जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन संपन्न!

थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन व चर्चा!

दिनांक 11 एप्रिल रोजी जनता वसाहत, पुणे येथे जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त नवीन शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर साथी अरुण यांनी थोडक्यात नौजवान भारत सभेचा इतिहास व भूमिका यावर वक्तव्य केले. नौजवान भारत सभा देशातील तरुणांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत त्यांना एकजूट करण्याचे काम करते, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्य यासारख्या जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यासोबतच समाजात रूढ असलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातीयवाद, धर्मांधता याला विरोध करत एका न्यायपूर्ण समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत संघर्षरत असते.

यानंतर साथी रवी यांनी जोतिबा फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकत चर्चेची सुरुवात केली. रवी यांनी मांडले की जोतिबा फुले यांनी ब्राह्मणवादावर आणि जातीयवादावर कठोर प्रहार केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि अनेक कर्मठ रूढी परंपरांच्या विरोधात जोतिबा फुले यांनी क्रांतिकारी कार्य केले. परंतु आजही नव्या स्वरूपामध्ये कामगार कष्टकरी जनतेवर ज्ञानबंदी लादली केली आहे. आजही समाजामध्ये पुरुषसत्ता, जातीयवाद आणि शोषण कायम आहे. याविरोधामध्ये आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त अशा समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला एकजूट व्हावे लागेल असे मत मांडण्यात आले. चर्चेमध्ये विविध सहभागींनी आपली मते मांडत जातीयवाद, पितृसत्ता, भांडवली शोषण इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शेवटी क्रांतिकारी गीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related posts

Leave a Comment

3 × five =