आझाद स्पोर्ट्स क्लबद्वारे बुद्धिबळ प्रशिक्षण सत्राचे आयोजन

नौजवान भारत सभा, मुंबईद्वारे संचालित आझाद स्पोर्ट्स क्लबतर्फे दि. 15 जून 2025 रोजी मानखुर्द येथील शहीद भगतसिंह वाचनालयात बुद्धिबळ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मानखुर्द-गोवंडी येथील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आजच्या भांडवली व्यवस्थेत कामगार-कष्टकरी कुटुंबांतील मुलांना विविध खेळांमध्ये भाग घेणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या क्रीडा उपक्रमांकडे त्यांच्या कौशल्यविकासाचा नैसर्गिक भाग म्हणून पाहण्याऐवजी, सध्या खेळांचे वाढते बाजारीकरण आणि स्पर्धेचा अतिरेक यांमुळे हे उपक्रम आता केवळ आर्थिक क्षमता असलेल्या मुलांसाठीच उपलब्ध राहिले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रातील सहकार्य, सहभाग आणि सामूहिक प्रगतीची खरी भावना हरवली आहे.
आज कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांना खेळांसाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्री, पायाभूत सुविधा आणि योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे.
नौजवान भारत सभा अशा क्रीडा उपक्रमांद्वारे क्रांतिकारी सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला चालना देण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. महान क्रांतिकारी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतिकारी वारशाला समर्पित ‘आझाद स्पोर्ट्स क्लब’ हे त्याच दिशेने एक पाऊल आहे.
या अंतर्गत बुद्धिबळ प्रशिक्षण सत्र प्रत्येक रविवारी संध्याकाळी ४ ते ६ वाजता आयोजित केले जाईल.

Related posts

Leave a Comment

one × 1 =