काकोरी ऍक्शन मधील क्रांतिकारकांच्या शहादत दिनानिमित्त मुंबईच्या मानखुर्द – गोवंडी भागात पोस्टरिंग

आज फॅशिस्ट ताकती देशभरात सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच संभळपासून अजमेरपर्यंत मंदिर-मशिदीचे राजकारण करत, भाजप आणि संघ परिवार जनतेला त्यांच्या खऱ्या मुद्द्यांपासून दूर भटकवण्याचे काम करत आहेत. या प्रतिक्रियावादी शक्ती समाजाला द्वेष आणि रक्तपाताच्या दलदलीत ढकलण्याचा कट रचत आहेत. मानखुर्द मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशचा झेंडा बनवून धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अशा काळात जनतेची एकी मजबूत करणे हा अत्यंत महत्त्वाचा कार्यभार बनला आहे, जेणेकरून आपण आपले खरे मुद्दे म्हणजेच शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आवास यावर एकत्र येऊन त्यांना साध्य करण्याच्या लढ्याला पुढे घेऊन जाऊ. नौभासच्या पोस्टर्समध्ये आम्ही या मुद्द्यांवर भर दिला आहे आणि अशफाक-बिस्मिल यांच्या मैत्रीला आपल्या क्रांतिकारी वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अधोरेखित केले आहे. फॅशिस्टांच्या खोट्या प्रचाराला पराजित करण्यासाठी आजच्या तरुणांनी आपल्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवण्याच्या स्वप्नाला समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

Related posts

Leave a Comment

eighteen − three =