आम्हा तरुणांना निरोगी शरीर आणि स्वस्थ मन असण्याचा हक्क नाहीये का? सगळीकडे असे म्हटल्या जाते की भविष्य तरुणांच्या हातात आहे, पण आज जेव्हा आपण आपल्या आजुबाजूची परिस्थिती पाहतो तर दिसते की आपले तरुण आधीपेक्षा जास्त निराश, गोंधळलेले आणि एकाकी झाले आहेत. आज आपण एका सडक्या समाजात राहतोय. सार्वजनिक शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांवर, विशेषतः कष्टकरी जनतेतून आलेल्या तरुणांवर आज खूप वाईट परिणाम झाला आहे. शिक्षण अर्ध्यातच लवकर सोडणे आणि नोकरी करणे आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. ही ढासळत चाललेली सडकी समाजव्यवस्था तरुणांचे भविष्य गोंधळात टाकत आहे. हा समाज आमच्या स्वप्नांचा खून करत आहे… नाही! आमच्या जगण्याच्या इच्छेचीच हत्या करत आहे! त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण एका बाजूला सोशल मिडिया, दिवसरात्र ऑनलाईन गेम खेळण्यात गुंतलेले असण्याच्या तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी, भाईगिरी, अन् गुंडगिरी च्या मार्गाला लागले आहेत किंवा स्वतःचा जीव घेण्याचे टोकाचे पाऊल उचलत आहेत ! या निराशाजनक परिस्थितीचा विरोध करणे आज खूप गरजेचे आहे. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांकडून प्रेरणा घेऊन एक सुंदर नवीन जग बनवण्याची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. ही सगळी वाईट स्थिती लक्षात घेऊन, आपल्या अप्पर सुप्पर-बिबवेवाडी इलाक्यात “शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब’ची सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही असे मानतो की खेळ हे एक असे माध्यम आहे ज्यातून आपल्यामध्ये हळूहळू जिवंतपणा निर्माण केल्या जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या फायद्यासोबतच खेळातून आपल्यात सामूहिकता, संघटन, शिस्त अशा शिकवणी रुजवण्याला मदत होईल. आझाद स्पोर्टस क्लब अशा संवेदनशील, न्यायप्रिय नागरीकांच्या जीवावरच उभा राहू शकतो ज्यांनी आजच्या काळातील ज्वलंत प्रश्नांवर विचार करण्याचे थांबवलेले नाहीये आणि हा समाज बदलण्याची आशा जीवंत ठेवली आहे. म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना आझाद स्पोर्ट्स क्लबसाठी सहयोगाचे आव्हान करत आहोत. आम्हाला क्रीडा साहित्याची गरज आहे जसे बुद्धिबळ संच, कॅरम संच, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बंडमिंटन रॅकेट्स इत्यादी. या शिवाय तुम्ही आर्थिक सहयोग सुद्धा करू शकता. #chandrashekharazad #sports #club #football #chess #badminton #youth #mentalhealth #shaheedbhagatsingh #nbs
नौजवान भारत सभा तर्फे सुरू होत आहे शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब !
