‘जोतीराव फुले: जीवन आणि राजकारण’ ह्या नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित सत्रात जोतीराव फुलेंचा जीवनपट मांडण्यात आला.

काढलेली पहिली शाळा, दलित, महार, मातंग आणि मागास वर्गासाठी काढलेल्या शिक्षण संस्था, विधवा केशवपनाविरोधात घडवून आणलेला न्हाव्यांचा संप, ग्रंथालय स्थापना, घरातील पाण्याची विहीर सर्वांसाठी खुली करणे, दुष्काळात चालवलेले अन्न्छत्र, बालकाश्रम, बाल हत्या प्रतिबंधक गृह, बॉम्बे मिल हंड्स असोसिअशन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, इत्यादी जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली कामे यांच्या अनुषंगाने समाजात अस्तित्वमान जातीभेद, स्त्रियांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक, अवैज्ञानिक दृष्टीकोन, कामगारांची पिळकवणूक, यांविरोधात उचलेले विद्रोही पाऊल आणि जनतेच्या बळावर उभे केलेली संस्थात्मक कामे यांवर चर्चा केली. सुरुवातीला ब्रिटीश सरकारचे प्रशंसक असलेले जोतीराव नंतर वसाहतवादी ब्रिटीश सरकारच्या ब्राह्मणवाद समर्थक, गोरगरीब विरोधी धोरणांवर टीका करू लागले होते. दलित, स्त्रिया, इत्यादींचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्यांनी जमिनीवर अखंड काम करून जनतेला आपल्या सोबत जोडून घेतले, आयुष्यभर विज्ञाननिष्ठ मूल्यांचा, तर्कशीलतेचा, प्रगतीशील विचारांचा प्रचार प्रसार केला व स्वआयुष्यात देखील त्यांना लागू केले. आज शिक्षणाचे खाजगीकरण, जातीव्यवस्था, पितृसत्ता, भांडवलशाही, फॅशिझमने ज्याप्रकारे भारतीय समाजाला जकडून ठेवून सामान्य कष्टकर्यांचे दमन चालवले आहे, अशा काळात जोतीरावांचा क्रांतिकारी वारसा आत्मसात करून अन्याय अत्याचारांविरोधात लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. जोतीराव, सावित्री, फातिमा यांचा संघर्ष पुढे नेण्यासाठी, त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेसोबत जोडून घ्या.
सावित्री-जोतीरावांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद!

Related posts

Leave a Comment

4 × three =