नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नियमितपणे सुरू आहे — शहीद सुखदेव फिरते वाचनालय

मुंबईतील मानखुर्द-गोवंडी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात जगाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा वाढवणे, आणि समतामूलक समाजाची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने नौजवान भारत सभा (नौभास) दर रविवारी ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय’ हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात नौभास चे सदस्य पुस्तकांनी भरलेल्या बॅगा घेऊन वस्त्यांमध्ये जातात. या पुस्तकांमध्ये कथा, कविता, इतिहास, विज्ञान, कला अशा विविध विषयांचे साहित्य असते. गेल्या काही आठवड्यांपासून गौतम नगर आणि साठे नगर या भागांमध्ये नियमित वाचक तयार झाले आहेत. दर रविवारी हे वाचक पुस्तकं वाचतात, चित्रं काढतात, काहीजण आपले लेखनही सादर करतात, तर काही जण…

आझाद स्पोर्ट्स क्लबद्वारे बुद्धिबळ प्रशिक्षण सत्राचे आयोजन

नौजवान भारत सभा, मुंबईद्वारे संचालित आझाद स्पोर्ट्स क्लबतर्फे दि. 15 जून 2025 रोजी मानखुर्द येथील शहीद भगतसिंह वाचनालयात बुद्धिबळ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मानखुर्द-गोवंडी येथील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजच्या भांडवली व्यवस्थेत कामगार-कष्टकरी कुटुंबांतील मुलांना विविध खेळांमध्ये भाग घेणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या क्रीडा उपक्रमांकडे त्यांच्या कौशल्यविकासाचा नैसर्गिक भाग म्हणून पाहण्याऐवजी, सध्या खेळांचे वाढते बाजारीकरण आणि स्पर्धेचा अतिरेक यांमुळे हे उपक्रम आता केवळ आर्थिक क्षमता असलेल्या मुलांसाठीच उपलब्ध राहिले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रातील सहकार्य, सहभाग आणि सामूहिक प्रगतीची…

खेळातून सामाजिक विज्ञानाचे शिक्षण!

दि. १४ जून २०२५ रोजी शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी दोन मजेशीर उपक्रमांच्या माध्यमातून समता, न्याय आणि सामाजिक जबाबदारी या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ‘सोसायटी बिल्डर्स’ – या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःची एक काल्पनिक देशव्यवस्था तयार केली. यामध्ये त्यांनी कायदे, संसाधनांचे वाटप, नागरी हक्क आणि विविध संकटांवरील उपाय ठरवले. या प्रक्रियेतून शासनव्यवस्था, नागरी अधिकार, सामाजिक विविधता आणि सामाजिक विज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग शिकण्याची संधी मिळाली. ‘एकच ध्येय, वेगवेगळ्या संधी’ – या खेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे ध्येय देण्यात आले, मात्र काहींना ते जवळून, तर काहींना खूप…

शहीद-ए-आज़म भगतसिंह आणि त्यांचे क्रांतिकारी सहकारी ज्या समतामूलक समाजाचे स्वप्न डोळ्यात घेऊन आयुष्यभर संघर्ष करत राहिले आणि शेवटी शहीद झाले त्या शोषणमुक्त समाजाचे स्वप्न आजही अधुरे आहे.

नौजवान भारत सभा (नौभास) देशातील अनेक राज्यांमध्ये भगतसिंहांचा, आपल्या क्रांतिकारी शहिदांचा वारसा देशातील तरुण पीढीपर्यंत पोहचवण्याचे काम गेल्या दोन दशकापासून करत आहे. नौभास च्या क्रांतिकारी सुधार कार्यांपैकी एक महत्वाचे सुधार कार्य जे नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरु आहे ते म्हणजे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवणे ज्यात आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अभ्यास वर्ग चालवले जातात. शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र हे मानखुर्द, मुंबई च्या साठेनगर नावाच्या कामगार वस्तीमध्ये चालवले जाते. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 से 8 या वेळेत हे अभ्यासवर्ग घेतले जातात. 2025 – 26 च्या शैक्षणिक…

शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात ‘भूमितीचा परिचय’ या विषयावर विशेष सत्राचे आयोजन

दि. 4 जून 2025 रोजी, नौजवान भारत सभेद्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘भूमितीचा परिचय’ या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात खगोलशास्त्र, बांधकाम आणि भू-सर्वेक्षण या क्षेत्रांमध्ये भूमितीची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले. तसेच, प्राचीन इजिप्शियन लोकांनी क्षेत्रफळाच्या संकल्पना कशा विकसित केल्या, चौरस आणि त्रिकोण यांचे मूलभूत गुणधर्म कोणते आहेत, कोनांची संकल्पना कशी मांडली गेली, आणि बॅबिलोनियन लोकांनी वर्तुळ 360 अंशांमध्ये का विभागले याचा सखोल अभ्यास करण्यात आला. याशिवाय, त्रिकोणातील कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते हे सिद्ध करणारा ‘ओरिगामी पुरावा’ देखील…

विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – सिद्धार्थनगर, अहिल्यानगर

विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – पहिला दिवस  दि. 28 मे 2025 रोजी सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे नौजवान भारत सभा यांच्या वतीने सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या शिबिराचे हे चौथे वर्ष असून यंदा एकूण 88 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पहिला दिवस चित्रकला या विषयास समर्पित होता. शिबिराची सुरुवात सकाळी 7 वाजता राजू म्याना सरांच्या पी.टी. सत्राने झाली. यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि ‘ए भगतसिंग तू जिंदा है’ या गीताने वातावरण…

On Friday, the 30th of May 2025, a discussion session on Judicial Independence was conducted by the Naujawan Bharat Sabha at its Shaheed Bhagat Singh Library in Mankhurd, Mumbai.

The event was an initiative by law students associated with the organisation and aimed at critically examining the state of the judiciary, both historically and in contemporary times. The discussion began with an elaboration on why it is important to look at the judiciary with a critical eye. It was pointed out that the liberal celebration of the Constitution often hides the fact that the Constitution itself has contradictions that allow for human rights to be violated. The first half of the session was spent examining the scope of the…

नौजवान भारत सभा द्वारे ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ चित्रपटाचे प्रदर्शन

दि. २५ मे २०२५ रोजी नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसोबत ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना भगतसिंह आणि नौजवान भारत सभा यांच्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली. हा चित्रपट भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित असून, त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान व इतर क्रांतिकारकांशी परिचित होता आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने चित्रपट पाहिला व या क्रांतिकारकांच्या विचारसरणीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटानंतर विद्यार्थ्यांसोबत सखोल…

नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे चालवण्यात येणाऱ्या शहीद राजगुरू शिक्षण सहाय्यता केंद्राचे नवीन सत्र सुरू!

नौजवान भारत सभा (मुंबई) गेल्या पाच वर्षांपासून शहीद राजगुरू शिक्षण सहाय्यते केंद्र चालवत आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. हे केंद्र केवळ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासात मदत करण्यासाठी नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील नौभासच्या शहीद भगतसिंह वाचनालयाच्या आसपास राहणाऱ्या मुलांमध्ये प्रगतीशील विश्वदृष्टिकोन निर्माण करण्याचे देखील काम करते. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत गुण मिळावे ह्या उद्दिष्टाने विषय शिकवले जात नाहीत, तर आपण ज्या जगात राहतो ते समजून घेण्यास आणि त्यांना न्याय्य आणि मानवीय व्यक्ती बनण्यासाठी देखील प्रेरित केले जाते. नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी मानखुर्दमधील साठे नगर आणि…

नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा समारोप!

अप्पर सुप्पर बिबवेवाडी परिसरातील वस्तींतील मुलांसाठी नौजवान भारत सभेकडून राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा 16 मे, 2025 रोजी समारोप झाला. शेवटच्या दिवशी व्यायामाचे नवनवीन कष्टप्रद प्रकार घेण्यात आले, तसेच आत्मसंरक्षणाच्या उन्नत पद्धती शिकवण्यात आल्या. वेगवेगळी प्रथिने, जीवनसत्वे असलेल्या पोषक भाज्या-फळांची माहिती देण्यात आली. साथी लावण्या यांनी संगीताचे सत्र घेतले. इलेक्ट्रिक गिटारची आणि अकूस्टिक गिटारची माहिती देत त्यांच्यातले भेद सांगण्यात आले. भारतीय आणि जागतिक सांगीतिक स्वरलिपींची जडण-घडण समजावून सांगितली गेली. गिटारचे अवयव आणि गिटार वादनाच्या प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या. सरगम वादनाची मूलभूत संरचनात्मक पद्धत शिकवून मुलांकडून त्याचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले.…