साथींनो, 93 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना चंद्रशेखर आझाद शहीद झाले. शहिद चंद्रशेखर आझाद यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले ते आजही पूर्ण झालेले नाही. भांडवलशाही-सम्राज्यशाही आणि सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील भाबरा गावात झाला. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. अगदी बालपणापासूनच चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांमध्ये सहभाग घेत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1921 मध्ये सुरू असलेल्या असहकार…
नौजवान भारत सभेच्या शिक्षण सहायता केंद्राकडून जनता वसाहत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 दिवसांच्या गणिताच्या क्रॅश कोर्सचे आयोजन.
साथींनो, मागच्या 7-8 महिन्यांपासून जनता वसाहत येथे नौजवान भारत सभेकडून 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येते. ज्यात गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवले जातात. वैज्ञानिक प्रयोग, मुव्ही स्क्रिनिंगसारखे उपक्रम देखील जनतेच्या आर्थिक सहयोगातून दाखवले जातात. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत, विद्यार्थी आणि पालकांकडून गणित विषयाचा क्रॅश कोर्स घ्यावा ही मागणी येत होती. त्यासाठी मागच्या 12, 13 फेब्रुवारीला वस्तीमध्ये घरोघरी जाऊन क्लाससाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी अभियान चालवले आणि 14 फेब्रुवारीपासून 12 दिवसांचा गणिताचा क्रॅश कोर्स चालू केला आहे. शिक्षण सहायता केंद्र आणि यासारखे उपक्रम…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात ‘द लेजंड ऑफ भगतसिंह’ चित्रपट दाखवला गेला.
केंद्रातील फॅसिस्ट मोदी सरकार दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा भव्य देखावा करण्याच्या फक्त दोन दिवस आधी 24 जानेवारी रोजी मुबई, मानखुर्द, साठे नगर मधील तब्बल 1200 हून अधिक घरे असलेल्या वस्तीवर महाराष्ट्रातील भाजप – शिंदे सरकार द्वारे बुलडोझर चालवला गेला. नौजवान भारत सभा सक्रियपणे या भागात कार्यरत आहे आणि वस्तीतील लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या घराच्या हक्कासाठी लढत आहे. भगतसिंहाचे शब्द – “दिल्लीतील गोऱ्या सरकारच्या जागी भुरे सरकार” साठे नगरमधील प्रत्येकाच्या कानात दुमदुमत आहेत. सर्वांना घरे देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या फॅसिस्ट सरकारने गेल्या 10 वर्षांत देशातील कामगार कष्टकरी जनतेलाच विस्थापित करण्याचे…
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध! गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या ! फॅसिस्ट गुंडागर्दी नाही चालणार! आज 9 फेब्रुवारी 2024 रोजी “निर्भय बनो”च्या कार्यक्रमात भाषण द्यायला येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हला केला. या अगोदर पुण्यामध्ये “निर्भय बनो”ची सभा होऊ देणार नाही अशी धमकी भाजप पुणे शहर अध्यक्षांनी दिली होती. पोलिसांना याची सगळी कल्पना असतानाही हा हल्ला झाला. भाजपचे गुंडे पूर्ण तयारीनिशी काठ्या, मोठे दगड घेऊन आले होते आणि त्यांनी हल्ला केला.अजूनसुद्धा भाजपाच्या गुंडांना अटक करण्यात आलेली नाहीये. एकीकडे शांततेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनांना पोलिस परवानगी…
एफ.टी.आय.आय. व ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याच्या विरोधात काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नौजवान भारत सभा आणि इतर सहयोगी संघटनांच्या सहभागाने विरोध प्रदर्शन करण्यात आले
पुणे शहरातच गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) येथे ‘राम के नाम’ या चित्रपटाचे प्रदर्शन केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या गुंडांनी येथील विद्यार्थ्यांवर नियोजनबद्धपणे हल्ला केला. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. 23 जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये स्पष्टपणे पोलीसही सहभागी होते हे दिसून आले, कारण पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, उलट ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनाच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. ही घटना ताजी असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील…
एफ.टी.आय.आय. व ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याच्या विरोधातील आंदोलनाचे मिडियामध्ये आलेल्या बातम्या
नौजवान भारत सभेच्या आणि स्त्री मुक्ती लीग वतीने मुंबईच्या साठे नगर (खाडी) भागात प्रशासनातर्फे तोडण्यात आलेल्या कष्टकरी वस्तीत चालवले जात आहे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र आणि सावित्री फातिमा अभ्यास गट!!
मुंबई येथील मानखुर्दच्या साठे नगर (खाडी) भागात 24 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे 500 ते 700 कष्टकऱ्यांची घरं उध्वस्त करण्यात आली. आज आपल्या मेहनतीने संपूर्ण मुंबई चमकवणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेच्या डोक्यावरचे छत प्रशासनाने हिरावून घेतले आहे. प्रशासनाद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली असून इथल्या लोकांना कुठलीही पर्यायी व्यवस्था सुद्धा देण्यात आली नाही. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे खासदार मनोज कोटक यांसारख्या भांडवली निवडणूकबाज-धंदेबाज पक्षाचे नेते एकदा सुद्धा ह्या तोडलेल्या झोपड्या बघण्यासाठी किंवा लोकांच्या भेटीला आलेले नाहीत. अशा परिस्थितीत नौजवान भारत सभा…
नौजवान भारत सभा तर्फे “स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि रोजगाराची स्थिती” या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र!
साथीनो महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस या खाजगी कंपनीला दिली होती. यामध्ये 4793 जागांसाठी 11.5 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. टीसीएस कंपनीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांच्या नातेवाईकांना या परीक्षेत जास्त गुण मिळाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही सेंटर वर तर पेपर सुरू होण्याच्या आधीच पेपर फुटल्याच्या सुद्धा बातम्या बाहेर आल्या आहेत. अनेक टप्प्यांमध्ये परीक्षा झाली असल्यामुळे नॉर्मलिझशन (normlization) ची जी पद्धत वापरण्यात…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशातील वाढता धार्मिक उन्माद आणि त्यामागील राजकारणाबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. 1989 साली प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाची प्रासंगिकता आजही धडधडीत जाणवते. जातीधर्मांमध्ये द्वेष वाढवणे, आणि मंदिर मशिदीच्या मुद्द्यांना वापरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आज जोमाने सुरू आहे. चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने दाखवतो की कसे कामगारांच्या मुलांना गुंडगिरीकडे नियोजनबद्ध पद्धतीने वळवले जाते. शाळांच्या वाढत्या फीज कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात आणि बेरोजगारीची टांगती तलवार सतत भविष्यावर…
FTII च्या विद्यार्थ्यांवर संघी गुंडांनी केलेल्या फाशिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध! संघी गुंडांची गुंडगिरी नाही चालणार!
नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेचे संयुक्त वक्तव्य आज 23 जानेवारीला फिल्म अँड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या कॅम्पस मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी घुसून बॅनर जाळले व विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी “राम के नाम” ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली डॉक्यूमेंट्रीचे प्रदर्शन केले होते. सध्या राम मंदिराच्या नावाने देशभरात जो धार्मिक उन्माद पसरवला जात आहे त्याची सुरुवात आर.एस.एस ने 1990च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाने केली होती. आनंद पटवर्धन यांची ही डॉक्यूमेंट्री याच प्रतिगामी आंदोलनाचे चित्रण करते ज्यामध्ये दाखवले गेले आहे की कशाप्रकारे भारतातील जनतेचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आले…
