नौजवान भारत सभा कडून सुप्पर बिबवेवाडी भागात शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लबची सुरवात

मित्रांनो, नौजवान भारत सभाकडून गेले काही वर्ष कामगार कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या सुप्पर बिबवेवाडी भागात आझाद स्पोर्ट्स क्लबची सुरवात करण्यात येत आहे. आपण ज्या व्यवस्थेमध्ये जगत आहेत त्या भांडवली व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट ही माल बनलेली आहे. शिक्षण, आरोग्य या आज बाजारात विकत घायच्या गोष्टी बनल्या आहेतच याला खेळ ही गोष्ट सुद्धा अपवाद नाही आहे. बॅडमिंटन, टेनिस सारखे इनडोअर खेळ तर केव्हाच कामगार कष्टकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचे होते पण आता खुल्या मोकळ्या मैदानांच्या जागा टर्फ घेत आहेत जिथे एक तास खेळण्यासाठी तुम्हाला 1000-2000 रुपये द्यावे लागतात. दिवसेंदिवस मोकळी मैदाने गायब होत आहेत. सुपर बिबवेबाडी भागात तर खेळण्यासाठी एकच मोकळी जागा आहे ती पण महानगरपालिकेची नसून खाजगी मालकीची आहे. अशा परिस्थितीतच आझाद स्पोर्ट्स क्लबची सुरवात करण्यात आली आहे. या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मुलांना विविध खेळांची ओळख करवून देऊन शिकवणे आणि मुलांना खेळांची गोडी लावणे हा सुद्धा आहे. आझाद स्पोर्टस क्लब अशा संवेदनशील, न्यायप्रिय नागरीकांच्या जीवावरच उभा राहू शकतो ज्यांनी आजच्या काळातील ज्वलंत प्रश्नांवर विचार करण्याचे थांबवलेले नाहीये आणि हा समाज बदलण्याची आशा जीवंत ठेवली आहे. म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना आझाद स्पोर्ट्स क्लबसाठी सहयोगाचे आव्हान करत आहोत. आम्हाला क्रीडा साहित्याची गरज आहे जसे बुद्धिबळ संच, कॅरम संच, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बंडमिंटन रॅकेट्स इत्यादी. या शिवाय तुम्ही आर्थिक सहयोग सुद्धा करू शकता. सहयोगासाठी तपशील Name : Susmit Rao Bank name State Bank of India, Shahanoorwadi branch Upi susmit410@ybl #footaball #sportsclub #azad #bhagatsingh #physicalhealth #contribute #nbs

Related posts

Leave a Comment

17 + 6 =