दि. 22 जानेवारी रोजी अहमदनगर येथे नौभास कडून आनंद पटवर्धन द्वारे दिग्दर्शित प्रसिद्ध डाक्यूमेंट्री “राम के नाम” चे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावाच्या काळात जेव्हा राम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने ‘प्राण प्रतिष्ठा’ करत असताना दुसरीकडे मात्र वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण व एकंदरीतच सर्वच बाजूने जनतेच्या लुटीला वाढवले जात आहे व जनतेला त्याच्या मुख्य मुद्यापासून भरकटवण्यासाठी धर्माचे राजकारण उभे केले जात आहे. तेव्हा ही डाक्यूमेंट्री 1980 ते 90 च्या दशकात धार्मिक फासीवादी ताकतींने बाबरी मशीद तोडत धार्मिक उन्माद पसरवत दंगलीचे जे राजकारण उभे केले ज्यात अडीच हजार…
नौजवान भारत सभा, महाराष्ट्र राज्य कमिटीची मासिक मीटिंग आज दिनांक 22/01/2024 रोजी पार पडली.
या मीटिंग मध्ये मागील महिन्यातील नौभासच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. कमिटीमधील सदस्यांनी येणाऱ्या दोन महिन्यात भगतसिंग जन अधिकार यात्रेचे प्रचार अभियान चालवण्यावर विशेष भर देण्याचे मान्य केले. तसेच नौभासची सदस्यता संख्या वाढवण्यासाठी युवकांच्या समस्यांवर आधारित ऑनलाईन चर्चासत्र चालवण्याचा ठराव मीटिंग मध्ये पारित केला गेला. महाराष्ट्रातील नौभासच्या कामांचा रिपोर्ट वेळेवर वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जावा यासाठी काही सदस्यांना विशेष जबाबदारी या मीटिंग मध्ये देण्यात आली. एकंदरीत महाराष्टातील नौभास चे काम अधिक गतीपूर्वक चालू करण्याचे नियोजन राज्य कमिटीने या मासिक मीटिंग मध्ये आखले आहे.
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!
बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.
नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी (poet of hope) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द टर्किश कवी नाझिम हिकमत यांच्या 122 व्या जन्मदिवशी त्यांना आठवत काव्यवाचन आणि चर्चा आयोजित केली होती
महान मानवता प्रवास करते जहाजेच्या डेकवर रेल्वेच्या थर्ड क्लास डब्ब्यांमध्ये पक्क्या सडकेवर पायी महान मानवता. महान मानवता आठ वाजता कामावर जाते विसाव्या वर्षी लग्न करते चाळीशीपर्यंत मरून जाते महान मानवता पुरेशी भाकरी प्रत्येकासाठी असते महान मानवतेला सोडून भातासोबतही तेच साखरेसोबतही तेच कपड्यांसोबतही तेच पुस्तकांसोबतही तेच पुरेश्या वस्तू असतात सर्वांसाठी महान मानवतेला वगळता. महान मानवतेच्या अंगणात सावली नसते तिच्या वाटेवर दिवे नसतात तिच्या खिडकीला काचा नसतात पण महान मानवतेकडे आशा असते आशेविना तुम्ही जिवंत राहू शकत नाही! – नाझिम हिकमत नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी…
नौजवान भारत सभा, मुंबई द्वारा दि. 7 जनवरी, रविवार के दिन “फ़ासीवाद क्या है?” विषय पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।
आज फासीवादी ताकतें सत्ता में बैठी है, तब फासीवाद को समझना हमारे लिए एक जरूरी कार्यभार बन जाता है। चर्चासत्र की शुरुआत में साथी अविनाश ने बताया कि एक चिंतक का कहना है कि ‘फासीवाद पर उन सबको चुप रहना चाहिए, जो पूंजीवाद के विषय में नही बोलते है’। ऐसे में हमें अपनी बात पूंजीवाद के विषय से शुरू करनी चाहिए। पूंजीवादी व्यवस्था, एक ऐसी व्यवस्था है जो निजी मालिकाने पर आधारित है, जिसके केंद्र में मालिक का मुनाफ़ा होता है। इस व्यवस्था में मालिकों का पूरा वर्ग आपस में…
9 जानेवारी 24 रोजी फातिमा शेख यांच्या जन्मदिननिमित नौजवान भारत सभा तर्फे ‘भांडवलशाहीने कामगार कष्टकरी जनतेवर नव्यारूपात लादलेली ज्ञानबंदी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
चर्चासत्राची सुरवात ही “संघर्ष की राह पर” या क्रांतिकारी गीताने करण्यात आले. पुढे नौजवान भारत सभा चे कार्यकर्ता रवी यांनी मांडणी करताना मांडले की, देशातील अल्पसंख्याक भांडवलंदारांचा नफा वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण केले आहे. शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात ही मोठ्याप्रमाणात खाजगीकरण करून सर्व सामान्य कामगार कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. आज फक्त श्रीमंतांची मुलंच चांगले प्राथमिक शिक्षण, उच्चशिक्षण, तांत्रिक शिक्षण घेण्याचे स्वप्न बघू शकतात. पण सामान्य कामगार कष्टकरी वर्गातील मूल कसंबसं 8वी-10वी पर्यंत शिक्षण घेतात आणि पुढचे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते…
‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन‘ के सदस्य और क्रान्तिकारी शिव वर्मा के स्मृति दिवस पर (9 फरवरी 1904 – 10 जनवरी 1997)
‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन‘ के सदस्य और क्रान्तिकारी शिव वर्मा के स्मृति दिवस पर (9 फरवरी 1904 – 10 जनवरी 1997) हरदोई में जन्में शिव वर्मा भारत के क्रान्तिकारी आन्दोलन को एक ऐतिहासिक मोड़ देने वाले क्रान्तिकारी थे। वे शहीद-ए-आज़म भगत सिंह,भगवतीचरण वोहरा, विजयकुमार सिन्हा, सुखदेव, बटुकेश्वर दत्त आदि के साथी और एक गम्भीर चिन्तनशील प्रकृति के क्रान्तिकारी थे। 17 वर्ष की उम्र में उन्होंने असहयोग आन्दोलन में अपने आपको झोंक दिया। ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ में शिव वर्मा का नाम ‘प्रभात’ था। सहारनपुर बम काण्ड, लाहौर षड्यंत्र काण्ड जैसे…
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि पुरूषसत्ताक समाजामध्ये आज महिलांची स्थिती या मुद्द्यांना घेऊन अहमदनगर येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी भागामध्ये घरोघरी अभियान केले गेले आणि काही ठिकाणी लोकांना एकत्र करून चर्चासत्र सुद्धा घेण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त (3 जानेवारी 1831)
सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी…
भगतसिंग जन अधिकार यात्रा मुंबईमध्ये
“मुंबई, असे शहर जे कधीही झोपत नाही.” अशीच काहीशी ओळख आहे या शहराची आणि मुंबईत पोहोचलेल्या भगतसिंग जनअधिकार यात्रेतील यात्रेकरूंना असेच वाटले. कोणताही आजार, थकवा आणि निराशा ही भगतसिंग जन अधिकार यात्रेच्या क्रांतिकारी हिमतीला मोडू शकली नाही. दररोज सरासरी 15 किलोमीटर चालल्यानंतर, यात्रेकरू शहीद भगतसिंग आणि एक चांगले जग निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर क्रांतिकारकांकडून मिळालेली मशाल पुढे नेण्याच्या नव्या संकल्पाने दररोज जागे होतात. मागील आठवड्यात मानखुर्द, गोवंडी, दादर, ठाणे मार्गे यात्रा काढली गेली. ही यात्रा जिकडे जाईल तिचे आपली एक विशिष्ट छाप सोडत आहे. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशव्यापी…
