नौजवान भारत सभा द्वारे ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ चित्रपटाचे प्रदर्शन

दि. २५ मे २०२५ रोजी नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसोबत ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना भगतसिंह आणि नौजवान भारत सभा यांच्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली. हा चित्रपट भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित असून, त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान व इतर क्रांतिकारकांशी परिचित होता आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने चित्रपट पाहिला व या क्रांतिकारकांच्या विचारसरणीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटानंतर विद्यार्थ्यांसोबत सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील व आजच्या समाजातील बदलांवर तसेच अजूनही अस्तित्वात असलेल्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. इंग्रज शासन भारतातून गेले असले तरीही आजही आर्थिक व सामाजिक असमानता कायम आहे. जाती-धर्माच्या आधारावर होणाऱ्या दंगलीही अद्याप थांबलेल्या नाहीत.
भगतसिंह यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून, त्यांच्या स्वप्नातील समतेवर आधारित समाज घडवण्यासाठी आजच्या युवकांनीही सजगपणे पुढे येणे आवश्यक आहे. सत्राचा समारोप ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आला.
नौजवान भारत सभा भविष्यात अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करत राहील.

Related posts

Leave a Comment

sixteen − 12 =