लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात अभिवादन सभा आणि चर्चासत्राचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात अभिवादन सभा आणि चर्चासत्राचे आयोजन 

1 ऑगस्ट, कामगारवर्गीय चळवळीतील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊंनी कविता, पोवाडे, लोकगीते, नाटके आणि कथांद्वारे जनतेमध्ये वर्ग चेतना जागृत करण्याचे महत्वाचे कार्य केले. जेव्हा अण्णाभाऊंच्या नावाने डीजे वाजवून जयंती साजरी केली जात आहे आणि त्यांच्या लेखनाला बगल दिली जात आहे, अशा काळात नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचा वारसा सामान्य कामगार कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ अत्यंत गरिब परिस्थितीत वाढले. मुंबईत येऊन त्यांनी स्वत: कामगार म्हणून काम केले आणि कामगारांचे आयुष्य खूप जवळून पाहिले आणि अनुभवले. त्यांनी पहिलेल्या अन्यायातून त्यांना या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली. ते कामगार चळवळीत सक्रिय झाले आणि साहित्याच्या आधारे या जगाचे वास्तव जगासमोर मांडत राहिले. त्यांची गाणी एका चांगल्या जगासाठीच्या संघर्षातून निर्माण झाली होती, अशा जगासाठी जिथे गरिबी, निरक्षरता, उपासमार, जाती अत्याचारांना मानवजातीत स्थान नसेल. शहीद भगतसिंह वाचनालय येथे अण्णाभाऊंना क्रांतिकारी अभिवादन करत सभा घेण्यात आली आणि पत्रकं वाटली गेली. यावेळी नौभास कार्यकर्ते अरुण म्हणाले की, आपल्याला त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची गरज आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे आपल्यासमोर एक बनावट शत्रू उभा केला गेला आहे, आपल्याला धर्म आणि जातीसाठी लढण्यास सांगितले जात आहे. परंतु खरा शत्रू, भांडवलदार वर्ग, आपल्याला लुटत आहे आणि आपले रक्त आटवत आहे. आपल्याला अत्यंत कमी वेतन दिले जात आहे, जेव्हा सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. आपली मुले काम करण्यासाठी लवकर शाळा सोडण्यासाठी मजबूर आहेत. रोजगार, घरकुल, शिक्षण आणि आरोग्याच्या हक्कासाठी लढणे ही खरी लढाई आहे, तीच लढाई अण्णाभाऊ साठे आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी लढली होती.

#annabhausathejayanti #annabhausathe

Related posts

Leave a Comment

2 + fifteen =