नौजवान भारत सभा तर्फे “स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि रोजगाराची स्थिती” या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र!

 साथीनो महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस या खाजगी कंपनीला दिली होती. यामध्ये 4793 जागांसाठी 11.5 लाखाच्या  वर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. टीसीएस कंपनीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांच्या नातेवाईकांना या परीक्षेत जास्त गुण मिळाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही सेंटर वर तर पेपर सुरू होण्याच्या आधीच पेपर फुटल्याच्या सुद्धा बातम्या बाहेर आल्या आहेत. अनेक टप्प्यांमध्ये परीक्षा झाली असल्यामुळे नॉर्मलिझशन (normlization) ची जी पद्धत वापरण्यात आली आहे त्यामध्येही पारदर्शकता ठेवण्यात आली नाही. या स्थिती मध्ये नौजवान भारत सभा मागणी करते तलाठी भरती मध्ये झालेल्या घोटाळ्याची तत्काळ चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई  झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून कुठलेही परीक्षा शुल्क न घेता पुन्हा परीक्षा घेतली पाहिजे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही सरकारने घ्यावी. पेपर फुटण्याच एक महत्वाचा करण आहे सरकारने परीक्षा घेण्याची जबाबदारी खाजगी कंपनीकडे देणं. भरती परीक्षेमध्ये घोटाळा होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. या आधीही खाजगी कंपन्यांकडून घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांमध्ये घोटाळा झाला आहे. काही महिण्याआधीच झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतही घोटाळा झाल्याच्या बातम्या आहेत. रोजगार देण्याची जबाबदारी ही सरकारची असते तर अशा भरती परीक्षाही सरकारी आयोगाकडूनच घेतल्या गेल्या पाहिजे. आम्ही मागणी करतो की या पुढे कुठलीही स्पर्धा परीक्षा ही एमपीएससी मार्फतच घेतली जावी. (1/3) #unemployment #talathibharti #mpsc #spardhapariksha #scam

Related posts

Leave a Comment

8 + three =