लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द (मुंबई) कामगार कष्टकऱ्यांचं उपेक्षितांचं जगणं साहित्यात चितारणारे व जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणारे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (18 जुलै) मानखुर्द, मुंबईच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर भागात नौजवान भारत सभेतर्फे पोस्टरींग, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या क्रांतिकारी सांस्कृतिक वारशाला नव्याने जागृत करणारे साहित्यकार म्हणजे, अण्णा भाऊ साठे. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या प्रेरणेचा स्रोत कम्युनिस्ट विचारात, समाजवादी समाजाच्या निर्मितीच्या स्वप्नात सापडतो. एका अशा समाजाची निर्मिती जिथे जातीपातीचा भेदभाव नसेल,…
नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले
नौजवान भारत सभेकडून पुण्यातील बिबवेवाडी येथील विविध वस्त्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्यावर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात आले. यादरम्यान कामगार-कष्टकरी जनतेने पॅलेस्टाईनी जनतेच्या स्वातंत्र्य-संघर्षाला का समर्थन दिले पाहिजे हे अधोरेखित करण्यात आले. मागील दीड वर्षांपासून पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर इस्रायल कडून शस्त्रास्त्रांचा मारा होत आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 58 हजारांच्या वर लोकं मारल्या गेलीत आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकं जखमी झालेत. बहुतांश लोकं इस्रायल–पॅलेस्टाईन ह्या विवादाला धर्माच्या चष्म्यातून बघतात आणि त्यासोबतच भांडवली माध्यमांद्वारेसुद्धा जे खोटे भ्रम पसरवले जात आहेत, त्यालाच सामान्य जनता सत्य मानते. आज आपण वरवरच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता इतिहास…
नौजवान भारत सभा (नौभास) च्या केंद्रीय परिषदेची बैठक हैदराबादमध्ये यशस्वीरित्या पार पडली!
साथींनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक ६ ते ८ जुलै २०२५ दरम्यान हैदराबाद (तेलंगणा) येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत रोजगार, शिक्षण, सध्याची सामाजिक परिस्थिती आणि युवक चळवळीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान संघटनेच्या गतकार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे काम अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन योजनांची आखणी करण्यात आली. सदस्यता मोहीम, प्रचारकार्य आणि आंदोलनात्मक उपक्रम यांचे आराखडे ठरवण्यात आले. परिषदेनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठराव संमत केले आणि गरजूं विषयांवर निवेदने जाहीर केली. येत्या काळात नौजवान भारत सभा विद्यार्थी, युवक आणि व्यापक जनतेचे जीवन…
नौजवान भारत सभेने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या बातमीची वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी
‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या बॅनरखाली, अलिकडच्या काळात झालेल्या भाडेवाढी आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खाजगीकरणाविरोधात, वडाळा बस डेपो येथे विविध विद्यार्थी आणि युवक संघटना, नागरी समाज गट, वैयक्तिक प्रवासी आणि कामगार संघटनांसह नौजवान भारत सभेने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या बातमीची वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी. Press coverage of the protest organized by Naujawan Bharat Sabha, along with various student and youth organizations, civil society groups, individual commuters, and trade unions, at the Wadala BEST depot under the banner of ‘Aamchi Mumbai Aamchi BEST’, against the recent fare hikes and the ongoing privatization of BEST.
नौजवान भारत सभा द्वारे ‘मकडी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘मकडी’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘मकडी’ हा अंधश्रद्धेला आव्हान देणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा प्रभावी बालचित्रपट आहे. एका गावात, जिथे एका तथाकथित चेटकिणीच्या भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे, तिथे छोट्या चुन्नीची ही गोष्ट आहे. ती त्या वाड्यातील भयानक गोष्टींचा खरा तपशील शोधते. हा चित्रपट दाखवतो की अंधविश्वास आणि भीतीचा उपयोग काही छुप्या हेतूंसाठी कसा केला जातो. धैर्य, निरीक्षण आणि विचारशक्तीच्या जोरावर चुन्नी “भूतप्रेत-जादूटोणा” या मिथकाचा भेद उघडते आणि तिच्या सोबतच्या मुलांना विचारपूर्वक प्रश्न विचारायला आणि पुरावे…
नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
शुक्रवारी, 4 जुलै रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जोशपूर्ण घोषणांनी सभेची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर “आ रे नौजवान तेरी बेड़ियाँ रही है टूट” हे क्रांतिकारी गीत गायले गेले, ज्यामुळे उपस्थित जनतेचा उत्साह वाढला. त्यानंतर साथी सिद्धार्थ यांनी नौजवान भारत सभेची भूमिका मांडली. त्यामध्ये शहीद भगतसिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू आणि त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांचा वारसा आणि शहीदांचे विचार आजपण कसे प्रासंगिक आहेत आणि त्यांनी ज्या समतामूलक, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघितले होते तो समाज आजही वास्तवात आलेला नाहीये, हे अधोरेखित करण्यात आले.…
“आमची मुंबई, आमची बेस्ट” या बॅनरखाली वाढत्या भाडेदरांविरोधात आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खासगीकरणाविरोधात आंदोलन
नौजवान भारत सभा, विविध विद्यार्थी व युवक संघटना, नागरी संस्था गट, बेस्टने प्रवास करणारे प्रवासी आणि काही कामगार संघटनांनी एकत्र येत, 4 जुलै रोजी “आमची मुंबई, आमची बेस्ट” या बॅनरखाली वडाळा बेस्ट डेपोत बेस्टच्या वाढत्या भाडेदरांविरोधात आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खासगीकरणाविरोधात आंदोलन केले. मागील महिन्यात तिकीटांचे दर दुप्पट करण्यात आले, ज्यामुळे जवळपास 4.5 लाख प्रवासी बेस्टचा वापर सोडून देऊन, आधीच गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायला लागलेत. दरम्यान, रेल्वे अपघात वाढतच चालले आहेत. अलीकडील मुंब्रा दुर्घटनेत पाच लोकांचा मृत्यू झाला, परिस्थिती किती गंभीर आहे, याचे हे ठळक उदाहरण आहे. मुंबईत…
नौजवान भारत सभा तर्फे पुणे येथील अप्पर भागात वाढत चाललेल्या बेरोजगारीवर संवाद अभियान चालवले गेले.
बस स्टँडवर, कॉलेजमध्ये, लेबर नाक्यांवर, अभ्यासिकांमध्ये, गॅरेजवर, वस्त्यावस्त्यांत, गल्लीबोळ्यांत, जिकडे नजर टाकावी तिकडं जास्तीत जास्त तरुणांचे पाणावलेले डोळे, हरवलेलं हसू, फिकट पिवळे चेहरे एकच चित्र दाखवत आहे—देशातील तरुणांमध्ये वाढत चाललेली निराशा. निराशा की इतके शिक्षण घेऊनही काहीच होत नाहीये… निराशा की काम करून करून शरीराला आराम नाही तरी हाताला पक्के काम नाही… निराशा की चांगलं जीवन जगण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नाहीत… आज देशाच्या तरुणांसमोर उभ्या अनेक प्रश्नांपैकी एक मुख्य प्रश्न म्हणजे बेरोजगारी. फक्त सरकारी आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर 2016 मध्ये 41.2 कोटी लोकांना नोकऱ्या होत्या, तर 2021 मध्ये फक्त 40.4…
हिंदी आणि कोणत्याही भाषेची सक्ती नाही चालणार ! ऐच्छिक भाषेच्या माध्यम निवडीचा हक्क प्रत्येक भाषिकाला मिळालाच पाहिजे! समान, दर्जेदार, विनामूल्य शिक्षणाशिवाय माध्यमाचा आणि भाषेचा वाद व्यर्थ आहे!
नौजवान भारत सभा (नौभास) आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात अभियानाचे आयोजन
30 जून आणि 1 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभा आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात पत्रके वाटण्याची मोहीम राबवली. ही मोहीम कुर्ला येथील बेस्ट डेपो आणि चेंबूरमधील वाशी नाका बस स्टॉपवर आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम सुरु करण्याचे तात्काळ कारण म्हणजे बेस्ट प्रशासनाने घेतलेला भाडेवाढीचा निर्णय. याअंतर्गत किमान भाडे दुप्पट करून 10 रुपये करण्यात आले आहे, तर कमाल भाड्याची पूर्वीची मर्यादा जी 20 रुपये होती ती पूर्णतः काढून टाकण्यात आली आहे. यामुळे, ज्या मार्गासाठी पूर्वी प्रवाशांना 25 कि.मी. अंतरासाठी 20 रुपये भाडे भरावे लागत…
