शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम
दि. 23 मार्च, अहिल्यानगर – नौजवान भारत सभेच्या वतीने शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “भगतसिंह तू जिंदा है” आणि “आरे नौजवान” या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली. त्यानंतर साथी सायली हिने कार्यक्रमाच्या उद्देशाची आणि भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान “बाईचीच चू क” या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर साथी अतुल यांनी “शहीदांचा वैचारिक वारसा आणि आजच्या काळातील प्रासंगिकता” या विषयावर सखोल मांडणी केली. या चर्चेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध क्रांतिकारक गट, त्यांच्यावर रशियन समाजवादी क्रांतीचा प्रभाव आणि स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. भगतसिंहांनी दिलेल्या भाकीते आज सत्य ठरत आहेत – “काँग्रेस हा देशी भांडवलदारांचा पक्ष असून, स्वातंत्र्यानंतरही सत्ता भांडवलदारांच्याच ताब्यात जाईल. शेतकरी व कामगार वर्गाच्या जीवनात काहीही बदल होणार नाही!” आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर अनेक सरकारे सत्तेवर आली आणि गेली, मात्र कष्टकरी जनतेच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिकट झाली आहे. आजच्या काळात भांडवलशाहीच्या मंदीचा फायदा घेत फाशिस्ट शक्ती जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. अशा परिस्थितीत इतिहासातून प्रेरणा घेऊन तरुण आणि कष्टकरी जनतेने या अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध संघटित होणे अत्यंत गरजेचे आहे! कार्यक्रमाची सांगता “दोस्तीचा घेऊन हात” या गीताने झाली. शहीद भगतसिंहांनी पाहिलेले शोषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. 🔸 नौजवान भारत सभा 🔸 संपर्क: अतुल – 9403317106
