भगतसिंहाच्या 110व्या जयंतीनिमित्त – शहीदांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा!

भगतसिंहाच्या 110व्या जयंतीनिमित्त (28 सप्टेंबर)
शहीदांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा!
आपसात फूट नको, एकजुट व्हा, हक्कासाठी मिळून लढा !!

मित्रहो,

शहीद भगतसिंहाची जयंती आज आपण अशा वेळी साजरी करत आहोत, जेव्हा या भांडवली व्यवस्थेचे पाशवी, खूनी, शोषक चरित्र एकदम उघडे पडले आहे. लोकांच्या मूलभूत हक्कांवर रोज दरोडा टाकला जात आहे. सत्तेला हपापलेल्या मूठभर भांडवलदारांच्या नफ्यासाठी पूर्ण देशालाच लुटीचे कुरण बनवले आहे. जो कोणी या बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवतो, त्याला ‘देशद्रोही’ घोषित केले जाते आहे, अगदी तसेच जसे भगतसिंह आणि त्याच्या साथीदारांना ‘देशद्रोही’ म्हटले गेले होते. हेच कारण होतं की भगतसिंह म्हणाला होता, “गोऱ्या इंग्रजाच्या जागी काळे इंग्रज येणं म्हणजे स्वातंत्र्य नाही”. 23 मार्च 1931 रोजी शहीद होण्या अगोदर त्यानं इशारा दिला होता, “इंग्रजांच्या सत्तेचा पाया हादरला आहे. आणि 15 वर्षात ते इथून निघून जातील. नंतर पुष्कळ वर्षे अफरा-तफरीत निघून जातील, मग लोकांना माझी आठवण येईल”.

आज जेव्हा विद्यार्थी-युवक-कामगार-कर्मचारी-सैनिक-दलित-अल्पसंख्याक-स्त्री कोणीही जेव्हा आपल्या हक्कासाठी आवाज उठवतोय तर त्याचा संघर्ष बुटांखाली चिरडून टाकला जातोय. छेडछाड व लंपटपणाविरूद्ध आंदोलन करणाऱ्या बी.एच.यू.च्या विद्यार्थ्यांनींवर झालेला अमानुष लाठीचार्ज याच अगदी ताज उदाहरण आहे. गोरखपूर मेडिकल काॅलेज मधल्या निरागस चिमुरड्यांचा मृत्यू आणि त्यांच्या परीवारातील सदस्यांचा आक्रोश अजूनही कानात घुमतो आहे.महागाई-बेरोजगारी दूर करण्याचा “जुमला” आता जणू एक अश्लील विनोद बनलाय. पेट्रोल-डिझेल पासून खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत आणि औषधोपचार, शिक्षण प्रत्येक गोष्ट महागाईच्या आगीन पेटली आहे. विद्यार्थी-तरूण, बेरोजगारीची मार खात आहेत आणि दुसरीकडे सरकारी नोकऱ्या दररोज कमी केल्या जात आहेत. खाजगी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांमधून लाखो लोकांना कामावरून काढण्याच्या बातम्या तर वर्तमानपत्रात येतच आहेत, पण छोट्या कंपन्या आणि कारखान्यांमधूनही कामावरून काढून टाकलेल्यांची संख्या खुप जास्त आहे. काही लोकांच्या फायद्यासाठी केलेली नोटबंदी आणि नंतर जी.एस.टी.च्या माऱ्यामुळे अगोदरच कमजोर असलेल्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. थोडेफार शिल्लक राहिलेले सरकारी उपक्रम सुद्धा खाजगीकरणातून विकले जात आहेत आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अधिकारांमध्ये सतत कपात होत आहे. देशातील जल-जंगल-जमिनीला देशी-विदेशी दरोडेखोरांना लूटू देण्याचे अगोदरच्या सरकारांचे धोरण अजून वेगाने राबवले जात आहे.  भ्रष्टाचार, अपराध, अस्वच्छता कशातही फरक पडलेला नाही. तरीही पंतप्रधान गरीबांचे जीवन बदलल्याच्या, देशाच्या विकासाच्या बाता मारण्यात मग्न आहेत. विकाऊ मीडीया तर निर्लज्जपणे सरकारचे गुणगाण करण्यात व्यस्त आहे. व्हाट्सएप, फेसबुक वर सरकारची खोटी स्तुती करण्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून हजारो लोकांना नोकरीवर ठेवले आहे.

या लूटीच्या आणि बेबंदशाहीच्या विरोधात लोकांनी संघटीत होऊ नये म्हणून सांप्रदायिकता, अंधराष्ट्रवाद आणि कट्टरतेचे विष लोकांच्या मेंदूत भरले जात आहे. तर्कनिष्ठता, पुरोगामी विचार आणि मानवतेला पुढे नेणाऱ्या मूल्यांवर सतत संघटीतपणे हल्ले केले जात आहेत. दुसरीकडे प्रत्येक अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांची एक मोठी संख्या यावेळी निराशेत, कुंठीतावस्थेत आणि भ्रमात सापडलेली आहे. चांगल्या भविष्यासाठी झेप घेणारे त्यांचे पंख चिखलाने माखले आहेत. अशा वेळी भगतसिंहाच्या शब्दांमध्ये “क्रांतीची उर्मी पुन्हा जागी करण्याची गरज आहे, ज्याने मानवतेच्या आत्म्यात चेतना संचारेल”. म्हणूनच आम्ही शहीद क्रांतिकारक भगतसिंहाच्या जयंतीदिनी त्यांच्या स्वप्नांची पुन्हा आठवण करत आहोत आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे आवाहन  तरूणांना करत आहोत.

काय होते भगतसिंह, सुखदेव, राजगुरूचे स्वप्न?

भगतसिंहाचे स्वप्न फक्त इंग्रजांना देशातून पळवून लावणे नव्हते. उलट त्यांचे स्वप्न होते हजारो वर्षांपासून चालत आलेल्या गरीब-श्रीमंताच्या व्यवस्थेला इतिहासाच्या कचरापेटीत टाकून, समता आणि न्यायावर आधारित समाज बनवण्याच्या एका नव्या युगाची सुरूवात करणे. 1930 सालीच भगतसिंहांनी म्हटले होते की आम्ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या आणि एका देशाकडून दुसऱ्या देशाच्या शोषणाविरुद्ध आहोत. कॉंग्रेस आणि गांधींच्या वर्ग-चरित्राकडे पाहून आणि धनिक व जमीनमालकांवर त्यांचे असलेले अवलंबित्व पाहता भगतसिंहाने इशारा दिला होता की यांचे उद्दिष्ट लुटण्याची शक्ती इंग्रजांकडून काढून घेऊन मूठभर भारतीय दरोडेखोरांच्या हातात देणे आहे; त्यामुळेच या स्वातंत्र्याच्या लढाईचा अंत कोणत्यातरी तडजोडीतच होणार आहे. भगतसिंहाने 6 जून 1929 रोजी कोर्टातील आपल्या ऐतिहासिक भाषणात म्हटले होते की – “आमच्यासाठी क्रांतीचा अर्थ आहे मूठभर परजीवी जमातींकडून सामान्य जनतेच्या लूटीवर आधारित, अन्यायावर आधारित प्रस्थापित व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचा प्रमुख हिस्सा असूनही मजुरांना त्यांच्या प्राथमिक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे आणि त्यांच्या कमाईचा पैसा शोषक भांडवलदार हडप करत आहेत.  दुसरीकडे अन्नदाता शेतकरी आपल्या कुटुंबासहीत उपाशी आहे. जगभरातील बाजारांना कपडे पुरवणाऱ्या विणकराला स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या अंगावर घालण्या इतपतही कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार आणि सुतार स्वत: गलिच्छ वस्त्यांमध्ये राहून जीवनकार्य संपवतात. याउलट समाजातील परजीवी शोषक भांडवलदार छोट्याछोट्या गोष्टींसाठी लाखो रुपये उधळून टाकतात.”

भगतसिंह आणि त्यांचे साथीदार असा समाज बनवू पाहत होते ज्यात जात-धर्माच्या नावाने झगडे नसतील. भगतसिंहाने जेव्हा देशातील तरूणांना संघटीत करण्यासाठी ‘नौजवान भारत सभा’ स्थापन केली तेव्हा या गोष्टीला विशेषत: ध्यानात ठेवले. भगतसिंहाची संघटना सुरूवातीपासूनच धर्मनिरपेक्ष होती. इंग्रज जेव्हा स्वातंत्र्याच्या लढाईला कमजोर करण्यासाठी हिंदू-मुसलमानांना आपापसात लढवत होते तेव्हा हिंदू महासभा आणि तबलीगी जमाती सारख्या कट्टर संघटना सुद्धा हिंदू-मुसलमान भांडणं काढून इंग्रजाना एका प्रकारे मदतच करत होते. भगतसिंहासारख्या क्रांतिकारक विचारांना भारतातील शासक वर्गाने नेहमीच धूळ आणि राखेखाली दाबून ठेवण्याचे षडयंत्र रचले आणि त्यांना बंदूक-पिस्तुलाच्या तरूणाच्या स्वरूपात जनतेमध्ये स्थापित केले. वस्तुस्थिती ही आहे की सुरूवातीच्या क्रांतिकारक काळाला सोडले तर भगतसिंह सतत जनतेला जागृत करण्याच्या आणि व्यापक स्तरावर संघटीत करण्याच्या मार्गानेच क्रांती करण्याचे समर्थक होते. तुरूंगातून विद्यार्थ्यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात ते लिहीतात  – “यावेळी तरूणांना आम्ही हे सांगू शकत नाही की त्यांनी बॉंब आणि पिस्तुल उचलावेत. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षाही महत्वपूर्ण कामं आहेत.  तरूणांना क्रांतीचा हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवायचा आहे, फॅक्टरी-कारखान्यांच्या क्षेत्रामध्ये, गलिच्छ वस्त्यांमध्ये आणि गावांमधील मोडकळीस आलेल्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांमध्ये क्रांतीचे निखारे फुलवायचे आहेत ज्यातून स्वातंत्र्य येईल आणि तेव्हा एका मनुष्याकडून दुसऱ्याचे शोषण अशक्य होईल”. भगतसिंहाने देशी-विदेशी लूटीला समाप्त करणे आपले उद्दिष्ट सांगितले होते.

हे कसले आणि कोणाचे स्वातंत्र्य आहे? जनतेच्या वाट्याला तर फक्त लूट आणि बरबादीच आहे

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांमध्ये शासक वर्गांनी जनतेला हळूहळू नरककुंडात ढकलले आहे. “विकासा”चे वास्तव हे आहे की देशातील वरच्या 1 टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 58.4% संपत्ती एकत्र झाली आहे, वरच्या 10 टक्के लोकांकडे पाहिले तर त्यांच्याकडे देशातील 80.7 टक्के संपत्ती एकत्र झाली आहे. दुसरीकडे खालच्या 50 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या फक्त 1 टक्का आहे. देशातील गोदामांमध्ये अन्न सडत आहे आणि दुसरीकडे दररोज जवळपास 9,000 मुलं कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे मरत आहेत. संयुक्त राष्ट्र संघानुसार कुपोषणामुळे मरणारं जगातील प्रत्येक तिसरं मुलं भारतातील आहे. देशातील जवळपास 30 कोटी लोक बेरोजगारीचे धक्के खात आहेत. जनतेच्या सुविधांमध्ये सतत कपात केली जात आहे आणि श्रीमंत्तांचे अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे.

फासीवादाचा उदय

भांडवलदारांनी पैदा केलेल्या आर्थिक संकटामुळे जेव्हा त्यांच्या नफ्यामध्ये कपात होऊ लागते तेव्हा ते अशा फासीवादी शक्तींना मजबूत करतात ज्या जनतेचे वाईट पद्धतीने शोषण करण्यात त्यांची मदत करतात. जनतेच्या असंतोषाला चिरडून टाकण्यासाठी फासीवादी अनेक डावपेच वापरतात. भांडवली लूटीला लपवण्यासाठी ते “विकासा”चा ढोल वाजवतात, “चांगले दिवस येतील” असा खूप प्रचार करतात. दुसरीकडे जनतेसमोर वंश, धर्म, आणि “राष्ट्राच्या” नावाने एक नकली शत्रू उभा करतात. भारतात संघ परिवार हेच काम करत आहे. संघ परिवार कोणत्यातरी बहाण्याने सतत मुसलमानांना हिंदूंचा शत्रू म्हणून प्रस्तुत करत असतो. संघ परिवाराची राजकीय संघटना असलेल्या भाजपचे सरकार एकीकडे श्रीमंतांच्या फायद्यासाठी जनतेला मिळत असलेल्या सुविधांमध्ये कपात करत चालली आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या खोटारड्या मुद्यांवर जोर देत आहे जेणेकरून लोक आपापसात लढत रहावेत आणि यांच्या लूटीवर  प्रश्नच उपस्थित होऊ नये. तरूणांना या विरुद्ध उठावेच लागेल नाहीतर देश भयंकर विध्वंसाकडे चालू लागला आहे. जनतेला हे समजवावेच लागेल की त्यांच्या बरबादीचे कारण एखादा दुसरा देश किंवा धर्म नाही तर लूट आणि अन्यायावर टिकलेली आजची व्यवस्था आहे.

साथींनो, भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांकडून प्रेरणा घेत आपल्याला उभे रहावेच लागेल. आम्ही सर्व न्यायप्रेमी नागरिक, कष्टकरी, आणि विद्यार्थी-तरूणांकडे आपला हात पुढे करत आहोत. देशात एक नवी सुरूवात झाली आहे. भगतसिंहाने बनवलेल्या “नौजवान भारत सभे”ला आम्ही पुन्हा जिवंत केले आहे. देशातील अनेक कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये आम्ही त्याच आदर्शांवर एक क्रांतिकारक विद्यार्थी संघटना बनवत आहोत. कष्टकऱ्यांमध्ये सुद्धा कामाला सुरूवात झाली आहे, स्त्रीया आणि जागरूक नागरिकांचे मंच सुद्धा जागोजागी संघटीत होत आहेत. आपल्या विशाल देशाकडे बघता ही सुरूवात छोटी वाटू शकते पण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सूरूवात पहिल्या पावलानेच होत असते. जर दिशा योग्य असेल, संकल्प मजबूत असेल, आणि विचार वैज्ञानिक असेल्, तर हवेच्या एका झुळकीचेही  चक्रीवादळात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.  जर तुम्ही एका जिवंत माणसासारखे जगायला आणि हक्कांसाठी लढायला तयार असाल, तर आमच्याशी नक्की संपर्क करा.

भगतसिंहाने दिला आवाज, बदला-बदला देश समाज

भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, तरुण, कष्टकरी करतील पूर्ण 

क्रांतिकारी अभिवादनासह

बिगुल मज़दूर दस्ता, नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना,

यूनीवर्सिटी कम्युनिटी फ़ॉर डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी (यूसीडीई)

मुंबई संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, रूम न-103, बिल्डिंग 61 ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम), मुम्बई
फोन न. – 9619039793, 9145332849, 8826265960

अहमदनगर संपर्क
पताः शहीद भगतसिंह पुस्तकालय, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागेे, सिद्धार्थनगर, अहमदनगर
फोन न. – 9156323976, 8888350333, 9156824706, 7058197729

वेबसाइट : www.naubhas.in, www.mazdoorbigul.net

फेसबुक पेज : www.facebook.com/naujavanbharatsabha ईमेल :  naubhas@gmail.com

Related posts

Leave a Comment

17 − three =