लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात अभिवादन सभा आणि चर्चासत्राचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात अभिवादन सभा आणि चर्चासत्राचे आयोजन  1 ऑगस्ट, कामगारवर्गीय चळवळीतील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊंनी कविता, पोवाडे, लोकगीते, नाटके आणि कथांद्वारे जनतेमध्ये वर्ग चेतना जागृत करण्याचे महत्वाचे कार्य केले. जेव्हा अण्णाभाऊंच्या नावाने डीजे वाजवून जयंती साजरी केली जात आहे आणि त्यांच्या लेखनाला बगल दिली जात आहे, अशा काळात नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचा वारसा सामान्य कामगार कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ अत्यंत गरिब परिस्थितीत वाढले. मुंबईत येऊन त्यांनी स्वत: कामगार म्हणून काम…

विद्यार्थी सर्जनशीलता उपक्रम – अहिल्यानगर 27 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) अहिल्यानगर युनिटने विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले.

📣 विद्यार्थी सर्जनशीलता उपक्रम – अहिल्यानगर 🔶 27 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) अहिल्यानगर युनिटने विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले. गेल्या चार आठवड्यांपासून दर शनिवारी हे उपक्रम सातत्याने घेतले जात आहेत आणि त्यांना विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अहिल्यानगरमधील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील निजामशाहीचा तसेच देशभरातील इतिहासाचा अभ्यास करता आला. त्यांनी शिवकालीन तलवारी, मातीची भांडी, नाणी, 1857 च्या काळातील शस्त्रे, लाकडी भांडी, दगडी मूर्ती यांसारख्या अनेक वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या आणि त्याबाबत जाणून घेतले. या भेटीद्वारे अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या…

नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शहीद भगतसिंह वाचनालय, सुपर बिबवेवाडी येथे “द ग्रेट डिक्टेटर (The Great Dictator (1940))” या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले

great dictator movie screening

नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शहीद भगतसिंह वाचनालय, सुपर बिबवेवाडी येथे गेल्या आठवड्यात विसाव्या शतकातील महानतम सिने-कलाकार आणि उत्कट मानवतावादी, जनवादी चार्ली चॅप्लिन यांच्या “द ग्रेट डिक्टेटर (The Great Dictator (1940))” या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चॅप्लिनने आपल्या चित्रपटांमध्ये समाजाच्या नृशंस वास्तवावर ताशेरे ओढले ती सुद्धा त्याची विनोदी शैली जोपासून, जे चॅप्लिनच्या कलात्मक प्रतिभेची महत्ता दाखवते. अशा प्रकारे वास्तवदर्शी कलानिर्मिती करणे, आपल्या कलेतून समाजातील विडंबनयुक्त वास्तवाचे, अन्याय-अत्याचाराचे चित्रण करणे, यांमुळे चॅप्लिन एक सच्चा कलाकार ठरतो. “द ग्रेट डिक्टेटर” या चित्रपटामध्ये देखील त्याने हेच केले. चित्रपटसृष्टीत बोलपटांचा शोध लागण्याच्या काळातही मूकपट बनविणाऱ्या…

नौभास, पुणे तर्फे पर्यावरणावर आधारित एका माहितीपटाचे आणि ‘आत्मपॅंफलेट’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले

nbs film screening

नौभास, पुणे तर्फे चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन 🎥🎞️📽️🎬 शहीद भगतसिंह वाचनालय, जनता वसाहत येथे तरुणांसाठी पर्यावरणावर आधारित एका माहितीपटाचे आणि ‘आत्मपॅंफलेट’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आणि नंतर त्यावर चर्चा करण्यात आली. पर्यावरणाचे संकट तीव्र होत असताना त्यावर जनसामान्यांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. उपस्थितांनी पर्यावरणाचे संकट तीव्र होण्यामागच्या कारणांवर चर्चा केली. भांडवलशाहीच्या मागच्या ३०० वर्षाच्या काळात पर्यावरणाचा विनाश अफाट गतीने झाला आहे. त्याची चिंता न करता नफ्याच्या हव्यासापोटी आज निसर्गाचा अनिर्बंध वापर जगातील सर्वच भांडवलदार करत आहेत. जोपर्यंत उत्पादनाच्या प्रक्रियेवर मुठभारांची मालकी असेल, तोपर्यंत समाजाचा विचार न करता नफाकेंद्री उत्पाद…

नौभासतर्फे शहीद चंद्रशेखर आझाद जयंती साजरी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची गरज अधोरेखित

chandrashekhar azad jayanti

आज शनिवारी 26 जुलै, 2025 रोजी पुण्यातील सुपर बिबवेवाडी भागात नौजवान भारत सभा (नौभास) तर्फे शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाद्वारे जनतेला आपल्या क्रांतिकारी पूर्वजांच्या क्रांतिकारी विचारांशी परिचित करविले गेले आणि आजही साम्राज्यवादाविरोधात प्रलंबित असलेल्या पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर प्रकाश टाकला गेला. कार्यक्रमाची सुरुवात “आ रे नौजवान” या आवाहनात्मक क्रांतिकारी गीताने झाली. यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनाबद्द्ल, नौभासबद्दल आणि आजच्या आव्हानांबद्दल मांडणी केली गेली. साम्राज्यवादी वसाहती इंग्रजांप्रमाणेच भारताचे भांडवली सरकार देखील जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांपासून दूर ठेवण्याचे काम करत आले आहे. हेच कारण आहे की 1947पासून आजपर्यंत भारत सरकारने शहीद…

नौजवान भारत सभाकडून पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ पुण्याच्या सुपर भागात अभियान, तरुणांशी संवाद करण्यासाठी मीटिंगचे आयोजन

Palestine campaign

नौजवान भारत सभाकडून पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ पुण्याच्या सुपर भागात अभियान चालवले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून तरुणांशी संवाद करण्यासाठी मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगमध्ये सुरवातीला नौजवान भारत सभाची ओळख मांडण्यात आली. त्यानंतर साथी स्वप्नजाने पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्य संघर्षाचा इतिहास मांडला. गेल्या 1.5 वर्षांमध्ये सुरू असलेल्या नरसंहारात पॅलेस्टाइनमध्ये 60,000 च्या वर सामान्य जनता मृत्युमुखी पडली आहे. एकूण 50000 लहान मुले जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. पॅलेस्टिनी जनतेचा हा संघर्ष वास्तवात गेल्या 77 वर्षांचा आहे. पॅलेस्टिनी जनता गेले 77 वर्षे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. 1948 च्या पूर्वी इस्राएल या देशाचे…

नौजवान भारत सभा (नौभास) द्वारे ‘कोर्ट’ या चित्रपटाचे प्रदर्शन

court movie screening

            दिनांक 20 जुलै 2025 रोजी नौजवान भारत सभा, मुंबईद्वारे शहीद भगतसिंह वाचनालय (मानखुर्द) येथे ‘कोर्ट’ चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सोबतच चित्रपटात मांडलेल्या सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हा चित्रपट एका राजकीय कार्यकर्त्यावर सुरू असलेल्या खटल्याभोवती फिरतो, जिथे एका सफाई कामगाराच्या मृत्यूचा संदर्भ वापरून राजसत्ता त्याच्यावर अन्यायपूर्वक कारवाई करते. खटल्याच्या पलीकडे, हा चित्रपट बचाव पक्षाचे वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या जीवनावर व्यंग्यात्मक भाष्य करतो. तो आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या जातीयवाद, पितृसत्ता, धर्मांधता, अंधश्रद्धा आणि न्यायालयांची निष्क्रियता, यांसारख्या मुद्द्यांवर टीका करतो. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चर्चेत…

नौजवान भारत सभा, मुंबईने क्रांतिकारी स्वातंत्र्ययोद्धा बटुकेश्वर दत्त यांच्या स्मृतिदनानिमित्त शहीद सुखदेव फिरते वाचनालयाच्या साठे नगर, मानखुर्द मधील वाचकांसाठी आयोजित केले विशेष सत्र!

batukeshwar dutt smruti diwas

नौभास सदस्य मानखुर्द गोवंडी मधील वेगवेगळ्या कष्टकरी वस्त्यांमध्ये गेली काही वर्षे फिरते वाचनालय चालवत आहेत. नियमित वाचक विज्ञान, इतिहास यासोबतच शहीद भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचं साहित्य देखील घेतात. स्मृतीदि नानिमित्त सर्वांचं सामूहिक वाचन घेतलं गेलं. मुलांना त्यांनी वाचलेल्या गोष्टीचा एक सारांश मांडायला सांगितलं होतं. सत्रादरम्यान त्यांनी आपापल्या वाचलेल्या साहित्याचा सारांश मांडला आणि त्यांनतर बटुकेश्वर दत्त यांच्या क्रांतिकारी वारश्यावर चर्चा घेण्यात आली. हे सत्र त्या वस्तीत घेण्यात आलं जी वस्ती 2024 च्या गणतंत्र दिवसाच्या दोन दिवस आधीच तोडण्यात आली होती. ह्या वस्तीतील रहिवाशी सतत पाणी, वीज नसणे, यांसारख्या समस्यांच्या दडपणाखाली तसेच…

नौजवान भारत सभा कडून पुण्याच्या सुप्पर भागात पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ अभियान

Palestine campaign

नौजवान भारत सभा कडून पुण्याच्या सुप्पर भागात पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ अभियान चालवले जात आहे. अभियानादरम्यान असे दिसून आले की बहुतेकांना झायोनिस्ट इस्राइल कडून सुरू असलेल्या पॅलेस्टिनी जनतेच्या जनसंहाराबद्दल माहितीच नव्हती. ज्यांना माहिती होती त्यांनासुद्धा या मुद्द्याला घेऊन अनेक भ्रम होते. ही खरे तर शोकांतिका आहे की जेव्हा जगभर सामान्य जनता लाखोंच्या संख्येने इस्रायलच्या क्रूरतेविरोधात, जनसंहाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे तेव्हा भारतामध्ये याबाबत लोकांना खूपच कमी माहिती आहे किंवा माहितीच नाहीये. यामध्ये निश्चितपणे जगभरातील मुख्य धारेचा मीडिया आणि भारताच्या गोदी मीडियाची मुख्य भूमिका बनते जो पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबद्दल, सध्या सुरू…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे पोस्टरींग, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

annabhau sathe smruti din

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द (मुंबई) कामगार कष्टकऱ्यांचं उपेक्षितांचं जगणं साहित्यात चितारणारे व जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणारे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (18 जुलै) मानखुर्द, मुंबईच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर भागात नौजवान भारत सभेतर्फे पोस्टरींग, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या क्रांतिकारी सांस्कृतिक वारशाला नव्याने जागृत करणारे साहित्यकार म्हणजे, अण्णा भाऊ साठे. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या प्रेरणेचा स्रोत कम्युनिस्ट विचारात, समाजवादी समाजाच्या निर्मितीच्या स्वप्नात सापडतो. एका अशा समाजाची निर्मिती जिथे जातीपातीचा भेदभाव नसेल,…