दि. 22 जानेवारी रोजी अहमदनगर येथे नौभास कडून आनंद पटवर्धन द्वारे दिग्दर्शित प्रसिद्ध डाक्यूमेंट्री “राम के नाम” चे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावाच्या काळात जेव्हा राम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने ‘प्राण प्रतिष्ठा’ करत असताना दुसरीकडे मात्र वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण व एकंदरीतच सर्वच बाजूने जनतेच्या लुटीला वाढवले जात आहे व जनतेला त्याच्या मुख्य मुद्यापासून भरकटवण्यासाठी धर्माचे राजकारण उभे केले जात आहे. तेव्हा ही डाक्यूमेंट्री 1980 ते 90 च्या दशकात धार्मिक फासीवादी ताकतींने बाबरी मशीद तोडत धार्मिक उन्माद पसरवत दंगलीचे जे राजकारण उभे केले ज्यात अडीच हजार पेक्षा लोकांचा मृत्यू झाला या बाबीवर बारकाईने प्रकाश टाकण्याचे काम करते तसेच धार्मिक फासीवादी ताकतींचा खरा चेहरा उजागर करण्याचे काम करत आहे. डाक्यूमेंट्री स्क्रीनिंग नंतर उपस्थित सर्वांसाठी चर्चेचे सत्र खुले करण्यात आले. ज्यात धार्मिक फासीवादी ताकतीच्या उदयापासून आज पर्यंत वाढत असलेल्या प्रभावावर सखोल चर्चा करण्यात आली. नौजवान भारत सभा संपर्क -9403317106
“राम के नाम” डाक्यूमेंट्री स्क्रिनिंग
