दि. 4 जून 2025 रोजी, नौजवान भारत सभेद्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘भूमितीचा परिचय’ या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात खगोलशास्त्र, बांधकाम आणि भू-सर्वेक्षण या क्षेत्रांमध्ये भूमितीची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले. तसेच, प्राचीन इजिप्शियन लोकांनी क्षेत्रफळाच्या संकल्पना कशा विकसित केल्या, चौरस आणि त्रिकोण यांचे मूलभूत गुणधर्म कोणते आहेत, कोनांची संकल्पना कशी मांडली गेली, आणि बॅबिलोनियन लोकांनी वर्तुळ 360 अंशांमध्ये का विभागले याचा सखोल अभ्यास करण्यात आला. याशिवाय, त्रिकोणातील कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते हे सिद्ध करणारा ‘ओरिगामी पुरावा’ देखील…
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – सिद्धार्थनगर, अहिल्यानगर
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – पहिला दिवस दि. 28 मे 2025 रोजी सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे नौजवान भारत सभा यांच्या वतीने सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या शिबिराचे हे चौथे वर्ष असून यंदा एकूण 88 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पहिला दिवस चित्रकला या विषयास समर्पित होता. शिबिराची सुरुवात सकाळी 7 वाजता राजू म्याना सरांच्या पी.टी. सत्राने झाली. यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि ‘ए भगतसिंग तू जिंदा है’ या गीताने वातावरण…
On Friday, the 30th of May 2025, a discussion session on Judicial Independence was conducted by the Naujawan Bharat Sabha at its Shaheed Bhagat Singh Library in Mankhurd, Mumbai.
The event was an initiative by law students associated with the organisation and aimed at critically examining the state of the judiciary, both historically and in contemporary times. The discussion began with an elaboration on why it is important to look at the judiciary with a critical eye. It was pointed out that the liberal celebration of the Constitution often hides the fact that the Constitution itself has contradictions that allow for human rights to be violated. The first half of the session was spent examining the scope of the…
नौजवान भारत सभा द्वारे ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ चित्रपटाचे प्रदर्शन
दि. २५ मे २०२५ रोजी नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसोबत ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना भगतसिंह आणि नौजवान भारत सभा यांच्याविषयी संक्षिप्त माहिती देण्यात आली. हा चित्रपट भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित असून, त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान व इतर क्रांतिकारकांशी परिचित होता आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने चित्रपट पाहिला व या क्रांतिकारकांच्या विचारसरणीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटानंतर विद्यार्थ्यांसोबत सखोल…
नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे चालवण्यात येणाऱ्या शहीद राजगुरू शिक्षण सहाय्यता केंद्राचे नवीन सत्र सुरू!
नौजवान भारत सभा (मुंबई) गेल्या पाच वर्षांपासून शहीद राजगुरू शिक्षण सहाय्यते केंद्र चालवत आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. हे केंद्र केवळ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासात मदत करण्यासाठी नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील नौभासच्या शहीद भगतसिंह वाचनालयाच्या आसपास राहणाऱ्या मुलांमध्ये प्रगतीशील विश्वदृष्टिकोन निर्माण करण्याचे देखील काम करते. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत गुण मिळावे ह्या उद्दिष्टाने विषय शिकवले जात नाहीत, तर आपण ज्या जगात राहतो ते समजून घेण्यास आणि त्यांना न्याय्य आणि मानवीय व्यक्ती बनण्यासाठी देखील प्रेरित केले जाते. नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी मानखुर्दमधील साठे नगर आणि…
नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा समारोप!
अप्पर सुप्पर बिबवेवाडी परिसरातील वस्तींतील मुलांसाठी नौजवान भारत सभेकडून राबविण्यात आलेल्या उन्हाळी सर्जनशीलता शिबिराचा 16 मे, 2025 रोजी समारोप झाला. शेवटच्या दिवशी व्यायामाचे नवनवीन कष्टप्रद प्रकार घेण्यात आले, तसेच आत्मसंरक्षणाच्या उन्नत पद्धती शिकवण्यात आल्या. वेगवेगळी प्रथिने, जीवनसत्वे असलेल्या पोषक भाज्या-फळांची माहिती देण्यात आली. साथी लावण्या यांनी संगीताचे सत्र घेतले. इलेक्ट्रिक गिटारची आणि अकूस्टिक गिटारची माहिती देत त्यांच्यातले भेद सांगण्यात आले. भारतीय आणि जागतिक सांगीतिक स्वरलिपींची जडण-घडण समजावून सांगितली गेली. गिटारचे अवयव आणि गिटार वादनाच्या प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या. सरगम वादनाची मूलभूत संरचनात्मक पद्धत शिकवून मुलांकडून त्याचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले.…
नौजवान भारत सभेतर्फे बुधवार, 14 मे रोजी पुण्यात उन्हाळी सर्जनशीलता शिबिराला सुरुवात करण्यात आली.
पहाटे झोपेतून लवकर उठून सर्व मुले पूर्ण उत्साहात शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते. मुलांकडून व्यायाम करवून घेत शिबिराला सुरुवात झाली. तद्नंतर “अलाईक” हा लघू-चित्रपट दाखवण्यात आला, ज्याद्वारे मानवी जीवनात कलेचे आणि सौंदर्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. चित्रपटावरील चर्चेमध्ये प्राण्यांपासून माणसाच्या भिन्नतेचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांद्वारे मुलांमध्ये मैत्री प्रस्थापित करणे तसेच त्यांच्यातील विविध कलागुण बाहेर काढणे ही कार्ये पार पडली. सामूहिक नाश्ता केल्यावर “कोको” हा संगीतावरील संवेदनशील चित्रपट दाखवून शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी शहीद सुखदेव थापर जन्मदिवस साजरा करण्यात आला. शहीद सुखदेव, भगतसिंग…
नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे मानखुर्द-गोवंडी येथील कामगार-कष्टकरी वस्त्यांमध्ये ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय’ नियमितपणे सुरू आहे
शहीद सुखदेव फिरते वाचनालयाचे उद्दिष्ट तरुण व लहान मुलांपर्यंत पुरोगामी साहित्य पोहोचवणे हे आहे. सध्या हे फिरते वाचनालय मानखुर्द-गोवंडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर आणि गौतम नगर या वस्त्यांमध्ये नियमितपणे चालवले जाते. या परिसरातले सुमारे 30 ते 40 तरुण नियमितपणे पुस्तके घेतात. त्यांना फक्त वाचण्यासाठीच नाही, तर जे काही वाचलं आहे ते स्वतःच्या भाषेत लिहायला देखील प्रोत्साहन दिलं जातं. फॅशिस्ट शक्ती, गोदी मिडिया आणि सोशल मिडियाचा वापर करून समाजात विष पसरवत आहेत. अवैज्ञानिक, धार्मिक आणि द्वेषपूर्ण विचार पेरले जात आहेत. अशा काळात तरुण आणि लहान मुलांना वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि प्रगतिशील…
नौजवान भारत सभा, पुण्यातील कर्वेनगरमध्ये इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टिन (Indian People in Solidarity with Palestine) आणि बीडीएस इंडिया (BDS India) च्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते.
10 मे रोजी, कर्वेनगरमधील डॉमिनोजच्या एका शाखेसमोर ‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टिन’ आणि ‘बीडीएस इंडिया’ शी संलग्न असलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी गाझा येथील नरसंहाराविरोधात आणि झायोनिस्ट इस्त्रायलला थेट किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या कंपन्यांच्या बहिष्कारासाठी शांततेत जनजागृती मोहीम राबवली. यावेळी त्यांनी माहितीपत्रके वाटली व लोकांना गाझावरील युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले. डॉमिनोजसारख्या कंपन्यांच्या इस्त्रायलमध्ये शेकडो शाखा असून त्या केवळ रॉयल्टीमधून नफा कमावत नाहीत, तर अनेक वेळा इस्त्रायली लष्कर (IDF) आणि त्यांकडून पॅलेस्टिनची जमीन बळकवण्याला उघडपणे समर्थनही देतात. हे संपूर्ण आंदोलन हे शांततापूर्ण असून केवळ गाझामधील नरसंहाराचा निषेध करणारे आहे, हे…
देशातील कष्टकरी जनतेला युद्ध नको आम्हाला हवे चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि चांगले राहणीमान ! युद्धाच्या उन्मादात फसून आपण सत्ताधारी वर्गाला त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये यशस्वी होऊ देता कामा नये!
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, एकमेकांना आव्हान दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 6-7 मे च्या रात्री युद्धाच्या झडपा सुरू झाल्या. भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील काही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने त्याला नागरी क्षेत्रावरील हल्ला म्हणून भारताच्या सीमावर्ती राज्यांमधील काही शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो लोक उद्ध्वस्त झाले. यानंतर, भारताकडूनही प्रतिहल्लाची चर्चा आहे आणि लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या आहेत. सध्या सर्वत्र युद्ध उन्माद आणि अंधराष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत. अफवांचा बाजार गरम आहे…
