नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले

Palestine campaign

नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले. यादरम्यान कामगार-कष्टकरी जनतेने पॅलेस्टाईनी जनतेच्या स्वातंत्र्य-संघर्षाला का समर्थन दिले पाहिजे हे अधोरेखित करण्यात आले. मागील दीड वर्षांपासून पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर इस्रायल कडून शस्त्रास्त्रांचा मारा होत आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 58 हजारांच्या वर लोकं मारल्या गेलीत आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकं जखमी झालेत. बहुतांश लोकं इस्रायल–पॅलेस्टाईन ह्या विवादाला धर्माच्या चष्म्यातून बघतात आणि त्यासोबतच भांडवली माध्यमांद्वारेसुद्धा जे खोटे भ्रम पसरवले जात आहेत, त्यालाच सामान्य जनता सत्य मानते. आज आपण वरवरच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता इतिहास…

नौजवान भारत सभा (नौभास) च्या केंद्रीय परिषदेची बैठक हैदराबादमध्ये यशस्वीरित्या पार पडली!

Central Council meeting

साथींनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक ६ ते ८ जुलै २०२५ दरम्यान हैदराबाद (तेलंगणा) येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत रोजगार, शिक्षण, सध्याची सामाजिक परिस्थिती आणि युवक चळवळीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान संघटनेच्या गतकार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे काम अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन योजनांची आखणी करण्यात आली. सदस्यता मोहीम, प्रचारकार्य आणि आंदोलनात्मक उपक्रम यांचे आराखडे ठरवण्यात आले. परिषदेनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठराव संमत केले आणि गरजूं विषयांवर निवेदने जाहीर केली. येत्या काळात नौजवान भारत सभा विद्यार्थी, युवक आणि व्यापक जनतेचे जीवन…

नौजवान भारत सभा द्वारे ‘मकडी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

makdi movie screening

नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘मकडी’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘मकडी’ हा अंधश्रद्धेला आव्हान देणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा प्रभावी बालचित्रपट आहे. एका गावात, जिथे एका तथाकथित चेटकिणीच्या भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे, तिथे छोट्या चुन्नीची ही गोष्ट आहे. ती त्या वाड्यातील भयानक गोष्टींचा खरा तपशील शोधते. हा चित्रपट दाखवतो की अंधविश्वास आणि भीतीचा उपयोग काही छुप्या हेतूंसाठी कसा केला जातो. धैर्य, निरीक्षण आणि विचारशक्तीच्या जोरावर चुन्नी “भूतप्रेत-जादूटोणा” या मिथकाचा भेद उघडते आणि तिच्या सोबतच्या मुलांना विचारपूर्वक प्रश्न विचारायला आणि पुरावे…

नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

shivraynagar unemplyment discussion event

शुक्रवारी, 4 जुलै रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जोशपूर्ण घोषणांनी सभेची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर “आ रे नौजवान तेरी बेड़ियाँ रही है टूट” हे क्रांतिकारी गीत गायले गेले, ज्यामुळे उपस्थित जनतेचा उत्साह वाढला. त्यानंतर साथी सिद्धार्थ यांनी नौजवान भारत सभेची भूमिका मांडली. त्यामध्ये शहीद भगतसिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू आणि त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांचा वारसा आणि शहीदांचे विचार आजपण कसे प्रासंगिक आहेत आणि त्यांनी ज्या समतामूलक, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघितले होते तो समाज आजही वास्तवात आलेला नाहीये, हे अधोरेखित करण्यात आले.…

“आमची मुंबई, आमची बेस्ट” या बॅनरखाली वाढत्या भाडेदरांविरोधात आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खासगीकरणाविरोधात आंदोलन

aamchi Mumbai, aamchi BEST protest

नौजवान भारत सभा, विविध विद्यार्थी व युवक संघटना, नागरी संस्था गट, बेस्टने प्रवास करणारे  प्रवासी आणि काही कामगार संघटनांनी एकत्र येत, 4 जुलै रोजी “आमची मुंबई, आमची बेस्ट” या बॅनरखाली वडाळा बेस्ट डेपोत बेस्टच्या वाढत्या भाडेदरांविरोधात आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खासगीकरणाविरोधात आंदोलन केले. मागील महिन्यात तिकीटांचे दर दुप्पट करण्यात आले, ज्यामुळे जवळपास 4.5 लाख प्रवासी बेस्टचा वापर सोडून देऊन, आधीच गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायला लागलेत. दरम्यान, रेल्वे अपघात वाढतच चालले आहेत. अलीकडील मुंब्रा दुर्घटनेत पाच लोकांचा मृत्यू झाला, परिस्थिती किती गंभीर आहे, याचे हे ठळक उदाहरण आहे. मुंबईत…

नौजवान भारत सभा तर्फे पुणे येथील अप्पर भागात वाढत चाललेल्या बेरोजगारीवर संवाद अभियान चालवले गेले.

बस स्टँडवर, कॉलेजमध्ये, लेबर नाक्यांवर, अभ्यासिकांमध्ये, गॅरेजवर, वस्त्यावस्त्यांत, गल्लीबोळ्यांत, जिकडे नजर टाकावी तिकडं जास्तीत जास्त तरुणांचे पाणावलेले डोळे, हरवलेलं हसू, फिकट पिवळे चेहरे एकच चित्र दाखवत आहे—देशातील तरुणांमध्ये वाढत चाललेली निराशा. निराशा की इतके शिक्षण घेऊनही काहीच होत नाहीये… निराशा की काम करून करून शरीराला आराम नाही तरी हाताला पक्के काम नाही… निराशा की चांगलं जीवन जगण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नाहीत… आज देशाच्या तरुणांसमोर उभ्या अनेक प्रश्नांपैकी एक मुख्य प्रश्न म्हणजे बेरोजगारी. फक्त सरकारी आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर 2016 मध्ये 41.2 कोटी लोकांना नोकऱ्या होत्या, तर 2021 मध्ये फक्त 40.4…

नौजवान भारत सभा (नौभास) आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात अभियानाचे आयोजन

BEST campaign

30 जून आणि 1 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभा आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात पत्रके वाटण्याची मोहीम राबवली. ही मोहीम कुर्ला येथील बेस्ट डेपो आणि चेंबूरमधील वाशी नाका बस स्टॉपवर आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम सुरु करण्याचे तात्काळ कारण म्हणजे बेस्ट प्रशासनाने घेतलेला भाडेवाढीचा निर्णय. याअंतर्गत किमान भाडे दुप्पट करून 10 रुपये करण्यात आले आहे, तर कमाल भाड्याची पूर्वीची मर्यादा जी 20 रुपये होती ती पूर्णतः काढून टाकण्यात आली आहे. यामुळे, ज्या मार्गासाठी पूर्वी प्रवाशांना 25 कि.मी. अंतरासाठी 20 रुपये भाडे भरावे लागत…

बेस्ट खाजगीकरणाच्या विरोधात – 4 जुलै 2025 रोजी वडाळा बस डेपो येथे आयोजित जनआंदोलनात सामील व्हा!

भांडवलदारांच्या नफ्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा विकणे नाही चालणार!! देशभरात चाललेला सार्वजनिक क्षेत्राच्या लुटीचा डाव आता मुंबईच्या बेस्ट बस सेवेसमोर उभा ठाकला आहे. ज्या बेस्टला सामान्य मुंबईकरांनी आपल्या कररूपी पैशातून उभं केलं, तीच सेवा आता खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट सुरू आहे. याविरुद्ध 4 जुलै रोजी वडाळा बस डेपोवर एक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात दिनांक 26 जून 2025 रोजी मानखुर्द-गोवंडीतील शिवाजीनगर जुना बस डेपो परिसरात प्रचार अभियान राबवण्यात आले. अभियानादर्म्यान अनेक नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला – बस फेऱ्या कमी झाल्यात, भाडं प्रचंड वाढलंय, आणि सामान्य माणसाचं जगणं अधिकच…

नौभास तर्फे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि स्पोकन इंग्रजीचे वर्ग सुरू! या वर्गांमध्ये शिकवण्यासाठी पुढे या, व्हॉलंटीयर बना!

मागील दोन आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर आणि स्पोकन इंग्रजीचे वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल, टायपिंग, तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळा-कॉलेजांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून येणारे विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध असण्याची शाश्वती जवळपास नसतेच. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस…

विद्यार्थी सर्जनशीलता उपक्रम : अहिल्यानगर

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि समतामूलक समाज घडवणाऱ्या जबाबदार नागरिकांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने यंदाही उन्हाळी सुट्टीच्या काळात साप्ताहिक सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दर शनिवारी एक सर्जनशील उपक्रम! नौजवान भारत सभा, अहिल्यानगर शाखेने गेल्या दोन आठवड्यांपासून दर शनिवारी मुलांसाठी विविध सामूहिक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांना विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वर्षभर असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवावेत, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. आठवड्याचे उपक्रम: पहिला आठवडा – मैदानी खेळ: क्रिकेट उपक्रमाची सुरुवात क्रिकेट खेळाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये विशेषत:…