नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले

Palestine campaign

नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले. यादरम्यान कामगार-कष्टकरी जनतेने पॅलेस्टाईनी जनतेच्या स्वातंत्र्य-संघर्षाला का समर्थन दिले पाहिजे हे अधोरेखित करण्यात आले. मागील दीड वर्षांपासून पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर इस्रायल कडून शस्त्रास्त्रांचा मारा होत आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 58 हजारांच्या वर लोकं मारल्या गेलीत आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकं जखमी झालेत. बहुतांश लोकं इस्रायल–पॅलेस्टाईन ह्या विवादाला धर्माच्या चष्म्यातून बघतात आणि त्यासोबतच भांडवली माध्यमांद्वारेसुद्धा जे खोटे भ्रम पसरवले जात आहेत, त्यालाच सामान्य जनता सत्य मानते. आज आपण वरवरच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता इतिहास वाचला पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल की हा जनसंहार 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू नाही झालाय, तर ही झायोनिस्ट क्रूरता 1948 पासून चालू आहे. 1948 सालापासून पॅलेस्टाईनच्या जनतेचं दमन होत असूनही तेथील जनता झुंजार लढा देत आहे. लढा देत आहे आपल्या स्वातंत्र्यासाठी, आत्मनिर्णयासाठी. ज्यापद्धतीने आपल्या देशावर 200 वर्ष ब्रिटिश वसाहतवाद्यांनी राज्य केलं, भगत सिंह, सुखदेव, राजगुरूंसारख्या अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. कामगार-कष्टकऱ्यांनी झुंजार लढा देत भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं, परंतु ते स्वातंत्र्य देशातील मुठभर भांडवलदारांचंच स्वातंत्र्य राहिलं आहे. कामगार-कष्टकरी जनतेसोबत विश्वासघात केला गेला, म्हणूनच कामगार-कष्टकऱ्यांची सत्ता आणण्यासाठी आज आपल्याला संघर्ष करावा लागेल त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे. त्याचपद्धतीने आज पॅलेस्टाइनची जनता खंबीरपणे स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे. ब्रिटिशांनी ज्याप्रकारे आपल्या क्रांतिकारक पूर्वजांना फासावर चढवलं, जालियनवाला बाग सारखे हत्याकांड रचले, त्याचप्रकारे इस्रायलकडून हा लढा चिरडण्यासाठी निष्पाप जनतेच्या कत्तली केल्या जात आहेत, किड्या मुंग्यांसारखं पॅलेस्टाईनच्या लहान-लहान लेकरांना मारल्या जात आहे, शाळा, हॉस्पिटलं, सर्वांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्या जात आहे. याविरुद्ध जगभरातील कामगार-कष्टकरी जनतेने आवाज उठवून आपापल्या सरकारांवर दबाव टाकलाच पाहिजे की त्यांनी इस्रायलशी सर्व बाजारी संबंध तोडून इस्रायलचा निषेध केला पाहिजे. शिवाय ज्या कंपन्या, उद्योजक, भांडवलदार, विचारवंत, सेलिब्रिटी, संस्था, संघटना इत्यादी इस्रायलसोबत काम करतात, इस्रायलला घोषित/अघोषितरित्या समर्थन देतात अशा सर्वांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. या कंपन्यांच्या एकाही वस्तूवर आपल्या घामाचा एकही रुपया आपण खर्चता कामा नये. पॅलेस्टिनी जनतेच्या रक्ताने माखलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकणं—मानवतेसाठी, न्याय्य स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनात किमान इतकं तरी आपण करूच शकतो.
ह्या जनसंहाराचा नौजवान भारत सभा निषेध करते. त्यासोबतच सर्व कामगार, कष्टकरी आणि न्यायप्रिय नागरिकांना आवाहन करते की सर्व नागरिकांनी नौजवान भारत सभा सोबत जोडून संघटित होत, सरकारने इस्रायलसोबतचे सर्व संबंध तोडण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा.
पॅलेस्टाईनचा स्वातंत्र्य-संघर्ष जिंदाबाद!
झायोनिस्ट इस्रायल मुर्दाबाद!
Free Free Palestine!
Long Live Palestine!

Related posts

Leave a Comment

seventeen − nine =