शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात ‘भूमितीचा परिचय’ या विषयावर विशेष सत्राचे आयोजन

दि. 4 जून 2025 रोजी, नौजवान भारत सभेद्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘भूमितीचा परिचय’ या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात खगोलशास्त्र, बांधकाम आणि भू-सर्वेक्षण या क्षेत्रांमध्ये भूमितीची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले. तसेच, प्राचीन इजिप्शियन लोकांनी क्षेत्रफळाच्या संकल्पना कशा विकसित केल्या, चौरस आणि त्रिकोण यांचे मूलभूत गुणधर्म कोणते आहेत, कोनांची संकल्पना कशी मांडली गेली, आणि बॅबिलोनियन लोकांनी वर्तुळ 360 अंशांमध्ये का विभागले याचा सखोल अभ्यास करण्यात आला. याशिवाय, त्रिकोणातील कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते हे सिद्ध करणारा ‘ओरिगामी पुरावा’ देखील सादर करण्यात आला.
‘शिक्षण सहायता केंद्र’ गणिताच्या इतिहासावर विशेष भर देते. आम्ही हे मानतो की गणित केवळ अमूर्त नियमांचा संच म्हणून शिकवले जाऊ नये, तर ते विशिष्ट सामाजिक व ऐतिहासिक संदर्भात उद्भवलेल्या प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विकसित झालेल्या पद्धतींच्या मालिकेच्या स्वरूपात शिकवले गेले पाहिजे. येत्या शैक्षणिक वर्षात, आम्ही अशा ऐतिहासिक दृष्टिकोनावर आधारित आणि समस्या-केंद्रित पद्धतीचा वापर करून माध्यमिक शाळेतील गणिताच्या अभ्यासक्रमातील विविध विषयांचा अभ्यास करण्याचे नियोजन करत आहोत.

Related posts

Leave a Comment

7 − 5 =