अनेक जाती विरोधी व्यक्तीत्वांना खुद्द भारत सरकारनेच स्वातंत्र्यानंतर प्रचारित-प्रसारित केले आहे, पण अय्यंकालींना नाही. का? कारण अय्यंकाली मुलगामी पद्धतीने आणि झुंझार पद्धतीने रस्त्यांवर उतरून संघर्षांचा रस्ता स्विकारत होते, कारण अय्यंकाली सरकारच्या सदिच्छेवर किंवा समजदारीवर भरवसा करत नव्हते, उलट जनतेच्या पुढाकारावर भरवसा करत होते. सत्ताधारी वर्ग सुद्धा त्यांच्या जीवनकार्याच्या या बाजूवर गप्प बसून असतो आणि फक्त पूजा आणि सन्मानाच्या गप्पा करतो, कारण जर कष्टकरी दलित आणि दडपलेली जनता त्यांच्याबद्दल जाणेल, तर त्यांच्या मार्गाबद्दलही जाणेल आणि हे सध्याच्या भांडवली आणि जातीयवादी सत्तेला कधीच मान्य नसेल की त्यांच्या विरोधात मुलगामी संघर्षांच्या रस्त्याने जनतेने जावे आणि स्वत:च्या पुढाकारावर भरवसा निर्माण करावा. हेच कारण आहे की अय्यंकालींच्या वारशाला जनतेच्या शक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या स्मृतींना प्रगतीशील शक्तींनी जिवंत ठेवले पाहिजे. त्यांच्या आंदोलनाच्या रस्त्याला व्यापक कष्टकरी आणि दलित जनतेमध्ये आपल्याला घेऊन जावे लागेल.
Category: Uncategorized
तरुणांना आवाहन / पीटर क्रोपोतकिन
मला माहीतीये, तुमच्या मनातला पहीला प्रश्न जो तुम्ही वारंवार स्वत:लाही विचारलेला आहे, अन् तो म्हणजे, “मी काय व्हायला पाहीजे?” खरंतर तारुण्यांत माण्सं असा विचार करतात की एखादी विद्या वा विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर, जे समाजाच्या योगदानांमुळं शक्य होतं, आपण आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांच्या अधिकारासाठी करायला हवा, जे आज विपन्नावस्थेत, दु:खांत आणि अज्ञानांत खितपत पडलेत. त्याच्यासाठी शिक्षण, नुस्तं कमाईच्या जोरावर आपल्या व्यक्तीगत लाभासाठी लूटीच्या हत्यारासारखा वापर करण्यांसाठी नक्कीच नसतं. मग जर कुणी असा विचार करत नसेल तर नक्कीच त्यांचा मेंदू विकृतीनें ग्रस्त आहे किंवा व्यसनांनी त्याला वेडा बनवलं असणार.
भगत सिंह – धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम
प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमकुवत बनवणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच नष्ट करणे आहे.
भगत सिंह – अस्पृश्यता समस्या
तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्हान द्या. मग तुम्ही पाहाल की तुम्हांला अधिकार देण्याला नकार देण्याची भाषा करण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोकरशाहीच्या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे.
खऱ्या देशभक्तांचे स्मरण करा! नकली देशभक्तांचे खरे रूप ओळखा!
स्वत: विचार करा, “देशभक्ती” “राष्ट्रवाद” “भारत माता” यांसारख्या गोंधळाद्वारे संघ परिवार आणि मोदी सरकार देशाशी गद्दारी करण्याचा आपला जुना इतिहास आणि जनतेच्या विरोधात टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांची दलाली करण्याचे आपले खरे स्वरूप दडवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना? खऱ्या मुद्यांपासून आपले लक्ष विचलित करण्यासाठी तर ते हा गदारोळ माजवन नाहीयेत ना? महागाई दूर करण्याच्या,बेरोजगारीपासून मुक्ती देण्याच्या, सर्व खात्यांमध्ये १५ लाख रूपये जमा करण्याच्या वचनांचा आपल्याला विसर पाडण्याचा प्रयत्न तर संघ परिवार आणि मोदी सरकार या गोंधळाद्वारे करीत नाहीये ना? स्प्ष्टच बोलायचे तर आपल्याला मूर्ख तर बनवले जात नाहीये ना? विचार करा, आपले खरे शत्रू कोण आहेत? द्वेषभावना बाजूला सारून, थांबून, एकदा विचार करा. २ लाख कोटी रूपयांचा व्यापम घोटाळा करणारे, घोटाल्यातील ५० साक्षीदारांचे खून पाडणारे, विधानसभेत बसून पॉर्न वीडियो पाहणारे, विजय माल्या आणि ललित मोदी सारख्यांना देश सोडून पळून जाण्यास मदत करणारे देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे ढोंग करुन आपल्या खिशावर दरोडा घालत नाहीयेत ना? तुमच्या घरांना भगदाड तर पाडत नाहीयेत ना? आपण आपल्या खऱ्या शत्रूंना ओळखू नये, जात-धर्माचे झगड़े सोडून एकजूट होऊ नये म्हणून ते ब्रिटिशांचे “फोडा आणि झोडा”चे धोरण तर राबवीत नाहीयेत ना? विचार करा, नाहीतर उद्या फार उशीर झालेला असेल. जी आग ते लावत आहेत त्यात आपली घरे जळणार आहेत, आपलीच माणसे होरपळणार आहेत. म्हणून, विचार करा