नौजवान भारत सभा कडून पुण्याच्या सुप्पर भागात पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ अभियान

Palestine campaign

नौजवान भारत सभा कडून पुण्याच्या सुप्पर भागात पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ अभियान चालवले जात आहे. अभियानादरम्यान असे दिसून आले की बहुतेकांना झायोनिस्ट इस्राइल कडून सुरू असलेल्या पॅलेस्टिनी जनतेच्या जनसंहाराबद्दल माहितीच नव्हती. ज्यांना माहिती होती त्यांनासुद्धा या मुद्द्याला घेऊन अनेक भ्रम होते. ही खरे तर शोकांतिका आहे की जेव्हा जगभर सामान्य जनता लाखोंच्या संख्येने इस्रायलच्या क्रूरतेविरोधात, जनसंहाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे तेव्हा भारतामध्ये याबाबत लोकांना खूपच कमी माहिती आहे किंवा माहितीच नाहीये. यामध्ये निश्चितपणे जगभरातील मुख्य धारेचा मीडिया आणि भारताच्या गोदी मीडियाची मुख्य भूमिका बनते जो पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबद्दल, सध्या सुरू असलेल्या जनसंहाराबद्दल जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवत नाहीये, उलट या मुद्द्याला मुस्लिम आणि ज्यू धर्मीयांमधील युद्धाचे स्वरूप देत आहे जे पूर्णतः चुकीचे आहे. वास्तवात पॅलेस्टाईन मधील जनता गेली 77 वर्षे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. म्हणूनच नौभासकडून पॅलेस्टाईन मध्ये असलेली परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे आणि इस्रायल सरकारवर दबाव बनवण्यासाठी बॉयकॉट, डायव्हेस्टमेंट अँड सँक्शन (BDS) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व इस्रायली उत्पादने तसेच इस्रायल सोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर पूर्ण बहिष्कार करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. या अभियानाला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पॅलेस्टिनी जनतेचा मुक्तिसंघर्ष झिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

11 − 6 =