शहीदे आजम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या 86 व्या शहीद दिनानिमीत्त 15 दिवसीय शहीद स्मृती अभियान
शहीदों के जो ख़्वाब अधूरे, इसी सदी में होंगे पूरे!
इसी सदी में नये वेग से, परिवर्तन का ज्वार उठेगा!!
हम समय के युद्धबन्दी हैं
युद्ध तो लेकिन अभी हारे नहीं हैं हम।
लालिमा है क्षीण पूरब की
पर सुबह के बुझते हुए तारे नहीं हैं हम।
————————-
चलो, अब समय के इस लौह कारागार को तोड़ें
चलो, फि़र ज़िन्दगी की धार अपनी शक्ति से मोड़ें
पराजय से सबक लें, फि़र जुटें, आगे बढ़ें फि़र हम!
-शशिप्रकाश
मित्रांनो, आज आपण अशा काळात,अशा परिस्थितीत जगत आहोत जिथं प्रतिक्रियावादी शक्ती चहू बाजूंनी हल्ले करताहेत.निराशेच्या अंधारानं अनेकांच्या मनाचा जणू ताबा घेतलाय. जनतेच्या हाल-अपेष्टांना पारावार उरला नाही. लोकांनी संघटीत होऊन संघर्ष करू नए यासाठी अगदी पद्धतशीरपणे धार्मीक कट्टरता, सांप्रदायिकता व “अंधराष्ट्रवादाच्या’’ रूपानं लोकांच्या मन आणि मेंदूमध्ये विष कालवलं जात आहे. वैज्ञानिक, तार्कीक, प्रगतीशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांवर संघटीत हल्ल्यांची जणू मालिकाच सुरू आहे. दुसरीकडे, हर तऱ्हेच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तरुणांची हृदय मात्र यावेळी बर्फासारखी थंड आहेत. उज्वल भविष्यासाठी उच्च भरारी घेणारे पंख चिखलान माखले आहेत. अशावेळी भगतसिंहाच्या शब्दांत, “क्रांतीची स्पिरीट ताजा करण्यासाठी, मानवतेच्या अंतरात्म्यात हालचाल पैदा व्हावी’’ म्हणून आपण शहीदे-आजम भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी त्यांच्या स्वप्नांना स्मरून त्यांना पूर्ण करण्यासाठी तरुणांचे आवाह्न करत आहोत.
भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच काय स्वप्न होत?
भगतसिंहाच स्वप्न फक्त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं मर्यादीत नव्हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्यवस्थाच इतिहासाच्या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच भगतसिंह म्हणाला होता की ‘आम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या शोषणाच्या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्यांच्या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्यांचा उद्देश ‘लुट करण्याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्यामुळे यांच्या लढ्याचा अंत कुठल्या ना कुठल्या सांमजस्यात, तडजोडीच्या रुपांत होईल’. भगतसिंहाने 1926, जून 6 रोजी दिल्ली सेशन जज लिओनार्डो मिडिलटनच्या न्यायालयांत ऐतिहासिक शब्दांत सांगितल की “क्रांतीचा आमच्या अर्थ मुठभर एैतखाउद्वारे सामान्य जनतेच्या मेहनतीच्या लुटीवर आधारीत,अन्यायपुर्ण प्रस्थापित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होय. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्या इतके देखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.” भगतसिंहाने पूर्वीच्या एच.आर.ए. संघटनेला फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्या क्रांतीकारकांच्या बैठकीत, 1928 मध्ये, संघटनेच्या नावात “सोशालिस्ट’’ शब्द जोडून एका समतामूलक समाज निर्मीतीला संघटनेचा उद्देश म्हणून घोषित केले.
भगतसिंह व त्याचे सहकारी असा समाज बनवू इच्छित होते, ज्याच्यात धर्माच्या नावावर झगडे होणार नाहीत. भगतसिंहाने जेव्हा देशांतील युवकांना संघटीत करण्यासाठी ‘नौजवान भारत सभा’ सुरू केली होती, तेव्हा या गोष्टी बाबत विशेष लक्ष दिले होते. भगतसिंहाची संघटना तीच्या जन्मापासूनच धर्मनिरपेक्ष संघटना होती. तरुणांमध्ये जातीय आणि धार्मिक फूट पडू नए म्हणून विचारांच्या प्रचार,प्रसारा सोबतच सहभोजनाचेही कार्यक्रम नेहमी आयोजित केले जात. इंग्रज एका बाजूला स्वातंत्र्याची लढाई कमजोर करण्यासाठी हिंदू-मुस्लिमांना परस्परांशी लढवत होते, तर दुसऱ्या बाजूला ‘हिंदू महासभा’ आणि ‘तबलीगी जमात’ सारख्या कट्टरपंथी संगठना सुद्धा हिन्दू-मुस्लिम वाद उभे करून इंग्रजांना मदतच करत होत्या. भगतसिंह मात्र लोकांनी परस्परांशी लढू नए म्हणून लोकांमध्ये वर्गचेतना निर्माण करण्यावर अधिक भर देण्याची गरज प्रतिपादन करतात. ते म्हणत होते की – “गरीब, कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजे, की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या कावेबाजी पासून स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे. त्यांच्या तावडीत अडकून काहीही करता कामा नये.” भगतसिंहासारख्या क्रांतीकारकाच्या विचारांना भारतीय शासक वर्गाने नुसतं धुळीत आणि राखेखाली गाडून टाकण्याचा कट रचला एवढच नव्हे तर त्यांना बंदूक पिस्तुलवाल्या तरुणांच्या रूपांत जनतेमध्ये प्रस्थापित केलं. खरंतर त्यांच्या आरंभीच्या काही दिवसांना सोडलं, तर भगतसिंह जनतेला जागृत करून तीच्या व्यापक संघटनेच्या जोरावरच क्रांती करण्याचे समर्थक होते. जेलमधून विद्यार्थांच्या नावे पाठवलेला पत्रांत भगतसिंह लिहतात “सद्यःस्थितीत आम्ही तरुणांना असे सांगू शकत नाही, की त्यांनी बाॅम्ब आणि पिस्तुले हातात घ्यावीत. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षाही अधिक महत्त्वाची कामे आहेत… क्रांतीचा हा संदेश तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा आहे. गिरण्या कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्या यामध्ये राहणाऱ्या कोट्यावधी लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहिजे. त्यातूनच स्वातंत्र्यप्राप्ती होईल आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे होणारे शोषण अशक्य होऊन जाईल.”
भगतसिंहाने देशी-विदेशी लूटीला संपवणे आपलं उद्दीष्ट बनवलं होत. फाशी जाण्यापूर्वी तीन दिवस, पंजाब गवर्नरला लिहीलेल्या पत्रांत त्यांनी म्हटलं की, “साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीचे दिवस भरले आहेत.थोड्या दिवसांत हे युध्द अंतिम स्वरूपात लढवलं जाइल.याच युद्धात आम्ही प्रत्यक्ष भाग घेतला आहे. या युद्धाची ना सुरूवात आम्ही केली, ना आमच्या जीवनाबरोबर ते संपणार आहे.”
हे कसलं स्वातंत्र्य, हे कुठलं स्वातंत्र्य
जनतेसाठी लूट अन् बरबादीचं षडयंत्र
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांत शासक वर्गाने जनतेला हळूहळू दारिद्रयाच्या खाणीत ढकललं आहे. तथाकथित ‘विकास’ असा आहे की देशांतल्या वरच्या 1 टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा 58.4 टक्के हिस्सा केंद्रित झालाय तर, वरच्या 10 टक्के लोकसंख्येकडे हा आकडा 80.7 टक्के पर्यंत पोहचलाय. दुसऱ्या बाजूला खालच्या 50 टक्केे लोकसंख्येकडं एकुण संपत्तीच्या फक्त 1 टक्के संपदा आहे. देशांतील गोदामांत अन्न सडत आहे आणि तरीही प्रतीदिनी जवळ जवळ 9000 मुलं कुपोषण आणि इतर आरोग्या संबंधी समस्येमुळं जीव गमावत आहेत. युनीसेफच्या अहवालानुसार कुपोषणाचा बळी असलेलं जगातील प्रत्येक तीसरं मुलं हे भारतीय आहे. 50 टक्के स्त्रीया रक्ताच्या कमतरतेच्या बळी आहेत. ‘जनसंख्या स्थिरता कोष’ नुसार 100000 मध्ये 167 महीलांचा प्रसुती दरम्यान मृत्यु होतो. सरकारी धोरणापायी होणारा मृत्यु आतंकवादी घटनांत होणाऱ्या मृत्युच्या तुलनेत कैक हजार पट जास्त आहेत. पण या मृत्युवर मीडिया आणि नेत्यांद्वारे मौनाचा कट केला जातो. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होण्यापूर्वी असं सांगण्यात आलं की दरवर्षी सरासरी 90 लाख लोक पोटापाण्यासाठी घर सोडून प्रवासी बनताहेत. ज्यातले बहुतकरून मुंबई, तिरूपूर, दिल्ली, बंगलुरू, लुधियाना इत्यादीतील गलीच्छ आणि आजारानी गच्च भरलेल्या झोपडपट्टयांमध्ये सामावले जातात. आकड्यांनुसार देशांतली जवळजवळ 36 कोटी लोकसंख्या झोपड़पट्टयां आणि फुटपाथवर राहायला मजबूर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये 6 कोटी स्वस्त घरे बनवण्याची घोषण केली.पण जून 2015 मध्ये यांतून मागे फिरत 2022 पर्यंत 2 कोटी घरे बनवण्याची घोषणा केली, म्हणजेच दरवर्षी 30 लाख घरे बनवणे होय. पण लगेच जूलै 2016 मध्ये लक्षात आलं की 1 वर्षात फक्त 19255 घरेच बनलीत. अशाच तऱ्हेने दरवर्षी 2 कोटी नवे रोजगार निर्माण करण्याचा दावा सुद्धा उघडा पडतो. बेरोजगारीचा दर मागच्या वर्षीच्या तुलनेत सतत वाढत जाऊन 2015-16 मध्ये 7.3 टक्के पर्यंत पोहचला. देशांतील तब्बल 30 कोटी लोकं बेरोजगारीचे धक्के खातं आहेत. जनतेच्या सोयी-सुविधांमध्ये सातत्यानं कपात केली जात आहे, तर बड्या श्रीमंताचे अरबो रूपयांचे कर्ज ‘राइट ऑफ’ (वास्तवत: माफ) केले जात आहेत. जनतेला भटकवण्यासाठी तमाम तऱ्हेची नाटकं केली जात आहेत. नोटबंदीच नाटक अगदीच ताज आहे. बिकावू मीडियाने याचे खुप कौतुक सोहळे केले पण ‘ऑल इंडिया मॅनुफैक्चरींग आर्गनायझेशनच्या’ सर्वेनुसार नोटबंदीनंतर लगेच 34 दिवसांमध्येच जवळजवळ 35 टक्के श्रमिकांना आपली उपजिवीका गमवावी लागली होती. मार्च 2017 पर्यंत तर हा आकडा 60 टक्के पर्यंत पोहचला असणार असा अंदाज आहे. नव्या नोटा छापण्यासाठी तब्बल 15 ते 20 हजार कोटी रू. खर्च येणार. जगजाहीर आहे की जनतेलाच हा भार सोसावा लागणार. मोदीने सत्तेवर येताच, उरल्यासुरल्या पब्लिक सेक्टरलाही लुटारूंना विकायला सुरूवात केली. (अर्थात स्वातंत्र्यनंतर जसा आर्थिक विकासाचा मार्ग आपण स्विकारला , त्याची हिच परिणीती होणार होती). स्टेशनवर चहा विकायच सोंग रचून आता स्टेशनच खाजगी क्षेत्रांत विकूण टाकले आहे. त्याची सुरुवात हबीबगंज रेल्वे स्टेशन (मध्यप्रदेश) पासून करण्यात आली आहे. पुढे अजून 400 रेल्वे स्टेशन PPP (प्राइव्हेट पब्लिक पार्टनरशीप) च्या हवाली करण्याचा बेत आहे.
भगतसिंहाच स्वप्न, इलेक्शन नव्हे इंकलाब
साथीनो, निवडणूकींतून ही परिस्थिती बदलणार नाही. गेल्या 65-66 वर्षांमध्ये आपण सतत या ना त्या सोंगाड्यांना निवडत आलोत. पण पळसाला पानं तीनच. सापनाथ जातो आणि नागनाथ येतो. जर निवडणूकीतून काही बदलणार असतं तर इतकी वर्षे खुप होती. वास्तवत: संपूर्ण व्यवस्थाच अशी आहे की जिच्यात सामान्य माणसाचं भलं कधीच होऊ शकत नाही. हे एका उदाहरणांतून समजून घेऊयात. आताच उत्तर प्रदेशच्या निवडणूकां झाल्या आणि भाजपा सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर आली. निवडूण आलेल्या पैकी जवळ जवळ 116 जणं हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. सोबत 253 जण करोडपती आहेत. खरंतर प्रत्येक विधानसभा परिक्षेत्रात लाखो लोक असतात, तरी इच्छा असूनही एक ही सामान्य माणूस निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढवतात ते फक्त पैसेवाले, गुण्ड, माफिया आणि त्यांना मदत करतात भांडवलदार, ठेकेदार, मोठे व्यापारी. त्यामुळे कुठलीही पार्टी असो, अशी अपेक्षाच व्यर्थ आहे की ती सामान्य लोकाचं काम करेल. ती सर्वप्रथम अशाचं लोकांसाठी काम करेल ज्यांनी निवडणूकींत त्यांच्यासाठी पैसा ओतला होता. मग जर अशी माणसं निवडून जातील तर मग नियम-कायदे सुद्धा श्रीमंतांच्याच हीताचे बनवतील. हेच कारण आहे की श्रीमंत अजून श्रीमंत होतोय तर गरीब अजून गरीब होत चाललाय. ही नोकरशाही, न्यायालये, नेताशाही सगळे श्रीमंतांच्या हीतासाठी काम करत असतात. त्यामुळे या यंत्रणेकडून जनतेनं काही अपेक्षा करने निरर्थक आहे. भगतसिंह म्हणाला होता, “प्रत्येक माणसाला आपल्या श्रमाचे फळ उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रत्येक राष्ट्र आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे पूर्ण मालक आहे. जर कोणतेही सरकार जनतेला तिच्या या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत असेल, तर असे सरकार नष्ट करणे हा जनतेचा केवळ अधिकारच नव्हे, तर तिचे ते आवश्यक कर्तव्यदेखील बनते.”
मीडियाला लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते. पण मीडिया लूटीच्या तंत्राचा चौथा खांब बनुन काम करत आहे. याचा अर्थ असा आहे की मीडिया बड्या श्रीमंताच्या ताब्यात आहे. जसे, झी न्यूज भाजपाचा राज्यसभा सदस्य सुभाष चंद्राचा आहे, हिंदुस्तान पेपर बिरलाचा आहे, राष्ट्रीय सहारा सुब्रत रॉय चा आहे इत्यादी. या चॅनल आणि पेपर कडून काय अपेक्षा ठेवणार, काय ही माध्यमे जनतेला सत्य सांगतील? वस्तुंच्या जाहीरांतीसाठी अश्लीलता, उथळपणा, चित्रपटांच्या नावाने मारामारी, कार्य्रकमांच्या नावाखाली पुढाऱ्याची प्रतिमा उजळवून घेणं, सांप्रदायिक घटनांना असे दाखवणे कि जणू जनतेमध्ये वाढती द्वेष भावना एक सामान्य बाब झाली आहे. मीडियाची काही एक विश्वासार्हता आज शिल्लक राहीली नाही.
फासीवादाचा उन्माद
आज सारी दुनिया आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाच्या पायावरच सर्व जगभरात व आपल्या देशांतही फासीवादाचे संकट जोरावर आहे. हिटलर आणि मुसोलिनीने रचलेल्या विनाशलीले नंतर पहील्यांदाच सगळं जग फासीवाद व त्याची भयावहता अनुभव आहे. खरं तरं भांडवलदारांद्वारे निर्माण केले गेलेल्या आर्थिक संकटांतून जेव्हा कष्टकऱ्यांच्या कष्टाच्या लूटीचा दर घसरू लागतो तेव्हा, लुटीला कायम ठेवण्यासाठी ते अशा शकतीला मजबूत करतात जी जनतेच्या शोषणासाठी अगदी निर्ल्लज्जपणे त्यांची मदत करू शकतील.
जनतेच्या असंतोषाला गाडून टाकण्यासाठी फासीस्ट अनेक हातखंडे वापरतात. ते भांडवली शोषणाला लपवण्यासाठी ‘विकासा’चा ढोल बडवतात, ‘चांगले दिवस आणण्या’ सारखा जोरदार प्रसार करतात. सोबत जनतेपुढं वंश, धर्म आणि “राष्ट्र” आदींच्या नावावर एक ‘खोटा शत्रु’ उभा करतात. जसा हिटलरने भांडवली लूटीमुळं बरबाद झालेले बेरोजगार युवक,निम्न मध्यमवर्ग, छोटे व्यापारी-उद्योगपती इतकच नव्हे तर कामगार-शेतकऱ्यांच्या एका मोठ्या संख्येच्या मागास जाणीवांचा फायदा घेत, त्यांना या आधारावर संघटीत करण्यात यश मिळवलं की सगळ्या संकटांचे मूळ यहुदी लोक आहेत. हिटलर सत्तेच्या प्रत्येक भागावर नियंत्रण मिळवायला यशस्वी झाला होता. त्यानंतर फासीस्टांनी विनाशाचा तांडव करायला सुरुवात केली तेव्हा सुशिक्षीत वर्गाच्या एका विभागाला, निम्न मध्यमवर्गाला आणि छोट्या व्यापाऱ्यांना हे कळून चूकलं की हिटलर फक्त बड्या उद्योगपतींची सेवा करत आहे. पण तोवर खुप उशीर झाला होता. भारतात हेच काम संघ परिवार करत आहे. संघ परिवाराच्या संस्थापक सदस्यांपैकी एक मुंजे, फासीवादी कार्यपद्धती शिकण्यासाठी इटलीचा फासीवादी नेता मुसोलीनीला भेटला होता. संघाच्या गोळवळकर ने आपले पुस्तक ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हिटलरची चांगलीच प्रशंसा केली आहे. संघ परिवार येणकेन प्रकारे मुस्लीमांना हिंदूच्या शत्रूच्या रूपात सादर करत असतो. युद्धोन्माद भडकवत राहतो. समाजातील तथाकथित शिक्षीत वर्गाचा एक मोठा विभाग भरकटलेल्या अवस्थ्ोत आहे. तो इतिहासानं दिलेली ही शिकवण विसरलाय की युद्धांत नेहमी जनताच बरबाद होते. संघ परिवाराचे राजकीय संघटन भाजपा, मोदीच्या नेतृत्वांत, जेव्हा श्रीमंताचा फायदा सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेला मिळणाऱ्या सबसिडीला एक एक करत बंद करत आहे आणि त्याचा विरोध करणाऱ्या संघटनांना देशद्रोही, आईएसआई एजंट इत्यादी ठरवल जातय. या कामी मीडियासुद्धा जोरदार साथ देत आहे. त्यांच्याशी संबधीत संघटना प्रगतीशील विद्यार्थी व बुद्धीजीवींवर हल्ले करत आहेत. मात्र आताच मध्यप्रदेशांत भाजपाच्या आयटी सेलचा सदस्य आईएसआईशी संबंध असल्यामूळे पकडला गेला, पण यावर मीडिया आणि सर्व “देशप्रेमी” गप्प आहेत. अनेक पाठ्यक्रमात ब्राम्हण्यवादी विचारांना खतपाणी घातलं जातय. तरुणांना याच्या विरोधात आता लढावच लागेल, नाहीतर देश एका भयानकतेच्या दिशेने पूढे जात राहील.
मित्रांनो, भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन आपण उठून उभं रहायला हवं. आम्ही सर्व न्यायप्रिय नागरीक, कष्टकऱी आणि विद्यार्थी-युवकांकडे हात पुढे करत आहोत. देशांत एक नवी सुरुवात झाली आहे, भगतसिंहानी सुरू केलेल्या’’नौजवान भारत सभेला’ पुन्हा जीवंत केलं गेलय. देशांतील कित्येक विश्वविद्यालये, कॉलेजमध्ये आम्ही याच आदर्शांना घेऊन क्रांतीकारी विद्यार्थी संघठना बनवत आहोत. कष्टकऱ्यांमधेही काम सुरु केल आहे. स्त्रीयां व जागरूक नागरिकाचे मंच व संघटना प्रत्येक ठिकाणी संगठीत करत आहेत. दिशा जर योग्य असेल, संकल्प मजबूत असतील आणि विचार विज्ञाननिष्ठ असतील तर हवेची झुळूक वादळात परावर्तीत व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही अजून मुर्दाड झाले नसाल ,जगणं आणि लढणं ही जगण्याची रीत बनवण्याची तयारी असेल ,तर आमच्याशी जरूर संपर्क करा
• नौजवान भारत सभा
• दिशा विद्यार्थी संघटना
मुम्बई संपर्क: शहीद भगतसिंह पुस्तकालय, 103, 61-ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम),
फ़ोन: – 9145332849, 9619039793
अहमदनगर संपर्क : शहीद भगतसिंह पुस्तकालय, सिद्धार्थनगर, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागे, अहमदनगर
सम्पर्क : ९१५६८२४७०६, ८८८८३५०३३३, ७०५८१९७७२९, ९१५६३२३९७६
फेसबुक पेज : fb.com/naujavanbharatsabha वेबसाइट : www.naubhas.in