मित्रांनो, सावध रहा, सांप्रदायिक, धर्मांध शक्ती देश, देव व धर्मांच्या नावाखाली आपली माथी भडकवायला येतील, त्यांना तिथचं रोखा. आपल्या आजच्या दारिद्रयाला आरक्षण, अट्रोसिटी एक्ट, विशिष्ट जात-उपजात, एक विशिष्ट धर्म जबाबदार आहे असां खोटा प्रचार करतील, बळी पडू नका. कधी परप्रांतीय म्हणून, कधी परका म्हणून काबाडकष्ट करणाऱ्यांमध्ये बेकी निर्माण करतील, फसू नका. हे पक्कं लक्षात ठेवा — आपल्या दु:ख, दारिद्र व दैन्याच्या मुळाशी भांडवलशाही व्यवस्थेचं अर्थशास्त्र आहे. नफ्याचं आणि राजकीय सत्तेचं समिकरण आहे. अस्मितेचे राजकारण हे नेहमीच आपल्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईला कमजोर करत असते. हे विसरले नाही पाहिजे की आज जे धार्मिक-जातीय विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे तो देशातील भांडवलदार वर्गाचा पाठिंबा असलेल्या जातीयवादी शक्तींचा खेळ आहे. हा पाठिंबा आहे म्हणूनच या जातीयवादी शक्तींमध्ये इतकी हिंमत आली आहे.
Category: पत्रक
देशभर वाढत्या दलित विरोधी अत्याचारा विरुद्ध सर्व कष्टकऱ्यांनो एक व्हा
सवर्णवादी वर्चस्वाच्या या घृणास्पद पाशवी रूपाचा सामना गरीब, कष्टकरी दलितांनाच करावा लागतो आहे. जरी जातीगत अपमानाला दलित नोकरशहा, नेता व इतर उच्चवर्गीय दलितांनाही सामोर जावं लागत असले,तरी जातीगत उत्पीडनाच्या अशा पाशवी घटना प्रामुख्याने कष्टकरी दलितांच्या विरोधातच घटत असतात. एकुण काय, जर आकडे गोळा केले तर दिसेल की जातीय अत्याचाराच्या १०० पैकी ९९ प्रकरणांमध्ये कष्टकरी गरीब दलितचाच बळी जातो.
भगतसिंहाच्या 110व्या जयंतीनिमित्त – शहीदांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा!
संघ परिवार कोणत्यातरी बहाण्याने सतत मुसलमानांना हिंदूंचा शत्रू म्हणून प्रस्तुत करत असतो. संघ परिवाराची राजकीय संघटना असलेल्या भाजपचे सरकार एकीकडे श्रीमंतांच्या फायद्यासाठी जनतेला मिळत असलेल्या सुविधांमध्ये कपात करत चालली आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या खोटारड्या मुद्यांवर जोर देत आहे जेणेकरून लोक आपापसात लढत रहावेत आणि यांच्या लूटीवर प्रश्नच उपस्थित होऊ नये. तरूणांना या विरुद्ध उठावेच लागेल नाहीतर देश भयंकर विध्वंसाकडे चालू लागला आहे. जनतेला हे समजवावेच लागेल की त्यांच्या बरबादीचे कारण एखादा दुसरा देश किंवा धर्म नाही तर लूट आणि अन्यायावर टिकलेली आजची व्यवस्था आहे.
गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय – खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात
क्रांतिकारी लोकस्वराज्य अभियान : भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, तरुण, कष्टकरी करतील पूर्ण
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे हे कार्य मोजके धाडसी तरुण नाही करू शकत. हे कार्य व्यापक कष्टकरी जनतेची एकजूट आणि संघटनेशिवाय होऊ शकत नाही. सामान्य जनतेच्या भागीदारीशिवाय ते होऊ शकत नाही. या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही प्रामुख्याने तरुणांना करीत आहोत. इतिहासात अवरोधाचा बर्फ नेहमीच तरुणांच्या रक्तांच्या उष्णतेने वितळला आहे.
कष्टकरी सामान्य जनतेच्या आरोग्याचा पंचनामा आणि मोदी-योगीच्या जुमलेबाजीचं नग्न वास्तव
खरंतरं संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच आज आजारी आहे. भारतीय राज्यघटना भाग ३ कलम २१ मध्ये ‘जीवितांच्या रक्षणाचा अधिकार’ तर देते, पण जगण्यासाठीच्या पूर्वअटी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षणाच्या जबाबदारीतून अंग बाहेर काढत आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या(पीपीपी) नावाखाली आता आरोग्यसेवेच खाजगीकरण होतंय. परीणामी आरोग्य सेवा महाग होणं आलंच. एका बाजूला १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती केंद्रित झाल्याच अहवाल आहे, अन्न धान्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या वल्गना केल्या जाताहेत, तर दुसऱ्या बाजूला दिवसाला ५००० मुलं कुपोषणामूळं व भुकेमूळं मरताहेत. भांडवलशाहीत प्रत्येक गोष्ट पैशाच्या बाजारात तोलली जाते व कामगार-कष्टकरी सामान्य गरीब जनतेच्या जीवांची पर्वा या व्यवस्थेला नक्कीच नाही.
जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे
आज भारत असंख्य जातींमध्ये वाटला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांच्या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्या होते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्यांवरून समजते की २००७ पासुन उत्तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्या २५ आत्महत्यापैकी २३ आत्महत्या या दलित विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, श्रमिक-तरुण करतील पूर्ण
भगतसिंहाच स्वप्न फक्त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं मर्यादीत नव्हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्यवस्थाच इतिहासाच्या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच भगतसिंह म्हणाला होता की ‘आम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या शोषणाच्या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्यांच्या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्यांचा उद्देश ‘लुट करण्याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्यामुळे यांच्या लढ्याचा अंत कुठल्या ना कुठल्या सांमजस्यात, तडजोडीच्या रुपांत होईल’.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस–आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय!
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (8 मार्च) 107 व्या दिनानिमित्त आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय! ऐकी करुन लढायच हाय रं हाय!! बहिणींनो ! साथीनो! आपण एका बिघडलेल्या वातावरणात 107 वा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहोत. हा दिवस स्त्रीयांची समानता, त्यांची मुक्ती आणि त्यांच्या अधिकारांसाठी केलेल्या दिमाखदार संघर्षाची साक्ष देतो. या 10 मार्चला आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या अशा शिक्षिका होत्या ज्यांनी जातीव्यवस्थे बरोबरच स्त्रियांच्या गुलामी विरोधातही संघर्ष केला. आज तर स्त्रियांची सामाजिक स्थिती अजूनच बिघडत चालली आहे. स्त्रीविरोधी अपराधांचा आलेख सतत वाढतच चाललाय. देशांतील कुठल्या…
चला, सावित्रीबाई फुलेंचा लढा पुढे नेवूयात , नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात सर्वांना मोफत शिक्षणासाठी कटिबध्द्ध होवूयात…!
जोतिबा-सावित्री शिक्षणाचं हे कार्य सुरू करताना आणि नंतरही प्रस्थापित राज्यसत्तेवर विसंबून राहिले नाहीत , मग तो मुलींच्या शाळेचा प्रयत्न असो, नाहीतर प्रौढ साक्षरतेचे प्रयत्न असोत ,स्वतः पुढाकार घेवून त्यांनी हे काम चालू ठेवलं . अडचणी व संकटांचा सामना अत्यंत धाडसानं आणि धीरानं केला . शिक्षणाच्या क्षेत्रात इतक क्रांतीकारी काम करणार्या सावीत्रीबाईंचा जन्मदिवसच खरा शिक्षक दिन होऊ शकतो पण विपर्यास असा आहे की एका अशा व्यक्तींचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातोय ज्यांच्यावर थिसीस चोरीचा आळ तर आहे शिवाय जो चातुर्वणाच समर्थन करतो.