नौजवान भारत सभेच्या आणि स्त्री मुक्ती लीग वतीने मुंबईच्या साठे नगर (खाडी) भागात प्रशासनातर्फे तोडण्यात आलेल्या कष्टकरी वस्तीत चालवले जात आहे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र आणि सावित्री फातिमा अभ्यास गट!!

मुंबई येथील मानखुर्दच्या साठे नगर (खाडी) भागात 24 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे 500 ते 700 कष्टकऱ्यांची घरं उध्वस्त करण्यात आली. आज आपल्या मेहनतीने संपूर्ण मुंबई चमकवणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेच्या डोक्यावरचे छत प्रशासनाने हिरावून घेतले आहे. प्रशासनाद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली असून इथल्या लोकांना कुठलीही पर्यायी व्यवस्था सुद्धा देण्यात आली नाही. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भाजपचे खासदार मनोज कोटक यांसारख्या भांडवली निवडणूकबाज-धंदेबाज पक्षाचे नेते एकदा सुद्धा ह्या तोडलेल्या झोपड्या बघण्यासाठी किंवा लोकांच्या भेटीला आलेले नाहीत. अशा परिस्थितीत नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग चे कार्यकर्ते मागच्या आठवड्यापासून साठे नगर मध्ये क्रांतिकारी सुधार कार्य करत लोकांच्या पक्क्या घरांच्या मागणीसाठी त्यांच्या संघर्षात सामील आहेत. लोकांना पुन्हा घर उभे कऱण्यात श्रम सहयोग केला जात आहे तसेच महिला, पुरुष आणि मुलांसाठी सातत्याने अभ्यास गट सुरू आहे. रोज रात्री मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी विषय शिकवले जात आहेत. त्यासोबत कष्टकरी जनतेच्या आयुष्याच्या खडतर परिस्थिती मागचे कारण भांडवली व्यवस्था असून, आपण एकजूट आणि संघटित झाल्याशिवाय कोणताही लढा जिंकू शकणार नाही ह्याची जाणीव सतत करून दिली जात आहे. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग सर्व न्यायप्रिय लोकांना आपला अधिकाधिक वेळ नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीगच्या शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र तसेच सावित्री फातिमा अभ्यास गटात अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. इंकलाब जिंदाबाद!!

Related posts

Leave a Comment

17 + 1 =