नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन!
23 मार्च, शहीद दिवस, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंह, सुखदेव राजगुरू देशासाठी शहीद झाले होते. त्याच्या स्मरणार्थ अणि त्यांचा क्रांतिकारी वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नौजवान भारत सभा, मुंबई ने शहीद स्मृती संकल्प अभियान यशस्वीरीत्या पार पाडले. ही रॅली मानखुर्द च्या कामगार वस्त्यांमधून काढण्यात आली. रॅलीची सुरवात पीएमजीपीच्या बाजारातून झाली. सुरवातीलाच क्रांतिकारी घोषणांनी पीएमजीपी चा बाजार दणाणून निघाला. रॅलीदरम्यान पत्रके, भाषण अणि क्रांतिकारी गीते गायली गेली. आपल्या भाषणातून नौभासच्या सदस्यांनी भगतसिंह अणि त्यांच्या साथीदारांचा क्रांतिकारी वारसा आज जाणून घेणे गरजेचे का आहे यावर भर दिला. भगतसिंह ज्या समाजाचे स्वप्न पाहत होते ते आज सुद्धा अपूर्ण आहे आणि त्यांचे विचार आज ही प्रासंगिक आहेत. त्यांचा लढा हा शोषण मुक्त समाज बनवण्याचा लढा होता, त्यांचा लढा भांडवलशाही व्यवस्थेचे उच्चाटन करण्याचा लढा होता. त्यांनी क्रांतीसाठी जीवन पणाला लावले होते. या स्मृती संकल्प अभियानातून तरुणांना नौजवान भारत सभेत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. अभियानाला स्थानिक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांनी नौजवान भारत सभेच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहयोग सुद्धा केला. काही तरुण रॅलीत पहिल्यांदा सामील झाले होते त्यांना या अभियानातून शहीदांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी नौभास सोबत काम करण्याची प्रेरणा मिळाली. रॅलीचा शेवट क्रांतिकारी गाण्यांनी झाला. #ShahidDivas #shahidbhagatsingh #shahidrajguru #shahidsukhdev #youthmovement #studentmovement #education #employment #inflation #revolution #socialism
