पहाटे झोपेतून लवकर उठून सर्व मुले पूर्ण उत्साहात शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते. मुलांकडून व्यायाम करवून घेत शिबिराला सुरुवात झाली. तद्नंतर “अलाईक” हा लघू-चित्रपट दाखवण्यात आला, ज्याद्वारे मानवी जीवनात कलेचे आणि सौंदर्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. चित्रपटावरील चर्चेमध्ये प्राण्यांपासून माणसाच्या भिन्नतेचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांद्वारे मुलांमध्ये मैत्री प्रस्थापित करणे तसेच त्यांच्यातील विविध कलागुण बाहेर काढणे ही कार्ये पार पडली. सामूहिक नाश्ता केल्यावर “कोको” हा संगीतावरील संवेदनशील चित्रपट दाखवून शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी शहीद सुखदेव थापर जन्मदिवस साजरा करण्यात आला. शहीद सुखदेव, भगतसिंग…
Category: Activities
नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे मानखुर्द-गोवंडी येथील कामगार-कष्टकरी वस्त्यांमध्ये ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय’ नियमितपणे सुरू आहे
शहीद सुखदेव फिरते वाचनालयाचे उद्दिष्ट तरुण व लहान मुलांपर्यंत पुरोगामी साहित्य पोहोचवणे हे आहे. सध्या हे फिरते वाचनालय मानखुर्द-गोवंडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर आणि गौतम नगर या वस्त्यांमध्ये नियमितपणे चालवले जाते. या परिसरातले सुमारे 30 ते 40 तरुण नियमितपणे पुस्तके घेतात. त्यांना फक्त वाचण्यासाठीच नाही, तर जे काही वाचलं आहे ते स्वतःच्या भाषेत लिहायला देखील प्रोत्साहन दिलं जातं. फॅशिस्ट शक्ती, गोदी मिडिया आणि सोशल मिडियाचा वापर करून समाजात विष पसरवत आहेत. अवैज्ञानिक, धार्मिक आणि द्वेषपूर्ण विचार पेरले जात आहेत. अशा काळात तरुण आणि लहान मुलांना वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि प्रगतिशील…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून अप्पर-सुप्पर बिबवेवाडी परिसरातील कामगार-कष्टकऱ्यांच्या वस्तींतील मुलांसाठी व तरुणांसाठी दर शनिवारी आणि रविवारी शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब राबविण्यात येत आहे.
या मार्फत त्यांमध्ये शिस्त, लोकशाही प्रगतीशील मूल्ये आणि सामुहिकता रुजविण्याचे काम चालू आहे. परंतु हे स्पोर्ट्स क्लब फक्त क्रीडाकलापांपुरते मर्यादित नसून एक व्यापक क्रांतिकारी ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चालविल्या जात आहे. आजरोजी फॅशिस्टांच्या मांडीवर बसलेल्या भांडवली मीडिया, प्रसारमाध्यमे, तसेच माहितीवर्धनाची आणि मनोरंजनाची सर्व दृकश्राव्य माध्यमे यांतर्फे जनतेवर भांडवली संस्कृतीचा व राजकारणाचा सतत मारा होत आहे आणि जनतेमध्ये जातीधर्माचे विष पेरण्याचे काम होत आहे. तेव्हा या राजकारणाला हाणून पाडणे आणि जनतेमध्ये प्रगतीशील दृकश्राव्याचा प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे होऊन बसले आहे. म्हणून ह्या स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळांसोबतच क्रांतिकारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या उद्दिष्टाने…
नौजवान भारत सभा द्वारे ऍबी मार्टिनच्या डॉक्युमेंटरीची स्क्रीनिंग – गाझा फाइट्स फॉर फ्रीडम चे आयोजन
पॅलेस्टिनी जनतेवर चालू असलेल्या नरसंहारात दररोज झायनिस्ट वसाहतवादी इस्रायली राज्याकडून केलेल्या अमानुष अत्याचारांच्या नव्या गोष्टी रोज समोर येत आहेत. संपूर्ण जगभरात लोक या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत आणि पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याशी एकजूट दाखवत आहेत. भारतातही पॅलेस्टाइनच्या समर्थनासाठी प्रयत्न होत आहेत, जरी बहुसंख्य जनता अजूनही इस्रायली राज्याच्या प्रचाराच्या प्रभावाखाली येत असली जो पश्चिमी मिडियामार्फत अधिक तीव्र केला जातो. यामुळेच पॅलेस्टाइनच्या मुक्तीच्या लढ्याचा इतिहास समजून घेणे, त्यावर अभ्यास करणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक झाले आहे — विशेषतः गाझा पट्टी आणि वेस्ट बँकेत राहणाऱ्या लोकांवर दशकानुदशके चाललेली हिंसक दडपशाही समजून घेण्यासाठी.…
नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे आयोजित केले गेले जालियानवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ सरदार उधम चित्रपटाचे स्क्रीनिंग!
106 वर्षांनंतर देखील जालियानवाला बाग हत्याकांड देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. 13 एप्रिल,1919 रोजी ब्रिटीश औपनिवेशिक सरकारच्या आदेशानुसार ब्रिटीश भारतीय फौजेने स्त्री, पुरुष व लहान मुले सामील असलेल्या, रौलेट कायदा 1919, ह्या कठोर, काळ्या कायद्याला शांततामय पद्धतीने विरोध करणाऱ्या जमावावर बेछूट गोळीबार केला. सरकारी आकडेवारीनुसार यात 400 मृत्यू दर्शवले गेलेत तर स्वतंत्र अहवालानुसार मारले गेलेल्यांची संख्या 1200 वर असल्याचे कळले. हे हत्याकांड भारताच्या वसाहतिक इतिहासातील अनेक बर्बर घटनांमधील एक ठळक उदाहरण आहे. स्क्रीनिंगनंतर झालेल्या चर्चेत वसाहतिक काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून आलेल्या वेगवेगळ्या सरकारांनी लागू केलेल्या जन विरोधी कायद्यांमधील साधर्म्याबद्दल…
‘जोतीराव फुले: जीवन आणि राजकारण’ ह्या नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित सत्रात जोतीराव फुलेंचा जीवनपट मांडण्यात आला.
काढलेली पहिली शाळा, दलित, महार, मातंग आणि मागास वर्गासाठी काढलेल्या शिक्षण संस्था, विधवा केशवपनाविरोधात घडवून आणलेला न्हाव्यांचा संप, ग्रंथालय स्थापना, घरातील पाण्याची विहीर सर्वांसाठी खुली करणे, दुष्काळात चालवलेले अन्न्छत्र, बालकाश्रम, बाल हत्या प्रतिबंधक गृह, बॉम्बे मिल हंड्स असोसिअशन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, इत्यादी जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली कामे यांच्या अनुषंगाने समाजात अस्तित्वमान जातीभेद, स्त्रियांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक, अवैज्ञानिक दृष्टीकोन, कामगारांची पिळकवणूक, यांविरोधात उचलेले विद्रोही पाऊल आणि जनतेच्या बळावर उभे केलेली संस्थात्मक कामे यांवर चर्चा केली. सुरुवातीला ब्रिटीश सरकारचे प्रशंसक असलेले जोतीराव नंतर वसाहतवादी ब्रिटीश सरकारच्या…
जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन संपन्न!
थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन व चर्चा! दिनांक 11 एप्रिल रोजी जनता वसाहत, पुणे येथे जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त नवीन शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर साथी अरुण यांनी थोडक्यात नौजवान भारत सभेचा इतिहास व भूमिका यावर वक्तव्य केले. नौजवान भारत सभा देशातील तरुणांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत त्यांना एकजूट करण्याचे काम करते, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्य यासारख्या जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यासोबतच समाजात रूढ असलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातीयवाद, धर्मांधता याला विरोध करत एका न्यायपूर्ण समाजाचे…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन!
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन! 23 मार्च, शहीद दिवस, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंह, सुखदेव राजगुरू देशासाठी शहीद झाले होते. त्याच्या स्मरणार्थ अणि त्यांचा क्रांतिकारी वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नौजवान भारत सभा, मुंबई ने शहीद स्मृती संकल्प अभियान यशस्वीरीत्या पार पाडले. ही रॅली मानखुर्द च्या कामगार वस्त्यांमधून काढण्यात आली. रॅलीची सुरवात पीएमजीपीच्या बाजारातून झाली. सुरवातीलाच क्रांतिकारी घोषणांनी पीएमजीपी चा बाजार दणाणून निघाला. रॅलीदरम्यान पत्रके, भाषण अणि क्रांतिकारी गीते गायली गेली. आपल्या भाषणातून नौभासच्या सदस्यांनी भगतसिंह…
‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन
‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन दि. 22 मार्च रोजी मानखुर्द-गोवंडी भागातील शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इलाक्यात पुस्तक प्रदर्शन आणि पोस्टरिंग आयोजित करण्यात आले. अभियानादरम्यान पत्रक वाटप करत विद्यार्थी, युवक आणि कामकरी जनतेमध्ये भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा क्रांतिकारी वारशाचा महत्व अधोरेखित करण्यात आले. या अभियानाला जनतेमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी नौजवान भारत सभा बद्दल जाणून घेण्याची इच्छा दर्शवली. आपल्या क्रांतिकारकांचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही पुढे देखील असे अभियान नियमितपणे आयोजित करू. शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी, संपर्क: 7667230795
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर नौजवान भारत सभाच्या वतीने शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहादत दिनानिमित्त (23 मार्च) तीन दिवसीय “शहीद स्मृती संकल्प अभियान” आयोजित करण्यात आले. हे अभियान शहरातील विविध भागांत राबवण्यात आले, ज्यामध्ये ‘बाईचीच चूक’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या माध्यमातून शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवला गेला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती नव्हते, तर त्यांचा…
