भगतसिंह जन अधिकार यात्रा, आज सोळाव्या दिवसाची जल्लोषात सुरूवात!! बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, धर्मवाद आणि कष्टकरी जनतेच्या लुटीच्या विरोधात! रोजगार, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, आवास आणि झुंझार जन-एकजुटीसाठी! भगतसिंह जनअधिकार यात्रेचा दुसरा टप्पा प्रचंड उत्साहात आणि क्रांतिकारी जोशात निरंतर सुरू आहे. बंगळुरू येथून सुरू झालेली भगतसिंह जन अधिकार यात्रा आज 25 डिसेंबर रोजी ऐतिहासिक पुणे शहरात पोहोचली. आज यात्रेचा सोळावा दिवस. ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करीत आणि 80 जिल्ह्यांमधून जात 3 मार्चला दिल्लीत पोहोचेल. आज पदयात्रेची सुरूवात अप्पर डेपो भागातून झाली, चैत्रबन, वीआयटी चौक, महेश सोसायटी, वीआयटी शाळा या मार्गावरून पदयात्रा…
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा:15 वा दिवस
भगतसिंह जनअधिकार पदयात्रेची आज दिनांक 24 डिसेंबर रोजी 15 व्या दिवशी शहीद भगतसिंह उद्यान, पत्रकार चौक, अहमदनगर येथून “शहीद भगतसिंह अमर रहे”, “इंकलाब झिंदाबाद”च्या नाऱ्यांनी, अनेक विद्यार्थी – तरुणांचे आदर्श आलेल्या शहीदे आझम भगतसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार सुरवात झाली! महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, धर्मवाद यांच्या विरोधात तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, आवासाच्या जनतेच्या मूलभूत अधिकारांसाठी निघालेली यात्रा पुढे अप्पू हत्ती चौक, छबुराव लांडगे चौक, कोंडी मामा चौकापर्यंत जोरदार घोषणा, क्रांतीकारी गीतांच्या गजरात पुढे गेली. भगतसिंह जनअधिकार पदयात्रेच्या सांस्कृतिक टोळीने सामान्य जनतेचा दिवसेंदिवस खिसा कापणाऱ्या महागाईला गीतात सादर प्रस्तुत करणारं गीत…
भगतसिंह जन अधिकार यात्रा, दुसऱ्या टप्प्या संबंधित पोस्टरिंग
नौजावन भारत सभा, मुंबई युनिट तर्फे मानखुर्द, लाल्लुभाई कंपाऊंड च्या संपूर्ण भागात भगतसिंह जन अधिकार यात्रा, दुसऱ्या टप्प्या संबंधित पोस्टरिंग केले गेले.
भगतसिंह जन अधिकार यात्रा, दुसरा टप्पा
काल कर्नाटक येथील बंगळुरू मधून भगतसिंह जन अधिकार यात्रेला सुरुवात! येत्या 3 मार्चपर्यंत 8500 किलोमीटरचा प्रवास करून भगतसिंहांचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची केली घोषणा! भगतसिंह जन अधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज बंगळुरूमध्ये सुरूवात झाली. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI), दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा आणि मजदूर बिगुल दस्ता यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांद्वारे 10 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे सुरू झालेली ही यात्रा 13 राज्यांतील 80 हून अधिक जिल्ह्यांतून जाईल आणि सुमारे 8,500 किलोमीटरचे अंतर पार करून 3 मार्च रोजी दिल्लीला पोहोचेल. बंगळुरमध्ये ही यात्रा शिवाजी नगर, एमजी रोड, फ्रीडम पार्क इत्यादी…
पुण्यात शिक्षण सहायता केंद्राची सुरुवात
शिक्षण सहायता केंद्र, जनता वसाहतला 1 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्टॅनली का डब्बा’ या फिल्मचे स्क्रिनिंग नौजवान भारत सभेकडून करण्यात आले. फिल्मनंतर झालेल्या चर्चांमध्ये विद्यार्थ्यांना थोडे बोलते केल्यानंतर खूप सुंदर आणि उत्साही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कलागुणांचा विकास व्हावा, कलेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी असे उपक्रम यापुढेही राबवले जातील.
Commemoration of Jyotirao Phule’s death anniversary in Pune
On 28th November, Naujawan Bharat Sabha commemorated Jyotirao Phule’s death anniversary in Super Indiranagar, Pune. The residents of the area enthusiastically participated in this program where progressive songs were sung and speeches were given regarding Jyotirao Phule’s life and the relevance of his legacy today. The program started “Mahilayein ab utthi nahi toh” which talks about the struggle for women’s liberation after which Lalita spoke about Phule’s contribution to caste annihilation and women’s liberation. Phule’s revolutionary steps towards women’s education, towards education and liberation of the Dalits and so-called “lower…
पुण्यात फिरत्या वाचनालयाची पुन्हा एकदा सुरुवात
पुण्यात “नौजवान भारत सभा” कडून दांडेकर पूल आणि अप्परडेपो येथील वस्त्यांमध्ये दोन वाचनालये चालवली जातात. या व्यतिरिक्त वाचनालयाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये फिरते वाचनालय देखील चालवले जाते. गेले काही दिवस या फिरत्या वाचनालयाचे काम विविध कारणांमुळे स्थगित झाले होते. फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, गणित, कथा, कादंबऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांवरील शक्य तेवढी पुस्तके कामगार कष्टकरी वस्त्यांमध्ये दारोदारी नेली जातात. पुढच्या आठवड्यासाठी त्यांची वाचनाची आवड, आवश्यकता नोंदवून घेतली जाते आणि तशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. अगोदरच्या आठवड्यातील वाचून झालेली पुस्तके परत घेतली जातात. नौभास कडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात…
पुण्यात लहान मुलांसाठी फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन
नौजवान भारत सभा तर्फे दि.२३ नोव्हेंबर रोजी लहान मुलांसाठी फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले. यामध्ये रँगो हा ॲनिमेशन चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट बघत असताना मुलांनाही खूप मज्जा येत होती. पुन्हा कधी चित्रपट प्रदर्शित होईल याची विचारणाही काही मुलांनी केली. अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचे कार्यक्रम या पुढेही आयोजित करण्यात येतील.
मुंबई येथे शहीद भगतसिंह वाचनालयाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न!
मानखुर्द, मुंबई येथे 18/11/2023 रोजी बटुकेश्वर दत्त यांच्या 113 व्या जन्मदिवसानिमित्त, नौजवान भारत सभेच्या शहीद भगतसिंह वाचनालयाच्या नवीन जागेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शशांक यांनी केली. त्यांनी नौजवान भारत सभेचा उद्देश आणि कार्याची थोडक्यात मांडणी केली. आशय यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या क्रांतिकारी जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल माहिती दिली. बटुकेश्वर दत्त आणि त्यांचे साथीदार स्वातंत्र्य आणि समानतेसाठी ज्या चिकाटीने लढले, त्यांचे देशातील लोकांवरील अतूट प्रेम, त्यांचे त्यागमय जीवन अशा अनेक बाबींचा त्यांनी उलगडा केला. स्त्री मुक्ती लीग संचालित सावित्री फातिमा अभ्यास गटाच्या विद्यार्थिनी शबाना यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
गदर लाटेतील 16 नोव्हेंबरच्या शहीदांना क्रांतिकारी अभिवादन!
गदर चळवळीचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! जुलमी ब्रिटीश सरकारने ‘लाहोर षडयंत्र प्रकरण – 1’ अंतर्गत 16 नोव्हेंबर 1915 रोजी सात गदर योद्ध्यांना फाशी दिली. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. या शहीदांपैकी एक होते कर्तारसिंह सराभा, ज्यांना वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फाशी देण्यात आली. 16 नोव्हेंबर रोजी शहीद झालेले इतर सहा क्रांतिकारक बक्षीश सिंह, हरनाम सिंह, सुरेन सिंह, जगत सिंह, विष्णू गणेश पिंगळे, सुरेन सिंह (1) हे होते. रोजगार आणि चांगल्या संधीच्या शोधात कॅनडा आणि अमेरिकेत गेलेल्या भारतीयांनी 15 जुलै 1913 रोजी शोषण आणि भेदभावाविरुद्ध…
