आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (8 मार्च) 107 व्या दिनानिमित्त
आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय!
ऐकी करुन लढायच हाय रं हाय!!
बहिणींनो ! साथीनो!
आपण एका बिघडलेल्या वातावरणात 107 वा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहोत. हा दिवस स्त्रीयांची समानता, त्यांची मुक्ती आणि त्यांच्या अधिकारांसाठी केलेल्या दिमाखदार संघर्षाची साक्ष देतो. या 10 मार्चला आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या अशा शिक्षिका होत्या ज्यांनी जातीव्यवस्थे बरोबरच स्त्रियांच्या गुलामी विरोधातही संघर्ष केला. आज तर स्त्रियांची सामाजिक स्थिती अजूनच बिघडत चालली आहे. स्त्रीविरोधी अपराधांचा आलेख सतत वाढतच चाललाय. देशांतील कुठल्या ना कुठल्यातरी कोपऱ्यात बलात्कार, ऍसिड हल्ला, हुंडा यासाठी हत्या आणि छेडछाडीच्या रुपात दरदिवशी भारतीय समाजातील घृणास्पद पुरुषी मानसिकता अभिव्यक्त होतांना बातम्यांतून नजरेस पडते. आता नुकतच बनारस हिंदू विश्वविद्यालया (बी.एच.यु) मध्ये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीना मांसाहार बंदी करण्यात आली, रात्री 8 वाजेपर्यत हॉस्टेलमध्ये उपस्थिती आणि रात्री नऊ वाजल्यानंतर मोबाईल फोनचा वापर बंदी सारखे अनावश्यक फालतू नियम बनवले गेलेत. दुसऱ्या बाजूला हे नियम पुरुष विद्यार्थांसाठी अजिबात नाहीत. पण जेव्हा या विद्यार्थ्यानी याचा विरोध केला तेव्हा या विद्यार्थ्यांना धमकावल जात आहे.मुंबई विश्ववविद्यालयांतील विद्यार्थीनीना रात्री पुस्तकालयात जायला मनाई आहे,जरी प्रशासनाला विद्यार्थांच्या उग्र आंदोलना अंती निर्णय मागे घ्यावा लागला, अशाच तर्हेने दिल्ली विश्वविद्यालायाची विद्यार्थीनी गुरमेहर कौरला सोशल मिडीयावर आपलं म्हणन मांडल्यानंतर ज्या तऱ्हेने देशद्रोही सिध्द करण्याचा प्रयत्न केला, बलात्काराची धमकी दिली गेली, यातून आपल्या देशातील महान लोकशाही मधील स्त्री स्वातंत्र्याच सत्यरुप समोर येत. 16 डिसेंबर 2012 मध्ये निर्भयासोबतच्या घटनेनंतर स्त्रीयांसाठी ‘सुरक्षा अध्यादेश’ 3 फेब्रुवारी 2013 रोजी पास केला गेला, तरीही अशा घटना होतच आहेत. गेल्या काही वर्षामध्ये समाजातील उच्चभ्रु समूहाच्या मनांत खुप खोलवर झालेले सांस्कृतिक पतन आणि प्रबुध्दपणाच्या आवरणाखाली लपवलेला पुरुषी स्वामीत्ववाद उघडा पडला आहे. कित्येक नेते, अधिकारी आणि साधू संतांकडून यौन अपराधांमध्ये संलिप्त झाल्यानंतर, नावजलेले पत्रकार, न्यायाधीश, नोबेल पुरस्कार विजेते पर्यावरणवादी आणि एवढंच काय तर मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सुध्दा यात आरोपीच्यान कठडयात उभे आहेत.
प्रस्तापितांची मानसिकता दिवसेंदिवस होणाऱ्या घाणेरडया विधांनामधून समोर येतेच आहे. मुलायम सिंह यादवच्या “लडको से गलती होने’’ पासून तर अबू आझमी, विजय वर्गीय, बाबुलाल सिंघम, ओमप्रकाश चौटाला, पुडूचेरीचे शिक्षामंत्री धियागराज, ममता बॅनर्जी इत्यादीची टिपणं याची उदाहरणे आहेत. आता चालू असणाऱ्या पाच राज्यांतील निवडणूकांतही स्त्री सुरक्षेचा मुददा प्रत्येक राजकीय पक्षाच्या घोषणापत्रात सामिल आहे. आणि त्यावरुन बरेच वायदेही केलेत, पण हे तेच लोक आहेत जे वेळोवेळी आपली रुग्णमानसिकता प्रदर्शित करत असतात. जितकी घाणेरडी विधानं आली पैकी जास्त वर्तमान भाजपा सरकारच्या मंत्र्याव्दारा केली गेलीत. महिला दिवसानिमित्तच्या एका इंटरव्हुव मध्ये खुद्द महिला व बालविकास मंत्री मेनका गांधीनीच म्हटल की 6 वाजेनंतर मुलींनी बाहेर न पडण्याचा नियम योग्य आहे, कारण रात्री हार्मोन्सची भरती येत असते. एका एनजीओला मुलाखत देताना पोलिसांच्या बडया अधिकारी व न्यायाधिशांनी स्त्रियांनाच जबाबदार ठरवून म्हटल की त्या पाश्चात्य संस्कृतीची नक्कल करताहेत म्हणून त्यांच्या परिस्थितीला त्या स्वताच जबाबदार आहेत. यावरुनच स्पष्ट होतच आहे की पोलिस व नोकरशाहीचे विचार किती उन्नत आहेत ते. तसही बलात्काराला बळी ठरलेल्या मुलीवर तक्रार नोंदवायला गेल्यानंतर पुन्हा बलात्कार केला जातो. आणि अटक केलेल्या महिला राजकीय कार्यकर्तीला यौनयातना देणारे पोलीस सरकारव्दारे वीरतेचा पुरस्कार घेतात तेव्हा यांकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो . धार्मिक गुरु आणि बाबांवर यौन उत्पीडनाची अनेक प्रकरणे दाखल आहेत, हे साऱ्या देशाला माहित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमाते इस्लामे हिंद सारख्या संगठना आणि खाप पंचायती स्त्रीयांच्या विरोधात फतवे काढतच असतात. सहशिक्षण संपवणे, स्त्रीयांना लक्ष्मणरेषा आखून देणे, गृहिणी बनून जीवन व्यतीत करण्याचा सल्ला देत राहतात. खाप पंयायतीच्या प्रमुखांनी तर मुलींचे जीन्स घालणे, मोबाईल वापरणे, मुलांशी मैत्री करणे आदींना स्त्री विरोधी अपराधची कारणे सांगितली आहेत आणि म्हणून बालविवाह वैध ठरवला आहे. एका अतिशय हास्यास्पद विधानांत खाप पंचायतीच्या जितेंदर छत्तरने म्हटले की “चाऊमीन’’ व फास्टफूड खाण्यामुळे अशा घटना घडत आहेत. याचा अर्थ असा की शासकवर्गाच्या प्रत्येक हिश्याचे लोक स्त्रीयांना उपदेश करत असतात की त्यांना काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. जेव्हा संसदेमध्ये तर असे लोक आहेत ज्यांच्यावर हत्या आणि स्त्री विरोधी अपराधही नोंदलेला आहे. सैन्याकडूनही अफस्पा आणि अशाच तर्ऱ्हेच्या इतर कायद्याच्या आडून झालेल्या कुकर्माची साक्ष मणीपूरच्या मनोरमा बलात्कार व काश्मीहरमधील कुनान पोशपूरा देत आहेत.
संक्षेपान म्हणायच तर 107 व्या वर्षी आपण खुप आव्हानात्मक आणि अंधकारमय स्थितीत आहोत. संपूर्ण देशात सांप्रदायिक फासीवादी शकतींचा जोर आहे. आणि या प्रवृत्ती स्त्रीयांकडून त्यांच स्वातंत्र्य आणि त्यांचा शेवटचा अधिकारही हिसकावून घेऊ इच्छितात. लव जिहाद आणि धर्मांतराच्या नावावर एका विशिष्ट समुदायासोबतच स्त्रीयांनाही टारगेट केल जात आहे. कारण त्याच्या आडूनच आंतरधर्मिय आणि प्रेमविवाह थांबण्याचा मार्ग सुगम होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगलांनी बसणे, व्हॅलेंटाईन डे साजरा करणे आणि आधुनिक कपडे घालणे इत्यादींतून धर्माध गुंड दिवसेदिवस स्त्रींयाच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावत आहेत. स्पष्ट आहे की हे कामकरी आणि कष्टकरी महिलांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत. हे लोक आपले सल्ले मिनाक्षी लेखी, सुषमा स्वराज, निरंजन ज्योती, उमा भारती आणि स्मृती इराणी यांना का नाही देत, त्यांनीही आपल्या घरी बसून गौरवशाली संस्कृतीला वाढवू द्यायला हवं. खरंतर फासीस्टांच्या नजरेत स्त्रीया स्वयंनिर्णय घेणाऱ्या सक्षम नागरीक असतच नाहीत, उलट पुरुषांच्या सुरक्षीतते राहणारी घरची इज्जत असतात आणि त्यांच स्वतंत्र निर्णय घेणं आणि आत्मनिर्भर होणं पुरुषांच्या प्रतिष्ठे विरोधी, शास्त्र विरोधी आहे. या धर्मध्वजधारकांसाठी स्त्रीया कुलदिपक पैदा करणाऱ्या आणि वंश चालवणार्या मशिनी आहेत.याच विचारांवर आधारीत भाजपाच्या सरकारदवारे “बेटीबचाव, बेटी पढाओ’’ ही मोहीम चालवली जात आहे. खरंतर जोवर स्त्रीयांना सामाजिक स्वातंत्र्य आणि बरोबरीचा अधिकार मिळणार नाही तोवर लाखो प्रचारांतूनही स्त्री भ्रुण हत्या थांबणार नाही. आजही ज्या समाजात स्त्री जन्माबरोबर घरात स्मशान शांतता पसरते, तीथ फक्त कायदेशीर व्यवस्थात्मक अशा प्रचारातून काही विशेष मूलभूत फरक पडणार नाही.
गेली 107 वर्षे स्त्रीयांच्या दिमाखदार संघर्षातून मिळवलेले हक्क हे फासीवादी, प्रतिक्रियावादी हिसकावू पहातय. ही स्त्री मुकती चळवळींपुढील मोठी आव्हाने आहेत. 8 मार्च 1908 ला अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरांत वस्त्र उदयोगात काम करणाऱ्या स्त्री कामगारांनी मतदानाचा अधिकार आणि युनियन बनवण्याचा अधिकार मागत संपूर्ण मॅनहटन शहर जाम केल होत, हे प्रदर्शन विश्वंभरात चर्चेचा विषय झालं होत. यानंतर 1910 मध्ये कोपेन हेगनमध्ये कामगार पार्टीच्या आंतराष्ट्रीय संम्मेलनात 8 मार्चला स्त्री दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव पास झाला, तेव्हा पासून स्त्रीयांचा संघर्ष अनेक गोष्टी मिळवत इथंवर पोहचला आहे. ज्याच्यात मतदानाचा अधिकार, उत्तराधिकार, समान वेतनाचा हक्क, कमीत कमी कायदेशीरीत्या तरी मिळालाय. जेव्हा संपूर्ण शासनाची सरंचनाच नफयाच्या घाणेरडया लालसेवर टिकली असेल आणि जिथं भांडवली लूट, लोभ आणि लालसेच्या संस्कृती मध्ये स्त्रीयां फक्त एक उपभोग्य माल आहेत. तिथं अशा तऱ्हेचे कायदे कुठवर लागू होऊ शकतील? केवळ औपचारीक कायदेशीर हक्क आणि संसदेतील आरक्षण बील पास होण्यातून स्त्रीयांच्या सामाजिक स्थितीत काही फरक पडणार नाही. अजून तर असे कायदे खूप कमी आहे ज्यात स्त्रीयांच्या वास्तविक स्वातंत्र्याची बात असेल. स्पष्ट आहे की स्त्री मुक्ती आंदोलनापुढे अनेक गंभीर आव्हान उभी आहेत. अशात 107 व्या वर्षी जेव्हा आपण सावित्रीबाई फुले, रोजा लक्झमबर्ग, क्लारा जेटकिन, अलेकजैण्ड्रा कोलोन्ताई, मादाम भिकाजी कामा, प्रीतीलता वड्डेदार, मेरीक्युरी सारख्या यशस्वी स्त्रीयांच्या संघर्षाला आणि जगभरातल्या कष्टकरी, कामकरी स्त्रीयांच्या गौरवशाली आंदोलनाचे स्मरण करत आहोत आणि त्याला पूनर्जिवीत करण्याचे आवाहन करत आहोत. सोबतच आम्ही असे ही आवाहन करत आहोत की सर्व स्त्रीया ज्यांच्यात स्वातंत्र्य व समानतेची इच्छा आहे, त्यांनी आपल्या आपल्या परीघाच्या बाहेर पडाव आणि या दिवसाला एका संकल्प दिवसा सारखं साजरं कराव. स्त्रीमुक्ती आंदोलन आज फक्त तुरळक एनजीओ कुलीन स्त्रीवादी संघटनांच्या कुलीनतावादी कार्यक्रमांचा केंद्र बनलय. हे लक्षात ठेवायला हवं की आंतरराष्ट्रीय स्त्री दिवसाची सुरुवात कष्टकरी स्त्रीयांनी केली होती. आजवर जे स्त्रीयांना हक्क मिळालेत ते या कुलीनतावादी आंदोलनातून नव्हे, तर कष्टकरी स्त्रीयांच्या आंदोलनातून मिळवता आलेत. हा योगायोग नाही की जगांतील पहिली कामगारांची सत्ता, सोवियत सत्तेने सर्वात पहिल्यांदा स्त्रीयांना मतदानाचा अधिकार दिला. आज प्रतिक्रियावादी आणि फासीवाद्यांशी लढण्यासाठी लढाऊपणाची गरज आहे, अशा मध्यमवर्गीय कुलीनतावादी आंदोलनाची अजीबात गरज नाही. स्त्रीयांच्या तमाम मध्ययुगीन आणि आधुनिक रानटीपणा विरुध्द प्रचंड वेगानं सामाजिक,सांस्कृतिक वादळ उभं करावं लागेल. त्यांना स्त्रीयांची गुलामी आणि पुरुषी वर्चस्ववादाचा मजबूत खांब असलेल्या धार्मिक कटटरता आणि जातीवादा विरुध्द पाय रोवून उभं रहायला हवं.
आपला संघर्ष समस्त पुरुषांविरोधात नाही, तर पुरुषवादी मानसिकतेच्या विरोधात समानतेसाठी झटणाऱ्या, समस्त स्त्री पुरुषांनी मिळूनच लढण्यासाठी आहे, सोबतच आज पुन्हा स्त्रीमुक्ती आंदोलनाला मध्यमवर्गीय परिघाबाहेर पडून कष्टकऱ्यांमध्ये आणि रस्त्यावर आणावं लागेल. त्यांना पेशा आणि पोषाख निवडीच्या स्वातंत्र्यासाठी लढाव लागेल, तिला समान कामाला समान वेतनासाठी लढाव लागेल, तिला चुल नी मूलंच्या दुनियेत कैद होण्याविरुद्ध लढाव लागेल, तिला ना फक्त स्वत:च्या तर समस्त कष्टकरी जनतेच्या मुक्तीसाठी लढावं लागेल. हाच आंतरराष्ट्रीय दिवसाचा खरा संदेश आहे. आम्ही या औचित्यावर सर्व स्त्रीया, विद्यार्थी-तरुण आणि कष्टकरी साथींना आवाहन करतो की लढण्यासाठी पुढे या. आम्ही आपल्या सर्वाचे आवाहन करत आहोत की या मोहिमेसोबत जोडून घ्या आणि स्त्री मुक्ती तथा समग्र मानवमुक्तीच्या परियोजनेत भागीदार व्हा.
मार्ग मुक्ती रचावाच लागेल जगायच असेल तर लढावेच लागेल!
भांडवली पितृसत्तेविरोधात आपला आवाज बुलंद करा!!
क्रांतीकारी अभिवादनासह
नौजवान भारत सभा
दिशा विद्यार्थी संघटना
स्त्रीमुक्ती लीग
यूनीवर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी (यूसीडीई)
सिद्धार्थनगर ,अहमदनगर – 9156323976, 8888350333, 7058197729, 9156824706
मानखुर्द, मुंबई – 9619039793, 9145332849, 9923547074