खेळातून सामाजिक विज्ञानाचे शिक्षण!

दि. १४ जून २०२५ रोजी शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी दोन मजेशीर उपक्रमांच्या माध्यमातून समता, न्याय आणि सामाजिक जबाबदारी या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
1️⃣ ‘सोसायटी बिल्डर्स’ – या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःची एक काल्पनिक देशव्यवस्था तयार केली. यामध्ये त्यांनी कायदे, संसाधनांचे वाटप, नागरी हक्क आणि विविध संकटांवरील उपाय ठरवले. या प्रक्रियेतून शासनव्यवस्था, नागरी अधिकार, सामाजिक विविधता आणि सामाजिक विज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग शिकण्याची संधी मिळाली.
2️⃣ ‘एकच ध्येय, वेगवेगळ्या संधी’ – या खेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे ध्येय देण्यात आले, मात्र काहींना ते जवळून, तर काहींना खूप दूरून साध्य करावे लागले. या अनुभवातून संधीतील असमानता काय असते याची स्पष्ट जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ सामाजिक विज्ञानाचे अध्ययन केले नाही, तर ते अनुभवाच्या माध्यमातून जगले देखील. त्यांनी समजून घेतले की इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामाजिक न्याय यांचे शिक्षण आपल्याला अधिक संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवते.
नौजवान भारत सभा पुढील काळातही अशा खेळांद्वारे विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संकल्पना सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहील.
नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

four × one =