नौजवान भारत सभा द्वारे ‘मकडी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

makdi movie screening

नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘मकडी’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘मकडी’ हा अंधश्रद्धेला आव्हान देणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा प्रभावी बालचित्रपट आहे. एका गावात, जिथे एका तथाकथित चेटकिणीच्या भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे, तिथे छोट्या चुन्नीची ही गोष्ट आहे. ती त्या वाड्यातील भयानक गोष्टींचा खरा तपशील शोधते. हा चित्रपट दाखवतो की अंधविश्वास आणि भीतीचा उपयोग काही छुप्या हेतूंसाठी कसा केला जातो. धैर्य, निरीक्षण आणि विचारशक्तीच्या जोरावर चुन्नी “भूतप्रेत-जादूटोणा” या मिथकाचा भेद उघडते आणि तिच्या सोबतच्या मुलांना विचारपूर्वक प्रश्न विचारायला आणि पुरावे शोधायला शिकवते. ‘मकडी’ हा एक रंजक व रोमांचकारी चित्रपट असून तो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासेला प्रोत्साहन देतो. चित्रपटनानानंतर मुलांसोबत चर्चा करण्यात आली. भूत-प्रेत असते का? यांवर मुलांनी त्यांची मते मांडली. काही मुलांचा ठाम विश्वास बसला की भूत प्रेत वगैरे काही नसते, त्या आपल्या डोक्यातील कल्पना आहेत. ईश्वर आणि दानव दोन्हीवर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची मते मांडली. आपल्याला स्वप्न कशी येतात? जग कसे बनले? देव आहे का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टीला चिकित्सक दृष्टीने बघणे आणि योग्य प्रश्न विचाराने ही विज्ञानाची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे यावर मुलांनी सहमती दाखवली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जाणीव झाली की मानवाच्या डोक्यात येणारे विचार है भौतिक जगातूनच येतात, आपण जे अनुभवतो त्याच आधारावर आपल्या कल्पना शक्तीचा विकास होतो. या चित्रपटाने मुलांचे मनोरंजन केलेच पण सोबत त्यांच्या तार्किकतेला चालना देखील दिली.

नौजवान भारत सभा सोबत जोडून घेण्यासाठी, संपर्क: 7667230795

Related posts

Leave a Comment

1 × 4 =