मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927) च्या 89 व्या वर्षपूर्ती निमित्त
जातीअंताच्या आंदोलनाला प्रतीकवाद,सुधारवाद आणि अर्ज-विनंत्या करण्याच्या पुढे घेवून जाण्याचा संकल्प करा!
मित्रहो ,
आजपासून 89 वर्षापूर्वी महाडमध्ये कष्टकरी दलितांनी एका महान विद्रोहाला सुरुवात केली होती. ज्याची सुरुवात 19-20 मार्च 1927 च्या बहिष्कृत सम्मेलनातून झाली, पण वस्तुतः या सम्मेलनाचा विचार आर.बी.मोरेनी (जे पुढे जाऊन काॅम्रेड आर बी मोरे या नावाने ओळखले गेले) मे 1924 मध्ये मांडला. या सम्मेलनात डा.आंबेडकरांना त्याच्या अॅकडमिक उपलब्धीसाठी सम्मानीत करण्याची योजना केली होती. तीन वर्षाच्या जय्यत तयारी नंतर 19-20 मार्च 1927 ला महाड मध्ये हे सम्मेलन झाले. सम्मेलन संपण्याच्या ठीक अगोदर अनंत विनायक भाई चित्रे च्या प्रस्तावावर असा निर्णय घेतला गेला की सर्वांनी एकत्र येवून “बोले प्रस्तावाला” अमलात आणावे आणि चवदार तळ्याच पाणी प्याव. हा “बोले प्रस्ताव” महाडच्या नगर पालिकेने संमत केला होता. ज्यानुसार सर्व सार्वजनिक पाणवठे दलितांसाठी खुले झाले. 20 मार्च 1927 दलितांनी चवदार तळ्याच पाणी हातात घेवून प्यायल. त्या मोर्च्याच नेतृत्व डा.भीमराव आंबेडकरांनी केल होत. पण परत निघालेल्या दलितांवर जातिवादी, ब्राह्मणवादी गुंड शक्तींनी हल्ले केले. महाड मध्ये हजारों च्या संख्येने हा राबणारा, लढवय्या दलित समुदाय गोळा झाला होता. आणि या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता, इच्छा बाळगून होता, पण डाॅ.आंबेडकरांनी त्यांना थांबवलं आणि कायद्याच्या मर्यादेत राहून काम करण्याचे निर्देश दिले. यानंतर 25 डिसेंबर 1927 ला पुन्हा डा.आंबेडकरांच्या नेतृत्वात चवदार तळ्याच पाणी पिऊन सत्याग्रह करण्याचा निर्धार केला गेला.
या सत्याग्रहासाठी जय्यत तयारी केली होती. सत्याग्रहाच्या आयोजनासाठी भरवलेल्या सम्मेलनाच्या पहिल्या दिवशी (25 डिसेंबर 1927)मनुस्मृतीच्या निवडक भागांना बापू सहस्त्रबुद्धेनी अग्निकुंडातील आगीच्या हवाली केल, डा.आंबेडकर मनुस्मृतीच्या त्या भागांना बापू सहस्त्रबुध्देंना सोपवत होते. निश्चितच जातिउच्चटांनासाठी ब्राह्मणवादी विचारधारेवर हल्ला करण्याच्या दिशेने उचलेले हे एक महत्वपूर्ण प्रतिकात्मक पाऊल होत आणि या अर्थानं त्याला खूप ऐतिहासिक महत्वही आहे. पुढे महाड सत्याग्रह होऊ शकला नाही. कारण ब्राह्मणवादी शक्तींनी कोर्टाकडून स्थगितीचा आदेश आणला, आणि कलेक्टरने स्वतः येऊन भाषण दिल, खरं तर कायदा न मोडण्याची धमकी होती ती. तरीही सम्मेलनातील बहुमताने, कायदा मोडायची वेळ आली तरी सत्याग्रह करायचाच असा निर्णय घेतला . पण सम्मेलनाच्या तिसर्या दिवशी, सकाळी आंबेडकरांच्या प्रस्तावावर असा निर्णय झाला की ब्रिटिश सरकार आणि कायद्याच्या विरोधात जायच नाही. आणि मग संमेलनाचा समारोप अखेर एका प्रतिकात्मक मोर्चाने झाला. त्यानंतर तब्बल दहा वर्ष डाॅ.आंबेडकर ब्रिटिश न्यायालयाच्या या निर्यणयाच्या विरोधात केस लढत होते. आणि अखेर बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिला की दलितांना चवदार तळ्याच पाणी पिण्याचा अधिकार आहे,कारण तो सार्वजनिक तलाव आहे. खटल्यामध्ये डाॅ.आंबेडकर जिंकले खरे पण तोवर इकड कष्टकरी दलितांनी महाड मध्ये सुरू केलेला हा महान विद्रोह संपुष्टात आला होता.
तेव्हा, मनुस्मृती दहनाला एक प्रतिकात्मक महत्व होत. आणि ते दुसर्या महाड सम्मेलनाची फलनिष्पत्ति होती. या प्रतिकात्मक घटनेन दलितांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला आणि मानसिक गुलामीच्या बेड्याना तोडणारी भूमिका पार पाडली. त्या काळासाठी अश्या एखाद्या प्रतिकात्मक पुढाकारालाही विशिष्ट महत्व होत,जस कुठल्याही दमीत -शोषितांच्या आंदोलनाच्या सुरूवातीला ते असतच.
पण मित्रांनो,आज आपण निव्वळ प्रतिकात्मक पुढाकाराच्या काळाच्या खूप पुढे आलो आहोत. दलितांपैकी 89 टक्के कामगार आहेत. आणि हे कामगार अस मानतात की सम्मानाची लढाई तर लढलीच पाहिजे,पण हेही खरच आहे की आपले आर्थिक आणि राजकीय हक्क न मिळवता ही सम्मानाची लढाई अधुरी राहील. हा राबणारा कामगार आपल्या भौतिक अधिकारांसाठीही रस्त्यावर उतरला आहे. 1907च्या महान अय्यंकली विद्रोहा पासून वाइकोम सत्याग्रह, तेलंगाणा,तेभागा,पुनप्रा वायलर मधील भूमिहीन दलित कामगारांचा संघर्ष आणि देशाच्या निरनिराळ्या भागातील 1960 आणि 1970 च्या दशकातील सवर्ण जमिनदाराविरोधातील लढाऊ संघर्षापर्यन्त, जाती उच्चाटनाच्या लढ्याने एक मोठा प्रवास केला आहे. या लढ्यात डाॅ.आंबेडकरांनी सुद्धा दलितां मध्ये आत्मसम्मान आणि प्रतिष्ठेची जाणीव जागी करायला अतिशय महत्वपूर्ण योगदान दिल आणि ब्रिटिश सरकारकडून कैक कायदे अन सवलतीही मिळवल्या.
पण आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथ केवळ अशी प्रतिकात्मक पावलं उचलून भागणार नाही. आज दलितांच्या सम्मानासाठीसुद्धा फक्त अर्ज देणे, खटले चालवणे आणि सरकारला निवेदन दिल्याने फार काही होणार नाही. रस्त्यावर उतरून लढण्याची आवशकता आहे. काय न्यायालयात गरीब दलित समुदायासाठी खरच न्याय आहे? काय बथाणी टोला ,लक्षमनपूर बाथेच्याखुन्यांना शिक्षा झाली? काय दलित विरोधी अत्याचार कमी झाले? काय अस्मितावादी राजकारण करणारे तथाकथित संसदीय व बिगर संसदीय दल वोट बँक आणि प्रतिकात्मक मुद्द्यांच्या पुढे जाताहेत ? नाही.
अशा वेळी ,मनुस्मृती दहनाचा वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपण काय संकल्प केला पाहिजे? आज आपल्याला एका अशा जातीउच्चाटक आंदोलनाची गरज आहे, जे रस्त्यावर लढण्याची ताकद बाळगते, जे कष्टकरी वर्गाची एकजूट उभारून सवर्णवादी भांडवली शक्तींविरोधात लढण्याची क्षमता बाळगते, जे कष्टकरी समुदायात भरलेल्या जातीय पूर्वाग्रहा विरोधात एक दीर्घ प्रचार आणि शिक्षण देऊ शकेल. आज जे सत्तेमध्ये भांडवली,ब्राह्मणवादि,जातिवादी अस्मितावादाची आघाडी आहे आणि जे लुटले जाताहेत त्या कामगार-कष्टकर्यांचा,एक मोठा हिस्सा गरीब दलित, मागासलेल्या जाती,स्त्रिया आणि आदिवासी आहेत. सत्तेत बसलेले भांडवली, ब्राह्मणवादी ,जातिवादी आपल्या वर्गीय हितासाठी संघटित आहेत मात्र जे लुटले जाताहेत, बरबाद होत आहेत, ज्यांच्यावर अन्याय होतोय, ते मात्र विभागलेले आहेत. अशा वेळी आपल्याला एका अश्या जाती विरोधी आंदोलनाची उभारनी करावी लागेल जे वर्गीय एकजुटीवर आधारलेला असेल, जे कायदे, न्यायालये, निवडणुका बाबत कुठलया भ्रम बाळगून असणार नाही, जे अर्ज विनंत्यांच्या आणि प्रतिकात्मक मुद्द्याच्या पुढे जाईल. मागील काही दशकात दलित मुक्ति आणि जाती उच्चाटनाचे आंदोलन अस्मितावाद, प्रतीकवाद,सुधारवाद आणि कायदेवादाच्या आवर्तनामध्ये अडकून राहिल्यामुळे अगोदरच आपण खूप नुकसान करून घेतलं नाही काय? या चकव्यातून त्वरित बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.चला, आजच्या दिवशी एका लढाऊ वर्ग आधारित जाती अंताच आंदोलन उभारण्याची शपथ घेऊयात.
ब्राहमणवाद मुर्दाबाद! जातिवाद मुर्दाबाद! अस्मितावाद मुर्दाबाद! भांडवलशाही मुर्दाबाद! सुधारवाद मुर्दाबाद!
सर्व कष्टकर्यांची वर्गीय एकजूट झिंदाबाद