लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे पोस्टरींग, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

annabhau sathe smruti din

annabhau sathe smruti dinलोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द (मुंबई)

कामगार कष्टकऱ्यांचं उपेक्षितांचं जगणं साहित्यात चितारणारे व जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणारे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (18 जुलै) मानखुर्द, मुंबईच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर भागात नौजवान भारत सभेतर्फे पोस्टरींग, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या क्रांतिकारी सांस्कृतिक वारशाला नव्याने जागृत करणारे साहित्यकार म्हणजे, अण्णा भाऊ साठे. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या प्रेरणेचा स्रोत कम्युनिस्ट विचारात, समाजवादी समाजाच्या निर्मितीच्या स्वप्नात सापडतो. एका अशा समाजाची निर्मिती जिथे जातीपातीचा भेदभाव नसेल, माणसाकडून माणसाचं शोषण अशक्य होईल आणि नसेल कामगार, ना भांडवलदार! आज मात्र अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महामंडळ स्थापन झालेलं आपण पाहत आहोत. त्यातला पैसा हा लोकांच्या कल्याणाच्या नावाखाली सत्ताधारी नेते, मंत्री व त्यांच्या हुजऱ्याची तुंबड्या भरण्यासाठी वापरण्यात येतो. अण्णा भाऊ साठे यांना विशिष्ठ जातीच्या अस्मितेपूर्ता कोंडून त्यांच्या विचारांना मूठमाती देण्याचं कुभांड रचलं आहे. ही नाकेबंदी तोडण्यासाठी नौजवान भारत सभा (नौभास), मुंबई ने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे बुकस्टॉल आणि संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातून अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, त्यांचे जीवन व त्यांनी स्विकारलेल्या तत्वज्ञानाला जीवनाचा मार्गदर्शक सिद्धांत बनवण्याची गरज याबाबत लोकांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन संघर्ष आणि साहित्यावर प्रकाश टाकणारी पत्रके वाटण्यात आली. पुस्तकांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची ओळख करून दिली. ‘नौभास’ च्या सदस्यांनी आपल्या भाषणांतून अण्णा भाऊ साठे यांना विशेष जाती व धर्माच्या अस्मितेच्या चौकटीबाहेर काढून व्यापक जनसंघर्षाचे प्रेरणास्रोत बनवण्याचे, त्यांच्या क्रांतिकारी सांस्कृतिक कार्याला पुढे घेऊन जाण्याचे आव्हान युवकांना केले. आजच्या फॅशिस्ट राजवटीच्या काळात शोषणमुक्त समाजासाठी अविरत संघर्ष करण्याचा निश्चय घेणे हेच अण्णा भाऊ साठे यांना खरे अभिवादन ठरेल. नौभास आपल्या देशातील तरुणांना आव्हान करते की त्यांनी नौभास चे स्वयंसेवक बनावे, जितका शक्य असेल तितका अधिकाधिक वेळ नौभास च्या क्रांतिकारी सुधार कार्यासाठी द्या व एक नवीन समाजाच्या जडघडणीच्या संघर्षात सामील व्हा.
नौजवान भारत सभेचे सदस्य बनण्यासाठी,  संपर्क: 7667230795

Related posts

Leave a Comment

two × 1 =