शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 23 मार्च, अहिल्यानगर – नौजवान भारत सभेच्या वतीने शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “भगतसिंह तू जिंदा है” आणि “आरे नौजवान” या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली. त्यानंतर साथी सायली हिने कार्यक्रमाच्या उद्देशाची आणि भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान “बाईचीच चू क” या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर साथी अतुल यांनी “शहीदांचा वैचारिक वारसा आणि आजच्या काळातील प्रासंगिकता” या…
Category: Activities
23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन!
शहीद क्रांतिकारकांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अमर रहे! 23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन! आज 23 मार्च. आजच्याच दिवशी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेने भारतीय क्रांतीचे अग्रदूत असणाऱ्या भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना फाशी देऊन भारतीय क्रांतिकारी आंदोलनाची अपरिमित हानी केली होती. जगभरातील क्रांतिकारी आंदोलनातून आणि रशियात झालेल्या महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीतून प्रेरणा घेत या क्रांतिकारकांनी भारतीय जनतेला ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मात्र भारतीय जनतेला ब्रिटिश गुलामीतून…
♦️शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान♦️
♦️शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान♦️ पुणे शहराच्या विविध भागांमध्ये तरुण-विद्यार्थ्यांपर्यंत क्रांतिकारकांचे विचार पोहोचवण्याचे अभियान सुरू आहे. नौजवान भारत सभेचे सदस्य बनण्याचे आणि क्रांतिकारकांचा संदेश देशाच्या कानाकोपर्यापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले जात आहे.
नौजवान भारत सभाचा सदस्यता प्रदान कार्यक्रम संपन्न
नौजवान भारत सभाचा सदस्यता प्रदान कार्यक्रम संपन्न दिनांक 22 मार्च 2025 रोजी नौजवान भारत सभेची शहीद भगतसिंह वाचनालय सुप्पर, पुणे येथे बैठक संपन्न झाली. गेला आठवडाभर 23 मार्च अंतर्गत पुण्यामध्ये विविध ठिकाणी बुक स्टॉल्स लावले गेले होते, त्यासोबतच वस्तीमधील युवकांसोबत बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक युवकांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता, तसेच त्यांनी नौजवान भारत सभेच्या कामांमध्ये सहभाग घेण्याचे दर्शवले होते. त्या अनुषंगाने आज 22 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली. यामध्ये अनेक नवीन साथींना सदस्यता देण्यात आली. या बैठकीची सुरुवात “रंग दे बसंती चोला” ह्या क्रांतिकारी गाण्याने झाली. त्यानंतर…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे भगतसिंह स्मृती संकल्प अभियान अंतर्गत पुण्याच्या वस्त्यांमध्ये पोस्टरिंग करण्यात आले.
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे भगतसिंह स्मृती संकल्प अभियान अंतर्गत पुण्याच्या वस्त्यांमध्ये पोस्टरिंग करण्यात आले.
शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु के शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई के साठे नगर में नौजवान भारत सभा द्वारा ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया गया।
शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु के शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई के साठे नगर में नौजवान भारत सभा द्वारा ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया गया। 21 मार्च की शाम, मानखुर्द के साठे नगर में पुस्तक प्रदर्शनी और पोस्टर प्रदर्शनी आयोजित की गयी, जहाँ बड़ी संख्या में लोग, विशेष रूप से युवा, उत्साहपूर्वक शामिल हुए और क्रान्तिकारियों के जीवन, संघर्ष और विचारधारा पर आधारित पुस्तकों को पढ़ने की रुचि दिखाई। साथ ही, कई लोगों ने अपने सम्पर्क भी साझा किए और भविष्य में ऐसे आयोजनों में सक्रिय रूप…
नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरू असलेल्या शहीद स्मृती संकल्प अभियानांतर्गत साठे नगर मधील खाडी आणि डब्बा कंपनी भागात रॅली काढून तसेच पत्रके वाटून क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला.
नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरू असलेल्या शहीद स्मृती संकल्प अभियानांतर्गत साठे नगर मधील खाडी आणि डब्बा कंपनी भागात रॅली काढून तसेच पत्रके वाटून क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात खाडी भागातून केली गेली आणि समापन डब्बा कंपनी येथील वस्त्यांमध्ये करण्यात आले. ह्या त्याच वस्त्या आहेत जिथे नौभास अनेक वर्षांपासून स्थानिक तसेच राजकीय मुद्द्यांवर इथे राहणाऱ्या कष्टकरी जनतेसोबत मिळून संघर्षात सामील आहेत. विविध अभियानांमार्फत, क्रांतिकारी सुधारकार्याद्वारे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत. कट्टर, फॅशिस्ट, संधीसाधू शक्तींद्वारे क्रांतिकारकांच्या वारश्यावर धूळ आणि राख पसरवण्याच्या प्रयत्नांविरोधात भाषण आणि घोषणा देत एकदा…
शहीद स्मृती संकल्प अभियान अंतर्गत वस्तीतील तरुणांसोबत बैठक
🟥शहीद स्मृती संकल्प अभियान अंतर्गत वस्तीतील तरुणांसोबत बैठक🟥 19 मार्च रोजी संध्याकाळी नौजवान भारत सभेतर्फे पुणे शहरात वस्तीतील तरुणांसोबत बैठक झाली. ह्या बैठकीमध्ये शहीद भगतसिंहांचे विचार आणि आजच्या संदर्भात त्याची प्रासंगिकता यावर चर्चा झाली. त्यामध्ये सुरुवातीला साथी सुस्मित यांनी भगतसिहांच्या राजकीय कार्यावर प्रकाश टाकत त्याची आजच्या काळात प्रासंगिकता काय आहे आणि त्यासोबत नौजवान भारत सभेची भूमिका काय आहे हे मांडले. यानंतर बैठकीला उपस्थित सर्वांनी सध्याच्या कष्टकरी जनतेच्या परिस्थितीवर भाष्य केले.संतोष यांनी आपले कामाचे अनुभव आणि मालक व ठेकेदारांसोबत चालणारा संघर्ष यांची उदाहरणे दिली, त्यामधून कामगारांचे बांधकाम क्षेत्रात शोषण कसे होते…
शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु की शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई में नौजवान भारत सभा की तरफ़ से ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है।
शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु की शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई में नौजवान भारत सभा की तरफ़ से ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है। मानखुर्द-गोवंडी, मुम्बई की मज़दूर बस्तियों व अन्य इलाकों में पुस्तक प्रदर्शनी, फिल्म स्क्रीनिंग, प्रचार अभियान आदि के माध्यम से नौजवानों और आम मेहनतकश आबादी के बीच क्रान्तिकारियों की विरासत को लेकर जाने का काम किया जा रहा है। कल मानखुर्द के लाल्लूभाई कंपाउंड के पास पुस्तक प्रदर्शनी आयोजित की गई। इसमें युवाओं ने क्रान्तिकारियों की किताबों के बारे में जानने की…
नौजवान भारत सभे तर्फे अप्पर, बिबवेवाडी, पुणे भागातील तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन
नौजवान भारत सभेकडून 23 मार्च शहीद दिनानिमित्त सदस्यता अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी 16 मार्च रोजी तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू सारख्या क्रांतिकारकांनी केलेली देशाच्या स्वातंत्र्याची व्याख्या मांडली गेली. फक्त ब्रिटिशांना या देशातून घालवणे एवढेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट नव्हते तर एक असा समातमूलक समाज निर्माण करणे, जिथे कुठल्याही प्रकारचे शोषण नसेल, जिथे स्त्री-पुरुष भेद नसतील, जिथे जातीय-धार्मिक भेद नसतील, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या देशात कामगार-कष्टकऱ्यांचे राज्य आले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे…
