कायदा जोपर्यंत जनतेचे मानस म्हणजे तिच्या भावना प्रकट करतो, तोपर्यंतच कायद्याचे पावित्र्य टिकून राहते. तो जेव्हा शोषक समूहांच्या हातातला कागदाचा कपटा बनून जातो, तेव्हा त्याचे पावित्र्य आणि महत्त्व तो हरवून बसतो. न्याय द्यायचा तर प्रत्येक प्रकारच्या लाभांचा आणि हितसंबंधांचा खातमा करणे ही मूलभूत गोष्ट आहे. कायदा जसजसा सामाजिक गरजा भागवणे बंद करत जातो; तसतसा तो जुलूम आणि अन्याय वाढवण्याचे हत्यार बनत जातो. असे कायदे चालू ठेवणे याचा म्हणजे सार्वजनिक हितावर विशेष हितसंबंधांची ढोंगी जबरदस्ती आहे, दुसरे काहीही नाही,
Category: भगतसिंह
शहीद भगतसिंहाच्या जन्मदिवसा (28 सप्टेंबर) निमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान
स्वातंत्र्याच्या ज्या रोपट्याला भगतसिंहांसारखा महान शहीदांनी आपल्या रक्ताने शिपलं होतं ते सुकू लागले आहे. या शहीदांची स्वप्ने आमच्या डोळ्यात डोकावत आहेत. चला, या शहीदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या संघर्षात प्राणपणाने सामील होऊयात. हे पत्रक केवळ नौजवान भारत सभेचा परिचय नाही, तर आवाहन आहे कि तुम्ही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि भगतसिंहांच्या विचारांना पुढे न्या.
भगतसिंह – हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा
भारतीय भांडवलदारवर्ग आपल्याच जनतेचा विश्वासघात करून त्याच्या मोबदल्यात परकीय भांडवलदारांकडून सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच कष्टकरी वर्गाच्या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्या आहेत. त्यातूनच संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याच्या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्ट करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्य आता तरुणांच्या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्टा सहन करण्याची त्यांची तयारी, त्यांचे निडर शौर्य आणि आत्मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्थान दोन्ही आहेत. या आंदोलनाच्या मागे त्यांची प्रेरणा, त्यांचे बलिदान आणि त्यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्वातंत्र्याच्या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्तीच्या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”
भगतसिंह – बॉॅम्बचे तत्तवज्ञान
हिंसा या शब्दाचा अर्थ आहे, अन्यायासाठी केला गेलेला बलप्रयोग. परंतु क्रांतिकारकांचा तर हा मुळीच उद्देश नाही. दुसऱ्या बाजूला अहिंसेचा सामान्यतः जो अर्थ समजला जातो, तो म्हणजे आत्मिक शक्तीचा सिद्धांत. त्याचा उपयोग व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय अधिकार मिळवण्यासाठी केला जातो. आत्मक्लेशाद्वारे शेवटी आपल्या विरोधकाचे हृदय परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा ठेवली जाते.
भगतसिंह – बॉम्ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन
क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
भगतसिंह – विद्यार्थी आणि राजकारण
विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्हांला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे; पण देशाच्या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय यांचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्त कारकूनी करण्यासाठी घेतले जाते, त्या शिक्षणालाही आम्ही निरुपयोगी मानतो. मग अशा शिक्षणाची गरजच काय? काही महाचतुर लोक असे म्हणतात, “मुला, तु राजकारण बघून जरूर शिक आणि विचार कर, पण प्रत्यक्ष राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नकोस. तू अधिक लायक बनलास तर तेच देशाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.”
भगत सिंह – मी नास्तिक का आहे?
प्रगती घडवायला सज्ज ठाकलेल्या माणसाला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीबद्दल टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो व तिला आव्हान द्यावे लागते. प्रचलित श्रद्धेचा कानाकोपरा धुंडाळून त्याने प्रत्येक लहानसहान बाबीची विवेकनिष्ठ चिकित्सा करावी लागते. अशा बऱ्याच विचारांती जर त्याला एखाद्या सिद्धान्तावर किंवा तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणे योग्य वाटले, तर त्याच्या विश्वासाचे आपण स्वागत करू. त्याची विचारपद्धती चूक असू शकते, चुकीच्या मार्गाने गेलेली असू शकते किंवा खोटी व फसवी असू शकते. पण त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊन तो योग्य मार्गावर येऊ शकतो, कारण विवेकबुद्धी हा त्याच्या जीवनाचा दिशादर्शक ध्रुवतारा असतो. पण केवळ श्रद्धा या अंधश्रद्धा धोकादायक आहे. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनवते.