच्या देशव्यापी एकजुटतेसाठी सतत प्रयत्नरत राहणे.
(vii) आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेच्या समस्यांना घेऊन स्वत:च्या पुढाकाराने आंदोलन संघटीत करणे, उभ्या असलेल्या आंदोलनांमध्ये भागीदारी करणे तसेच जनतेच्या विविध वर्गांमध्ये आणि गटांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या आंदोलनरत शक्तींसोबत मुद्यांवर आधारित संयुक्त मोर्चा बनवण्याचा प्रयत्न करणे. क्रांतिकारक जनसंघटनांसोबत परिस्थितीनुसार मुद्यांच्या आधारावर दीर्घकालिक किंवा अल्पकालिक संयुक्त मोर्चा बनवण्याचा प्रयत्न करणे.
(viii) आपले उद्देश्य आणि कार्यक्रमांची पत्रके, पुस्तिका, चौक सभा, घरोघर अभियान आणि पदयात्रा इत्यादींद्वारे व्यापक प्रचार करणे, सदस्यता अभियान चालवणे तसेच झुंझार, समजूतदार आणि सक्रिय युवकांना घेऊन पायाभूत युनिट संघटीत करणे.
(ix) आपले उद्देश्य आणि कार्यक्रमाला स्पष्ट करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त मोठ्या स्तरावर युवकांच्या चेतनेचे क्रांतिकारीकरण करण्यासाठी पत्रके-पुस्तिका-पुस्तके तसेच पत्रिकांचे प्रकाशन, पुस्तकालयांची स्थापना करणे, अभ्यास-चक्र, अभ्यास-मंडळ, परिसंवाद, सेमिनार तसेच पुरोगामी बुद्धिजीवींच्या व्याख्यानांचे आयोजन करणे.
(x) युवकांचे सांस्कृतिक स्तरोन्नयन करण्यासाठी युवक आंदोलनाच्या प्रचारात्मक कार्यांमध्ये संस्कृतीच्या उपकरणांना जास्तीत जास्त प्रभावी बनवण्यासाठी सांस्कृतिक शिबिरे, कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करणे.
(xi) युवकांमध्ये आणि संपूर्ण समाजात क्रांतिकारक प्रचार करण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यांना बळ देण्यासाठी सांस्कृतिक प्रचार यात्रा तसेच सांस्कृतिक अभियान आयोजित करणे, नाटक टोळ्या, गायन टोळ्या आणि सांस्कृतिक प्रचार पथकं संघटीत करणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
(xii) जनतेसोबत मिळून मिसळून जाणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्यापासून शिकणे तसेच श्रम संस्कृतीला आत्मसात करण्यासाठी युवकांना प्रेरित करणे आणि क्रांतिकारक युवक आंदोलनाला व्यापक कष्टकरी जनतेशी जोडण्याच्या उद्दिष्टाने शहरी मजूर आणि ग्रामीण गरिबांमध्ये रात्र शाळा, बाल शिक्षण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, आरोग्य आणि चिकित्सा शिबिर इत्यादींचे आयोजन करणे. स्त्रियांचे शिक्षण आणि सामाजिक-राजकीय कारवायांमध्ये त्यांची भागिदारी वाढवण्याच्या उद्दिष्टाने विविध कार्यक्रम आयोजित करणे.
(xiii) दारूबंदी अभियान, हुंडा विरोधी अभियान, जात-पात विरोधी अभियान, धार्मिक अंधविश्वास तसेच रूढींविरोधात अभियान, महिला उत्पीडन विरोधी अभियान इत्यादींना झुंझार सामाजिक आंदोलनाच्या रुपात संघटीत करणे. आपल्या जीवनाचे उदाहरण प्रस्तुत करत समाजातील वाईट गोष्टींचा नकार देण्यासाठी युवकांना प्रेरित करणे, महिला उत्पीडनाच्या घटनांचा संघटीत विरोध करणे. जात-पात तोडक सामूहिक भोजन आणि सामूहिक विवाह कार्यक्रमांचे आयोजन करणे.
(xiv) युवकांमध्ये स्फूर्ती, जागरूकता, जिवंतता, शिस्त, सामुहिकता, सामाजिकता, आरोग्याबद्दल चेतना आणि सर्जनात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाचे कार्यक्रम, शारिरीक शिक्षण आणि व्यायाम, भ्रमण-पर्यटनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. युवकांचे स्वयंसेवी पथकं स्थापित करणे.
(xv) दुष्काळ, पूर, भुकंप अशा नैसर्गिक संकटांच्या आणि रोगांच्या साथींच्या वेळी अभियान चालवून व्यापक जनसहयोग मिळवणे आणि अशा प्रभावित क्षेत्रांमध्ये स्वयंसेवींच्या सहायक टोळ्या पाठवणे. धार्मिक आणि जातीय दंगलींमध्ये तसेच दलित उत्पीडनाच्या घटनांमध्ये उत्पीडीतांच्या बाजूने तसेच त्यांच्या रक्षणासाठी निर्धाराने उभे होणे व सामान्य स्थिती परत आणण्यामध्ये ताकद लावणे.
(xvi) क्षेत्रीय पासून ते राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नांना घेऊन युवकांची संमेलने, सेमिनार इत्यादी आयोजित करणे तसेच विविध प्रश्नांवर प्रचार आणि संघर्षासाठी कार्य योजना तयार करणे.
(xvii) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-युवक संमेलने आणि इतर आयोजनांमध्ये आवश्यकता आणि उपयोगितेनुसार प्रतिनिधीमंडळ पाठवणे.
अनुच्छेद – 5
सदस्यता
कलम-1: सदस्यतेच्या अटी
(i) पंधरा ते चाळीस वर्षे वयाचा कोणताही भारतीय युवक (स्त्री किंवा पुरुष), मग तो/ती कोणत्याही राष्ट्रीयतेचे, धर्माचे, जातीचे किंवा वंशाचे असोत, त्यांची मातृभाषा कोणतीही असो, जर नौजवान भारत सभेच्या घोषणापत्राचा आणि घटनेचा स्विकार करतील, नियमित रूपाने त्याचे वार्षिक सदस्यता शुल्क देतील, तसेच संघटनेचे लक्ष्य आणि उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी घोषित कार्यक्रमानुसार काम करतील तर त्यांना संघटनेची सदस्यता दिली जाऊ शकते.
(ii) संघटनेचे वार्षिक सदस्यता शुल्क दहा रुपये असेल.
(iii) सदस्यता साधारणपणे एका कॅलेंडर वर्षासाठी असेल.
(iv) प्रत्येक सदस्याला अशा एखाद्या संघटनेचा किंवा मंचाचा सदस्य बनण्याचे स्वातंत्र्य असेल, ज्याचे उद्देश्य व्यापक जनतेचे हित आणि नौजवान भारत सभेच्या उद्देश्यांशी विसंगत नसेल.
कलम-2: सदस्यांचे अधिकार
(i) प्रत्येक सदस्याला कोणत्याही दबाव किंवा अटीशिवाय, संघटनेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा किंवा निवडले जाण्याचा अधिकार असेल.
(ii) प्रत्येक सदस्याला आपले पद किंवा संघटनेच्या सदस्यतेचा राजीनामा देण्याचा अधिकार असेल.
(iii) प्रत्येक सदस्याला आपल्या स्थानिक नेतृत्वाच्या समोर आपले मत ठेवण्याचा अधिकार असेल. याच दरम्यान समित्यांच्या माध्यमातून किंवा सरळ केंद्रीय नेतृत्वापर्यंत आपले म्हणणे मांडण्याचा, आपले प्रस्ताव देण्याचा तसेच मतभेद ठेवण्याचा अधिकार असेल.
कलम – 3: सदस्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी
(i) संघटनेच्या घोषणापत्रानुसार संघटनेचे उद्दिष्ट आणि लक्ष्याच्या पूर्ततेसाठी काम करणे, त्यांचा व्यापक प्रचार आणि प्रसार करणे, कार्यक्रमावर अंमलबजावणी करणे तसेच तिच्या आयोजनांमध्ये व आंदोलनांमध्ये हिस्सा घेणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल.
(ii) केंद्रीय सम्मेलन किंवा त्याच्या खालच्या स्तरावरील संमेलन तसेच वरच्या समित्यांचा निर्णय लागू करणे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल.
(iii) संबंधित युनिट किंवा समितीने बहुमताने मान्य केलेला निर्णय लागू करणे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल.
(iv) प्रत्येक सदस्याची जबाबदारी असेल की त्याने संघटनेच्या प्रकाशनांचा अभ्यास करावा आणि त्यांना लोकप्रिय बनवावे.
(v) प्रत्येक सदस्याची जबाबदारी असेल की त्याने एका सच्च्या क्रांतिकारक कार्यकर्त्याप्रमाणे साधे, श्रमशील, शिस्तबद्ध आणि उच्च नैतिक आदर्शांचे जीवन व्यतित करावे, जनतेची सेवा करावी आणि असे कोणतेही काम करू नये जे संघटनेचे हित आणि आदर्शांच्या विपरित असेल.
(vi) प्रत्येक सदस्याचे दायित्व आहे की त्यांनी अशा कोणत्याही राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ नये जो संघटनेचे उद्दिष्ट आणि कार्यक्रमाच्या विपरित असेल.
अनुच्छेद – 6
संघटनेचे नियम आणि संघटनेची संरचना
कलम-1: संघटनेचे नियम
(i) संघटनेमध्ये प्रत्येक स्तरावर व्यक्ती समुहाच्या अधिनस्थ असतील.
(ii) खालील समित्या वरील समित्यांच्या अधिनस्थ असतील.
(iii) संपूर्ण संघटना केंद्रीय समितीच्या अधिनस्थ असेल.
कलम-2: संघटनेची संरचना
(i) केंद्रीय संमेलन
(ii) केंद्रीय परिषद
(iii) केंद्रीय कार्यकारिणी
(iv) राज्यांच्या अथवा निश्चित भूक्षेत्राच्या आधारावर संघटीत युनिट्स आणि त्यांच्या समित्या
(v) पायाभूत युनिट्स
अनुच्छेद – 7
संघटनेची कार्य पद्धत आणि मंडळं तसेच पदाधिकाऱ्यांची अधिकार व कर्तव्ये
कलम-1: केंद्रीय संमेलन
(i) केंद्रीय संमेलन संघटनेची सर्वोच्च अधिकार-मंडळ असेल.
(ii) केंद्रीय संमेलन सामान्यत: दर तीन वर्षांनी होईल.
(iii) केंद्रीय संमेलनाची वेळ, जागा आणि कार्यसूचीचे निर्धारण केंद्रीय परिषद करेल.
(iv) केंद्रीय परिषदेद्वारे कोणत्याही विशेष परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास किंवा संघटनेच्या कोणत्याही स्तरावर साठ टक्के किंवा अधिक समित्या किंवा साठ टक्के किंवा अधिक पायाभूत युनिट्स किंवा साठ टक्के सदस्यांच्या मागणीवर कधीही संघटनेचे विशेष संमेलन बोलावले जाऊ शकते.
(v) सामान्यत: केंद्रीय परिषदेद्वारे केंद्रीय संमेलनाची अधिसूचना तीन महिने अगोदर काढली जाईल. विशेष परिस्थितींमध्ये हा काळ 45 दिवसांचा असू शकतो. विशेष संमेलनाची अधिसूचना केंद्रीय परिषदेद्वारे कमीत कमी 30 दिवस अगोदर दिली जाईल.
(vi) संमेलनासाठी प्रतिनिधींची निवड सर्व पायाभूत युनिट्सद्वारे केली जाईल. प्रतिनिधी निवडीच्या समप्रमाणाचा मानदंड (म्हणजे किती सदस्यांमागे एक प्रतिनिधी निवडला जावा) याचा निर्णय केंद्रीय परिषद करेल.
(vii) केंद्रिय परिषदेचे सर्व सदस्य संमेलनाचे पदसिद्ध प्रतिनिधी असतील, ज्यांना मतदानाचा अधिकार असेल.
(viii) केंद्रिय संमेलनाचा कार्यकाळ सामान्यत: तीन दिवसांचा असेल. विशेष परिस्थितीमध्ये केंद्रीय परिषद याला दोन दिवसांचाही करू शकते. विशेष संमेलनाचा कार्यावधी आवश्यकतेनुसार एक ते तीन दिवस असू शकतो.
(ix) केंद्रिय संमेलन अगोदरच्या संमेलनापासून त्यावेळापर्यंतच्या कामांची समीक्षा करेल, भविष्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम ठरवेल, आर्थिक अहवालाचे परिक्षण आणि समीक्षा करेल तसेच पुढील संमेलनापर्यंत आर्थिक धोरण बनवेल, बजेट ठरवेल, केंद्रीय परिषदेची निवड करेल, तसेच आवश्यकता भासल्यास घटनेत दुरूस्ती करेल.
कलम-2: केंद्रिय परिषद
(i) केंद्रिय परिषद दोन केंद्रिय संमेलनांच्या दरम्यान संघटनेचे सर्वोच्च धोरण-निर्धारक मंडळ असेल.
(ii) केंद्रिय परिषदेची दर सहा महिन्याला बैठक होईल.
(iii) केंद्रिय परिषदेचे एकूण सतरा सदस्य असतील. तिला कोणत्याही सदस्याचे निष्कासन, पदत्याग किंवा निधनाच्या स्थितीमध्ये नवीन सदस्याला स्वीकृत (को-ऑप्शन) करण्याचा अधिकार असेल.
(iv) केंद्रिय परिषदेच्या कोणत्याही बैठकीसाठी किमान नऊ सदस्यांचा कोरम पूर्ण होणे अनिवार्य असेल.
(v) पुढील निवडणूकीच्या 48 तासांच्या आत केंद्रिय परिषदेद्वारे केंद्रिय कार्यकारिणीची निवडणूक अनिवार्य असेल.
कलम-3: केंद्रिय कार्यकारिणी
(i) केंद्रिय कार्यकारिणी दोन केंद्रिय संमेलनांच्या दरम्यान संघटनेचे सर्वोच्च कार्यकारी मंडळ असेल.
(ii) केंद्रिय कार्यकारिणीचे एकूण सात सदस्य असतील, ज्यांची निवड केंद्रिय परिषद आपल्या सदस्यांमधून करेल. केंद्रिय परिषदेला आवश्यक वाटल्यास केंद्रिय कार्यकारिणीच्या कोणत्याही सदस्याकडून ती राजीनामा घेऊ शकेल.
(iii) केंद्रिय परिषदेच्या दोन बैठकांदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर अंमल करण्याची जबाबदारी केंद्रिय कार्यकारिणीची असेल. संघटनेच्या सर्व केंद्रिय प्रकाशनांची तसेच आवश्यकतेनुसार संपादक किंवा संपादक मंडळ नियुक्त करण्याची जबाबदारी केंद्रिय कार्यकारिणीची असेल.
(iv) केंद्रिय कार्यकारिणी प्रत्येक तीन महिन्याला नियमित रूपाने बैठक करेल. आवश्यकता भासल्यास एका आठवड्याच्या नोटीसवर ती आपली विशेष बैठक बोलावू शकेल. आपत्कालीन बैठक दोन दिवसांच्या अधिसूचनेवर कधीही बोलावली जाऊ शकेल. बैठकीत कोरमसाठी पाच सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.
(v) प्रत्येक केंद्रिय संमेलनानंतर, नवीन केंद्रिय परिषदेकडून निवड झाल्यानंतर 24 तासांच्या आत केंद्रिय कार्यकारिणी आपल्यामधून खालील पदाधिकाऱ्यांची निवड करेल. (अ) अध्यक्ष (ब) उपाध्यक्ष (क) महासचिव (ड) कोषाध्यक्ष
(vi) आवश्यकतेनुसार केंद्रिय कार्यकारिणी विविध उपसमित्या स्थापन करू शकते किंवा आपल्यामधून किंवा खालच्या समितितून एखाद्या सदस्याला विशेष जबाबदारी देऊ शकते. केंद्रिय कार्यकारिणीला आपल्या एखाद्या सदस्याचे निधन, निष्कासन किंवा पदत्यागाच्या स्थितीमध्ये नवीन सदस्याला स्वीकृत करण्याचा अधिकार असेल.
कलम-4: पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या
(i) अध्यक्ष केंद्रिय परिषद आणि कार्यकारिणीच्या बैठकांची अध्यक्षता करेल. त्याच्या/तीच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष ही जबाबदारी सांभाळेल. जर तो/ती सुद्धा अनुपस्थितीत असेल तर ही जबाबदारी बैठकीद्वारे निवडलेला सदस्य निभावेल.
(ii) महासचिव मुख्यालयाच्या कामांसाठी जबाबदार असेल तसेच तिच्या सर्व संपत्ती आणि अभिलेखांचा अभिरक्षक (कस्टोडीयन) असेल. केंद्रिय परिषद आणि केंद्रिय कार्यकारिणीच्या बैठकांसाठी तो/ती कार्यसूची आणि अहवाल तयार करेल तसेच बैठकींमध्ये त्यांना प्रस्तुत करेल. महासचिव प्रत्येक केंद्रिय संमेलनामध्ये, केंद्रिय परिषदेद्वारे मान्य राजकीय-संघटनात्मक अहवाल प्रस्तुत करेल.
(iii) अध्यक्ष आणि महासचिव संघटनेचे प्रतिनिधित्व करतील.
(iv) कोषाध्यक्ष महासचिवाच्या सहाय्यतेने केंद्रिय कोषाचे संचालन करेल, खालील समित्यांचे कोष आणि वित्त-संबंधात धोरणांचे निरिक्षण-परिक्षण करेल, तसेच केंद्रिय परिषद व केंद्रिय कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये तसेच केंद्रिय संमेलनात वित्तीय अहवाल प्रस्तुत करेल.
कलम-5: खालच्या समित्या, त्यांचे संमेलन आणि पायाभूत युनिट्स
(i) राज्यांचे, किंवा संघटनेच्या शक्ति व कामांनुसार ठरवलेल्या निश्चित भूभागाच्या आधारावरील सदस्यांचे, किंवा केंद्रिय परिषदेद्वारे सुनिश्चित समप्रमाणाच्या आधारावर त्यांच्याद्वारे निवडलेल्या प्रतिनिधींचे संमेलन सर्वसाधारणपने केंद्रिय संमेलनानंतर होईल.
(ii) हे संमेलन आपल्या स्तरावरील समिती (जसे राज्य समिती/एरिया समिती/जिल्हा समिती) ची निवड करेल. या समित्या आपल्या स्तराच्या खालील संघटनेला नेतृत्व देतील, केंद्रिय परिषदेच्या दिशा-निर्देशांवर केंद्रिय कार्यकारिणीच्या नेतृत्वात, तसेच आपल्या वरच्या समितीच्या नेतृत्वात संघटनेचे कार्यक्रम आणि धोरणे लागू करतील. आपल्या खालच्या मंडळांच्या कामांच्या अहवालांची समिक्षा करतील आणि त्यांना आवश्यक ते निर्देश देतील व वरच्या समित्यांना आपल्या कामांचा नियमित अहवाल पाठवतील. या समित्यांच्या सचिवांच्या जबाबदाऱ्या त्याच असतील ज्या केंद्रिय स्तरावर अध्यक्ष आणि महासचिवांच्या असतील. त्यांच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी सुद्धा आपल्या स्तरावर तीच असेल जी केंद्रिय स्तरावर कोषाध्यक्षाची असेल. अधिकार, जबाबदाऱ्या, आणि कार्यप्रणालीच्या मामल्यांमध्ये खालील समित्यांच्या रचनेची केंद्रिय कार्यकारिणीशी सामान्य सादृश्यता असेल. कोणत्याही प्रकारे घटनात्मक अडचण निर्माण झाल्यास, किंवा नियमांची अस्पष्टता असल्यास केंद्रिय परिषदेचे दिशा-निर्देश व निर्णय तसेच केंद्रिय परिषदेच्या पुढिल बैठकीपर्यंतच्या अंतरिम कालावधीत कार्यकारिणीचे दिशा-निर्देश व निर्णय अंतिम मानले जातील.
(iii) निश्चित एरियाच्या आधारावर संघटीत सर्वात खालची समिती आपल्या कार्यक्षेत्रात कुठेही कमीत कमी पाच सदस्यांना घेऊन संघटनेची पायाभूत समिती स्थापन करू शकते. या समितीच्या ठीक वरील समितीद्वारे स्विकृतीनंतरच सदर पायाभूत समितीला मान्यताप्राप्त युनिटचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. पायाभूत युनिट आपल्या एका प्रभारीची निवड करेल जो वरील समितीला कामांचा नियमित अहवाल पाठवेल. किती संख्या आणि कामांच्या आधारावर कोणत्या पायाभूत युनिटला किंवा किती पायाभूत युनिट्स मिळून स्थानिक समिती निवडण्याचा अधिकार दिला जावा याचा निर्णय वरील समिती करेल.
(iv) नवीन कार्यक्षेत्रांमध्ये प्रचार आणि संघटनेच्या प्रारंभिक कारवायांना रूप देण्यासाठी केंद्रिय कार्यकारिणी गरजेनुसार, सुनिश्चित एरियाच्या आधारावर काही नवीन आणि काही जुन्या सदस्यांना घेऊन तयारी-समिती गठित करू शकते जी अस्थायी समिती किंवा अस्थायी पायाभूत युनिटच्या रुपाने केंद्रिय कार्यकारिणी किंवा तिच्याद्वारे निर्देशित समितीच्या अधिनस्थ तोपर्यंत काम करेल जोपर्यंत वरिल समिती किंवा केंद्रिय कार्यकारिणी तिला स्थायी मान्यता देत नाही.
(v) केंद्रिय कार्यकारिणीच्या खालील प्रत्येक समिती आणि पायाभूत युनिटच्या बैठकीसाठी 60 टक्के सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.
अनुच्छेद-8
संलग्न सदस्यता
(i) देशाच्या कोणत्याही हिश्श्यामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही युवक संघटनेचे उद्दिष्ट आणि लक्ष्य जर मुलत: आणि मुख्यत: नौजवान भारत सभेच्या उद्देश्य आणि लक्ष्याशी मेळ खात असेल, जर तिच्या आणि नौजवान भारत सभेच्या पायाभूत कार्यक्रमांच्या मुळ बिंदूंमध्ये समानता असेल आणि जर तिचे झुंझार क्रांतिकारक चरित्र दाखवणाऱ्या कारवायांची समाधानकारक माहिती उपलब्ध असेल तर नौजवान भारत सभेची केंद्रिय परिषद तिच्याशी समुचित चर्चा करून तिला संघटनेची संलग्न सदस्यता प्रदान करू शकते, परंतु आगामी केंद्रिय संमेलनाने केंद्रिय परिषदेच्या या निर्णयाची पुष्टी करणे अनिवार्य असेल.
(ii) संलग्न सदस्यता असलेल्या युवक संघटनेचा आपला कार्यक्रम आणि घटना असेल्, परंतु तिच्या केंद्रिय संमेलनामध्ये नौजवान भारत सभेच्या केंद्रिय प्रतिनिधीमंडळाची उपस्थिती आणि वादांमध्ये भागीदारी संलग्न सदस्यतेची अनिवार्य अट असेल.
(iii) नौजवान भारत सभेच्या केंद्रिय संमेलनामध्ये संलग्न संघटनेच्या प्रतिनिधींना उपस्थिती आणि चर्चा व वादांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल परंतु मतदानाचा अधिकार असणार नाही.
(iv) दिशा तसेच कार्यक्रमामध्ये एखादा आधारभूत मतभेद निर्माण झाल्यास किंवा सदर संघटनेच्या क्रांतिकारी चरित्रात क्षरण किंवा विचलन निर्माण झाल्यास तिच्या संलग्न सदस्यतेला रद्द करण्याचा केंद्रिय परिषदेला पूर्ण अधिकार असेल.
(v) संलग्न सदस्यतेची एक अट ही पण असेल की सदर संघटनेने आपल्या कामांचा नियमित अहवाल नौजवान भारत सभेच्या केंद्रिय कार्यकारिणीला पाठवावा आणि संकुचित स्थानियवादी विचलनांपासून पासून मुक्त होऊन देशव्यापी युवक आंदोलनाचे निर्माण आणि संयुक्त कारवायांप्रती एक स्वस्थ्य क्रांतिकारक पवित्रा अवलंबावा.
अनुच्छेद-9
शिस्तभंग कारवाई
(i) नौजवान भारत सभेचे कोणतेही सदस्य वा युनिट जर संघटनेचे लक्ष्य आणि उद्दिष्टांशी प्रतिकूल आचरण करतील, तिच्या कार्यक्रमावर अंमल न करतील तसेच प्रतिकूल आचरण करतील,संघटनेची घटना किंवा नेतृत्वाच्या आदेश-निर्देशांचे उल्लंघन करतील तसेच आपल्या व्यवहारातून संघटनेच्या प्रतिष्ठेला क्षती पोहोचवतील तर संघटनेला त्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाई करण्याचा अधिकार असेल, ज्याअंतर्गत इशारा, निलंबन, निष्कासन अथवा युनिटच्या संदर्भात मान्यता रद्द करणे सामील असेल.
(ii) घटना आणि कार्यक्रमाविरोधात आचरण करणाऱ्या सदस्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाईचा अधिकार संबंधित समिती किंवा केंद्रिय कार्यकारिणीद्वारे अधिकृत संबंधित समितीला असेल. संबंधित समितीला आपल्या प्रत्येक अशा निर्णयाला स्वीकृतीसाठी आपल्या ठीक वरच्या समितीकडे पाठवावे लागेल.
(iii) ज्या युनिटच्या विरोधात शिस्तभंग कारवाई केली जाईल, तिला संबंधित समितीच्या समोर आपले स्पष्टीकरण देण्याची तसेच वरच्या समिती आणि पुन्हा केंद्रिय कार्यकारिणीपर्यंत अपील करण्याचा अधिकार असेल.
(iv) ज्या सदस्या विरोधात निलंबन किंवा निष्कासनाची कारवाई केली गेलेली असेल, त्याला संबंधित समितीच्या समोर, किंवा वरच्या समिती समोर, किंवा केंद्रिय कार्यकारिणीकडे सरळ अपील करण्याचा अधिकार असेल.
(v) संघटनेचे लक्ष्य आणि हितांविरोधात काम करण्याच्या स्थितीमध्ये केंद्रिय कार्यकारिणीला खालील एखाद्या समिती, एखादी स्थानिक समिती, किंवा एखाद्या पायाभूत युनिटची मान्यता रद्द करण्याचा अधिकार असेल. स्थानिक समितीच्या वरील समितीची मान्यता रद्द करण्याच्या स्थितीमध्ये केंद्रिय कार्यकारिणीसाठी केंद्रिय परिषदेकडून आपल्या निर्णयाचे अनुमोदन प्राप्त करणे आवश्यक असेल. केंद्रिय कार्यकारिणी एखाद्या समितीची मान्यता रद्द केल्या जाण्याच्या स्थितीत, तिच्या ठिक वरच्या समितीचा किंवा त्याहीपेक्षा वरच्या समितीचा सल्ला घेऊन सदर समिती पुनर्गठीत करू शकते.
अनुच्छेद-10
घटना-दुरूस्ती
(i) घटनेत बदल किंवा दुरूस्ती करण्याचा अधिकार फक्त केंद्रिय संमेलनाला असेल.
(ii) कोणत्याही युनिटद्वारे किंवा त्याच्या कोणत्याही सदस्यांद्वारे घटनेमध्ये एखादी दुरुस्ती प्रस्तावित झाल्यावर तिची सूचना केंद्रिय कार्यकारिणीच्या संमेलनाला कमीत कमी तीन महिने अगोदर द्यावी लागेल. जर केंद्रिय कार्यकारिणी स्वत: एखादी दुरुस्ती प्रस्तुत करू इच्छिते तर त्याची सुचना केंद्रिय परिषदेला आणि आपल्या ठीक खालच्या समितीला कमित कमी तीन महिने अगोदर द्यावी लागेल.
(iii) घटना-दुरूस्ती संदर्भात कोणत्याही महत्वपूर्ण प्रस्तावाचा मसुदा राष्ट्रीय कार्यकारिणीद्वारे संमेलनाच्या अगोदर सर्व पायाभूत युनिट्सला विचारार्थ नक्कीच पाठवला जाईल.
(iv) केंद्रिय संमेलनामध्ये अगोदरच्या केंद्रिय कार्यकारिणी सोबतच प्रत्येक प्रतिनिधीला घटनेत कोणतीही दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार असेल, परंतु कोणत्याही दुरूस्तीला तेव्हाच स्विकृत मानले जाईल, जेव्हा संमेलनात उपस्थित प्रतिनिधींच्या दोन तृतीयांश द्वारे त्याला पास केले जाईल.
अनुच्छेद-11
नियम-उपनियम
(i) घटनेच्या चौकटीमध्ये, वेळोवेळी आवश्यक नियम-उपनियम बनवण्याचा अधिकार केंद्रिय कार्यकारिणीला असेल, परंतु केंद्रिय परिषदेच्या पुढील बैठकीद्वारे त्याचे अनुमोदन होणे आवश्यक आहे.
—-
26-27-28 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्लीत झालेल्या नौजवान भारत सभेच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनात निवडले गेलेले विविध मंडळांचे सदस्य:
नौभासच्या केंद्रिय संमेलनात निवडली गेलेली केंद्रिय परिषद
- अंगद 2. योगेश 3. अपूर्व 4. श्वेता 5. अरविंद 6. विराट 7. रमेश 8. छिंदरपाल 9. सुशील 10. वारूणी 11. नितिन 12. निशू 13. कुलविंदर 14. मानव 15. प्रसेन 16. अक्षय 17. विशाल
केंद्रिय परिषदेद्वारे निवडल्या गेलेल्या केंद्रिय कार्यकारिणीचे सदस्य
- अपूर्व 2. छिंदरपाल 3. अरविंद 4. निशू 5. श्वेता 6. अंगद 7. योगेश
केंद्रिय कार्यकारणीद्वारे निवडलेले संघटनेचे पदाधिकारी
अध्यक्ष: अरविंद महासचिव: छिंदरपाल
उपाध्यक्ष: योगेश कोषाध्यक्ष: श्वेता
नौजवान भारत सभेचे केंद्रिय कार्यालय:-
पत्ता: पत्ती लहणा, पक्खोवाल, लुधियान, पीन: 141108, पंजाब.
संपर्क
फोन 09888401288 (महासचिव) 08010156365 (अध्यक्ष)
ईमेल: nbs.bharat@gmail.com
फेसबुक पेज: www.facebook.com/naujavanbharatsabha
ब्लॉग: www.naujavanbharatsabha.wordpress.com
जरूरत आहे निरंतर संघर्ष करण्याची, कष्ट सहन करणे आणि त्यागाने संपन्न जीवन जगण्याची. आपल्या व्यक्तीवादाला पहिले समाप्त करा. व्यक्तिगत सुखाचे स्वप्न उतरवून एका बाजूला ठेवा आणि पुन्हा काम सुरू करा. इंच-इंच भर तुम्ही पुढे जाल. यासाठी हिंमत, दृढता आणि खुप मजबूत इराद्यांची गरज आहे. कितीही अवघड कष्ट आणि अडचणी असोत, तुमची हिंमत ढळता कामा नये. कोणत्याही पराजयाने किंवा धोक्याने तुमचे मन तुटता कामा नये. कितीही कष्ट येवोत, तुमचा क्रांतिकारक जोश थंड पडता कामा नये. कष्ट सहन करून आणि त्याग करण्याच्या सिद्धांतापासून तुम्ही यश प्राप्त कराल आणि हे व्यक्तिगत यश क्रांतीची अमूल्य संपत्ती असेल.
– शहीद भगतसिंह (क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा)