बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.
Category: समाज
महाराष्ट्रातील दलितांवर अन्याय अत्याचारांच्या घटनांचा विरोध करा! जातिव्यवस्थे विरोधात आवाज बुलंद करा!
जातीव्यवस्था आणि जातिगत अन्याय अत्याचार आपल्या समाजावरील एक घाणेरडा डाग आहे आणि हा डाग दिवसेंदिवस जास्तच दुर्गंधी पसरवत आहे. गेल्या 10 जूनला जळगाव येथील जामनेर तालुक्यात वाकडी गावांमध्ये दोन मातंग तरूणांना विहिरीत पोहल्याच्या कारणावरून फक्त बेदम मारलेच नाही तर नागडे करून पाहूर गावामध्ये फिरवत शेतात घेऊन गेले व व्हिडिओ बनवून व्हाट्सअप वर प्रसारित देखील करण्यात आला.
जनतेसाठी बनवलेल्या कायद्यांना दुरुपयोगाच्या बहाण्याने कमजोर करण्याचे षडयंत्र ओळखा
देशातील कायदे दोन प्रकारचे असतात. एक ते कायदे जे देशातील जनतेच्या एका घटकाच्या किंवा सर्व घटकांच्या हक्क अधिकाराशी संबंधित असतात. (उदाहरणार्थ महिलांवरील अत्याचाराविरुद्ध बनलेले कायदे, मजुरांच्या हक्क अधिकारांसाठी बनलेले कायदे, दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी बनवलेले कायदे) आणि दुसरे ते कायदे असतात जे जनतेचे दमन-शोषण करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला ताकद देतात. (जसे पोलिसांना एन्काऊंटर करण्याची सूट देणे, फौजेला काही भागांमध्ये विशेषाधिकार देऊन एन्काऊंटर आणि अटक करण्याची परवानगी देणे). आपल्या देशातील सरकार मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे, अगदी स्पष्टपणे भांडवलदारांच्या हितांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या हितासाठी एका बाजूला ही सरकारे मजुरांच्या अधिकारांना सतत कमी करत आहे आणि दुसरीकडे सरकारचे दमन करण्याचे अधिकार वाढवत आहे.
सामाजिक शांतता व सौहार्द जपा , खरा शत्रू ओळखा .
मित्रांनो, सावध रहा, सांप्रदायिक, धर्मांध शक्ती देश, देव व धर्मांच्या नावाखाली आपली माथी भडकवायला येतील, त्यांना तिथचं रोखा. आपल्या आजच्या दारिद्रयाला आरक्षण, अट्रोसिटी एक्ट, विशिष्ट जात-उपजात, एक विशिष्ट धर्म जबाबदार आहे असां खोटा प्रचार करतील, बळी पडू नका. कधी परप्रांतीय म्हणून, कधी परका म्हणून काबाडकष्ट करणाऱ्यांमध्ये बेकी निर्माण करतील, फसू नका. हे पक्कं लक्षात ठेवा — आपल्या दु:ख, दारिद्र व दैन्याच्या मुळाशी भांडवलशाही व्यवस्थेचं अर्थशास्त्र आहे. नफ्याचं आणि राजकीय सत्तेचं समिकरण आहे. अस्मितेचे राजकारण हे नेहमीच आपल्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईला कमजोर करत असते. हे विसरले नाही पाहिजे की आज जे धार्मिक-जातीय विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे तो देशातील भांडवलदार वर्गाचा पाठिंबा असलेल्या जातीयवादी शक्तींचा खेळ आहे. हा पाठिंबा आहे म्हणूनच या जातीयवादी शक्तींमध्ये इतकी हिंमत आली आहे.
जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे
आज भारत असंख्य जातींमध्ये वाटला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांच्या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्या होते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्यांवरून समजते की २००७ पासुन उत्तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्या २५ आत्महत्यापैकी २३ आत्महत्या या दलित विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस–आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय!
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (8 मार्च) 107 व्या दिनानिमित्त आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय! ऐकी करुन लढायच हाय रं हाय!! बहिणींनो ! साथीनो! आपण एका बिघडलेल्या वातावरणात 107 वा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहोत. हा दिवस स्त्रीयांची समानता, त्यांची मुक्ती आणि त्यांच्या अधिकारांसाठी केलेल्या दिमाखदार संघर्षाची साक्ष देतो. या 10 मार्चला आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या अशा शिक्षिका होत्या ज्यांनी जातीव्यवस्थे बरोबरच स्त्रियांच्या गुलामी विरोधातही संघर्ष केला. आज तर स्त्रियांची सामाजिक स्थिती अजूनच बिघडत चालली आहे. स्त्रीविरोधी अपराधांचा आलेख सतत वाढतच चाललाय. देशांतील कुठल्या…
मनुस्मृती दहन च्या 89 व्या वर्षपूर्ती निमित्त – जातीअंताच्या आंदोलनाला प्रतीकवाद,सुधारवाद आणि अर्ज-विनंत्या करण्याच्या पुढे घेवून जाण्याचा संकल्प करा!
आज दलितांच्या सम्मानासाठीसुद्धा फक्त अर्ज देणे, खटले चालवणे आणि सरकारला निवेदन दिल्याने फार काही होणार नाही. रस्त्यावर उतरून लढण्याची आवशकता आहे. काय न्यायालयात गरीब दलित समुदायासाठी खरच न्याय आहे? काय बथाणी टोला ,लक्षमनपूर बाथेच्याखुन्यांना शिक्षा झाली? काय दलित विरोधी अत्याचार कमी झाले? काय अस्मितावादी राजकारण करणारे तथाकथित संसदीय व बिगर संसदीय दल वोट बँक आणि प्रतिकात्मक मुद्द्यांच्या पुढे जाताहेत ? नाही.
क्रांतीशिवाय जातीचे उच्चाटन संभव नाही! जातिविरोधी संघर्षाशिवाय क्रांती संभव नाही!
उठा, आपली शक्ती ओळखा! संघटित व्हा! स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. स्वातंत्र्यासाठी स्वाधीनतेची इच्छा बाळगणाऱ्यांना प्रयत्न करावे लागतात. म्हणच आहे, लातों के भूत बातों से नही मानते. म्हणजेच, संघटित होऊन आपल्या पायांवर उभे राहून पूर्ण समाजाला आव्हान द्या. आणि पाहा, कोणीही तुम्हांला तुमचे अधिकार देण्यास नकार देण्याचे धाडस करणार नाही. तुम्ही इतरांचा आहार बनू नका. दुसऱ्याच्या तोंडाकडे आशेने पाहू नका.
अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा!
अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा! दलित मुक्तीच्या महान परियोजनेला अस्मितावाद आणि प्रतीकवादाच्या खड्ड्यातून बाहेर काढा! अहमदनगरमध्ये २१ ऑक्टोबर रोजी एका दलित कुटुंबातील तीन लोकांची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून विहिरीत फेकून देण्याच्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला हादरवून सोडले आहे. तमाम दलितवादी राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी या घटनेकडे एक ‘‘सुवर्णसंधी’’ म्हणून पाहत आहेत व दलितांच्या हिताच्या नावाखाली याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे भांडवली मिडिया नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा ही घटना दाबून टाकण्याचे काम करीत आहे किंवा ही घटना…