भगतसिंह – बॉम्‍ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन

क्रांतीच्‍या ध्‍येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्‍या युद्धाच्‍या शेवटी, सर्वहारा वर्गाच्‍या सर्वाधिकारशाहीची स्‍थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्‍या ध्‍येयाची पूर्ती करण्‍याचा मार्ग प्रशस्‍त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्‍मजात अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्‍वातंत्र्य हा प्रत्‍येक माणसाचा जन्‍मसिद्ध अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्‍या सर्वंकष सत्‍तेची स्‍थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्‍ट आहे.

भगतसिंह – विद्यार्थी आणि राजकारण

विद्यार्थ्यांचे मुख्‍य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्‍हांला मान्‍य आहे आणि त्‍यांनी आपले पूर्ण लक्ष त्‍यावर केंद्रित करावे; पण देशाच्‍या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्‍याचे उपाय यांचा विचार करण्‍याची क्षमता वि‍कसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्‍त कारकूनी करण्‍यासाठी घेतले जाते, त्‍या शिक्षणालाही आम्‍ही निरुपयोगी मानतो. मग अशा शिक्षणाची गरजच काय? काही महाचतुर लोक असे म्‍हणतात, “मुला, तु राजकारण बघून जरूर शिक आणि विचार कर, पण प्रत्‍यक्ष राजकारणात कोणत्‍याही प्रकारचा सहभाग घेऊ नकोस. तू अधिक लायक बनलास तर तेच देशाच्‍या दृष्‍टीने फायद्याचे आहे.”

गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय – खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात

संघच नाही तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवण्यात पटाईत आहेत. उदाहरणार्थ, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी एक फोटो सामायिक (शेअर) केला होता ज्यात लोक तिरंग्याला आग लावत होते. खाली लिहिले होते की प्रजासत्ताक दिनी हैदराबाद मध्ये तिरंग्याला आग लावली जात आहे. आता गूगल इमेज सर्च (गुगलची  चित्र शोधणारी सोय)  एक नवीन सुविधा देत आहे ज्यात कोणताही फोटो टाकला की समजते की फोटो कधीचा आणि कुठला आहे. प्रतिक सिन्हांनी हे काम केले आणि गडकरींच्या खोटारडेपणाला समोर आणले. असे दिसून आले की हा फोटो हैदराबादचा नाही तर पाकिस्तानातील आहे जिथे एका बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनेनेने भारताच्या विरोधात तिरंगा जाळला होता. 

क्रांतिकारी लोकस्‍वराज्‍य अभियान : भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, तरुण, कष्टकरी करतील पूर्ण 

सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे हे कार्य मोजके धाडसी तरुण नाही करू शकत. हे कार्य व्यापक कष्टकरी जनतेची एकजूट आणि संघटनेशिवाय होऊ शकत नाही. सामान्य जनतेच्या भागीदारीशिवाय ते होऊ शकत नाही. या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही प्रामुख्याने तरुणांना करीत आहोत. इतिहासात अवरोधाचा बर्फ नेहमीच तरुणांच्या रक्तांच्या उष्णतेने वितळला आहे.

भगत सिंह – धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम

प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्‍या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्‍वातंत्र्य प्राप्‍तीचे ध्‍येय गाठण्‍यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्‍वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्‍थ धर्माला बौद्धिक गुलामी म्‍हणतात. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की ईश्‍वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्‍हणजे मुलांना कायमस्‍वरूपी कमकुवत बनवणे होय. त्‍यांची मानसिक शक्ती आणि त्‍यांचा आत्‍मविश्‍वासच नष्‍ट करणे आहे.

कष्‍टकरी सामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍याचा पंचनामा आणि मोदी-योगीच्‍या जुमलेबाजीचं नग्‍न वास्‍तव

खरंतरं संपूर्ण आरोग्‍य व्यवस्थाच आज आजारी आहे. भारतीय राज्‍यघटना भाग ३ कलम २१ मध्‍ये ‘जीवितांच्‍या रक्षणाचा अधिकार’ तर देते, पण जगण्‍यासाठीच्‍या पूर्वअटी म्हणजे अन्‍न, वस्‍त्र, निवारा, आरोग्‍य व शिक्षणाच्या जबाबदारीतून अंग बाहेर काढत आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्‍या(पीपीपी) नावाखाली आता आरोग्‍यसेवेच खाजगीकरण होतंय. परीणामी आरोग्‍य सेवा महाग होणं आलंच. एका बाजूला १ टक्के लोकांकडे ५८ टक्‍के संपत्‍ती केंद्रित झाल्‍याच अहवाल आहे, अन्‍न धान्‍याबाबत स्‍वयंपूर्ण होण्‍याच्या वल्‍गना केल्‍या जाताहेत, तर दुसऱ्या बाजूला दिवसाला ५००० मुलं कुपोषणामूळं व भुकेमूळं मरताहेत. भांडवलशाहीत प्रत्‍येक गोष्‍ट पैशाच्‍या बाजारात तोलली जाते व कामगार-कष्‍टकरी सामान्‍य गरीब जनतेच्‍या जीवांची पर्वा या व्‍यवस्‍थेला नक्‍कीच नाही.

जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे

आज भारत असंख्‍य जातींमध्‍ये वाटला गेला आहे. प्रत्‍येक जातीकडे आपल्‍याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्‍य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्‍ट्रीय मानव अधिकार आयोगांच्‍या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्‍कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्‍या होते. उच्‍च शिक्षण संस्‍थांमध्‍ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्‍यांवरून समजते की २००७ पासुन उत्‍तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्‍या २५ आत्‍महत्‍यापैकी २३ आत्‍महत्‍या या दलित विद्यार्थ्यांनी केल्‍या आहेत.

भगत सिंह – अस्‍पृश्‍यता समस्‍या

तुम्‍ही संघटित व्‍हा आणि आपल्‍या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्‍हान द्या. मग तुम्‍ही पाहाल की तुम्‍हांला अधिकार देण्‍याला नकार देण्‍याची भाषा करण्‍याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्‍ही दुसऱ्याच्‍या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्‍याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्‍ही नोकरशाहीच्‍या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्‍या. तुम्‍हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्‍हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्‍या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे.

भगतसिंहाचे स्‍वप्‍न अपूर्ण, श्रमिक-तरुण करतील पूर्ण

भगतसिंहाच स्‍वप्‍न फक्‍त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं मर्यादीत नव्‍हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्‍यवस्‍थाच इतिहासाच्‍या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्‍यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्‍या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच भगतसिंह म्‍हणाला होता की ‘आम्‍ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्‍ट्राकडून दुसऱ्या राष्‍ट्राच्‍या शोषणाच्‍या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्‍यांच्‍या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्‍यांचा उद्देश ‘लुट करण्‍याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्‍यामुळे यांच्‍या लढ्याचा अंत कुठल्‍या ना कुठल्‍या सांमजस्‍यात, तडजोडीच्‍या रुपांत होईल’.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस–आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय!

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या (8 मार्च) 107 व्या दिनानिमित्त आता लढायच, नाही रडायच, आता गुमान बसायच नाय! ऐकी करुन लढायच हाय रं हाय!! बहिणींनो ! साथीनो! आपण एका बिघडलेल्या वातावरणात 107 वा आंतरराष्ट्रीय महि‍ला दिवस साजरा करत आहोत. हा दिवस स्त्रीयांची समानता, त्यांची मुक्ती आणि त्यांच्या अधिकारांसाठी केलेल्या दिमाखदार संघर्षाची साक्ष देतो. या 10 मार्चला आपल्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या अशा शिक्षिका होत्या ज्यांनी जातीव्यवस्थे बरोबरच स्त्रियांच्या गुलामी विरोधातही संघर्ष केला. आज तर स्त्रियांची सामाजिक स्थिती अजूनच बिघडत चालली आहे. स्त्रीविरोधी अपराधांचा आलेख सतत वाढतच चाललाय. देशांतील कुठल्या…