या निवडणुकीत धर्मवादी फॅसिस्ट भाजपवर पूर्ण बहिष्कार टाकावा असे आवाहन देशातील तरुण आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करत आहोत! निश्चितच, सध्याच्या निवडणुकीत इतर निवडणुकबाज पक्षही योग्य पर्याय नाहीत, पण फॅसिस्ट भाजप हा जनतेसाठी सर्वात धोकादायक आहे, त्यामुळे भाजपला कोणत्याही किंमतीत सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे! मित्रांनो, सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचा कार्यक्रम नौजवान भारत सभेच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जात नाही. ‘RWPI’ ने आपल्या जाहीरनाम्यात नौभासच्या लोकसभा निवडणुक मागणीपत्राचा समावेश केला आहे. या पक्षाची स्थापना अशा कार्यकर्त्यांनी केली आहे जे लोकांना त्यांच्या योग्य…
18वी लोकसभा निवडणुक- 2024 च्या संदर्भात ‘नौजवान भारत सभे’चे मागणीपत्र
नौजवान भारत सभा त्या पक्षाला आपला सशर्त पाठिंबा देऊ शकते जो आमच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विरोधात जाणार नाही, आमच्या अटी पूर्ण करेल, आमच्या संपूर्ण मागणीपत्राला त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करेल आणि या मागण्यांसाठी संघर्ष करेल. मित्रांनो, देशात 18व्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. देशातील जनतेसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसे तर यापूर्वीच्या सर्व सरकारांनी जनतेच्या हिताशी तडजोड केली आहे परंतु तरी फॅसिस्ट भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या शासनात जनतेची अवस्था नरकमय झाली आहे. आपला देश आज धर्मवादी फॅसिस्ट शक्तींच्या तावडीत आहे. सर्व सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांवर आतून…
जगातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे भाजप! तुरुंगात नाही, भ्रष्टाचाऱ्यांना संसदेत-मंत्रीपदी पाठवत आहे भाजप!
“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” ची भाषा करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांना “चक्की पिसायला” तुरुंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे खरे चरित्र आता सर्वांसमोर उघडे पडले आहे. देशातील विविध भांडवली राजकीय पक्षातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोर जाणाऱ्या 25 नेत्यांना भाजपत सामील करून घेऊन आणि त्यापैकी 23 जणांना चौकशीतून दिलासा देऊन भाजपने सिद्ध केले आहे की त्यांचे एवढेच म्हणणे आहे की “भ्रष्टाचार करा, पण भाजपत येऊन करा!” कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सारख्या पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. परंतु यापैकीच अनेक नेत्यांना शिक्षा देणे दूर, त्यांना सत्तापदी पोहोचवण्याचे वा त्यांचे गुन्हे माफ…
शहीद दिनानिमित्त
हमें तुम्हारा नाम लेना है कि वे लोग ले रहे हैं खूब तुम्हारा नाम जिन्हें ख़तरा है लोगों तक पहुँचने से तुम्हारा नाम अपने सही अर्थों में। इसलिए सुनिश्चित ऐतिहासिक अर्थों का सन्धान करते हुए हमें फिर थकी हुई नींद में डूबे घरों तक जाना है लेकर तुम्हारा नाम । कई बार हमें विचारों को कोई नाम देना होता है या कोई संकेत-चिह्न और हम माँगते हैं इतिहास से ऐसा ही कोई नाम और उसे लोगों तक विचार के रूप में लेकर जाते हैं। • शशिप्रकाश
शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे युनिट ची वार्षिक बैठक आणि पदयात्रा संपन्न
आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त नौजवान भारत सभेची वार्षिक बैठक पार पडली. गेल्या वर्षभरातील पुणे तसेच देशभरातील नौजवान भारत सभेच्या कामांचा आढावा, नवीन कार्यकारिणीची निवड तसेच पुढील कामांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना यासाठी ही बैठक झाली. मीटिंगच्या सुरुवातीला साथी स्वप्नजा यांनी शहीद दिनानिमत्त प्रास्ताविक केले आणि जोरदार घोषणा देत मीटिंगची सुरुवात करण्यात आली. साथी सुस्मित यांनी पुण्यातील नौजवान भारत सभेचा वर्षभरातील अहवाल सादर केला. यामध्ये वर्षभरात पार पाडलेली चर्चासत्रे, अभियाने, बुक स्टॉल्स, नौभास द्वारे आंदोलनातील सहभाग, भगतसिंह जनअधिकार यात्रेमधील सहभाग, शिक्षण सहायता केंद्र, फिरते वाचनालय इत्यादी कामांचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला.…
23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 93 व्या शहीद दिनानिमित्त
शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…
भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला.
विद्यार्थी व तरुणांना समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठीच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आज भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. भगतसिंहाने विद्यार्थी आणि तरुणांना आवाहन केले होते की त्यांनी क्रांती चा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायला हवा. हे लक्षात घेऊन नौजवान भारत सभेचे सदस्य भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे समाज परिवर्तनाचे मूळ विचार युवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मानखुर्द गोवंडी च्या भागात सातत्याने क्रांतिकारी साहित्य असलेल्या पुस्तकांचा स्टॉल लावतात. आजवर आपल्या देशातील…
धर्माच्या नावावर जनतेला विभागण्याचा फॅसिस्ट भाजपचा डाव हाणून पाडा! जनविरोधी सीएए कायद्याविरोधात एकजूट होत जनआंदोलन उभे करा!! CAA NPR NRC रद्द करा!
सीएए कायद्याविरोधात देशात परत एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, दिल्ली सोबतच देशात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरु झाली आहेत. नेहमीप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आंदोलकांचे निर्घृणपणे दमन करत आहे. आंदोलन करणाऱ्यांना केवळ डिटेनच नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यसत्तेचे जनताविरोधी चरित्र पुन्हा एकदा समोर येत आहे. मोदी सरकार निवडणुका तोंडाशी असताना जेव्हा इलेक्टोरल बॉण्ड्स च्या घोटाळ्यात अडकले आहे तेव्हा त्यांनी काही दिवसांपूर्वी 11 मार्च रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याबाबत अधिसूचना प्रसारित केली आहे, आणि सीएए कायद्यावर राजकारण…
७ मार्च रोजी साठे नगर, मानखुर्द येथे नौजवान भारत सभा (नौभास) चे सहयोग अभियान चालवण्यात आले.
अभियानात लोकांना आपल्या शहिदांच्या स्वप्नांची आठवण करून दिली गेली. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, ज्या स्वातंत्र्यासाठी लढले होते ते आज ही आपल्याला मिळाले नाहीये. शिक्षणाचे बाजारीकरण आज कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर करत आहे. बेरोजगारी ची अवस्था इतकी वाईट आहे की आज ३२ कोटी तरुण बेरोजगार आहेत. आणि अशा मुद्द्यांवर युवकांनी सत्तेत बसलेल्या धनदांडग्यांना जाब विचारू नये म्हणून त्यांच्यात जाति धर्माची भांडण लावली जात आहेत. अभियानात नौजवान भारत सभेच्या विविध क्रांतीकारी सुधार कामांबद्दल लोकांना सांगितले गेले जसे की शहिद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र, शहिद सुखदेव फिरते वाचनालय, त्याच सोबत सध्या दहावीच्या…
भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी आयोजित आंदोलनाला थांबवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांनी त्याला आणखी यशस्वी बनवले.
काल ३ मार्च ला जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून चालु असलेल्या भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट होणार होता. ही यात्रा 10 डिसेंबर 2023 पासून सुरू होती आणि 13 राज्य, 85 जिल्हे आणि 8500 किलोमिटर चा प्रवास पार करून 26 फेब्रुवारी 2024 ला दिल्लीत पोहोचली होती आणि तेव्हापासून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात चालु होती. यात्रेचा भाग म्हणून बवाना इण्डस्ट्रियल एरिया, ट्रॉनिका सिटी इण्डस्ट्रियल एरिया, करावलनगर, खजूरी इत्यादी भागातील कामगारांनी संप पुकारला होता. तसेच 12 राज्यांमधून कामगार, स्त्रिया, विद्यार्थी तरुण आज दिल्लीला पोहोचले होते. सकाळी 11 वाजता कामगार, स्त्रिया, विद्यार्थी…
