विद्यार्थी सर्जनशीलता उपक्रम – अहिल्यानगर 27 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) अहिल्यानगर युनिटने विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले.

📣 विद्यार्थी सर्जनशीलता उपक्रम – अहिल्यानगर 🔶 27 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) अहिल्यानगर युनिटने विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले. गेल्या चार आठवड्यांपासून दर शनिवारी हे उपक्रम सातत्याने घेतले जात आहेत आणि त्यांना विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अहिल्यानगरमधील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील निजामशाहीचा तसेच देशभरातील इतिहासाचा अभ्यास करता आला. त्यांनी शिवकालीन तलवारी, मातीची भांडी, नाणी, 1857 च्या काळातील शस्त्रे, लाकडी भांडी, दगडी मूर्ती यांसारख्या अनेक वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या आणि त्याबाबत जाणून घेतले. या भेटीद्वारे अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या…