भगतसिंह जन अधिकार यात्रा, दुसरा टप्पा

काल कर्नाटक येथील बंगळुरू मधून भगतसिंह जन अधिकार यात्रेला सुरुवात!
येत्या 3 मार्चपर्यंत 8500 किलोमीटरचा प्रवास करून भगतसिंहांचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची केली घोषणा!
भगतसिंह जन अधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज बंगळुरूमध्ये सुरूवात झाली. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI), दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा आणि मजदूर बिगुल दस्ता यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांद्वारे 10 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे सुरू झालेली ही यात्रा 13 राज्यांतील 80 हून अधिक जिल्ह्यांतून जाईल आणि सुमारे 8,500 किलोमीटरचे अंतर पार करून 3 मार्च रोजी दिल्लीला पोहोचेल.
बंगळुरमध्ये ही यात्रा शिवाजी नगर, एमजी रोड, फ्रीडम पार्क इत्यादी भागांमधून गेली. या दरम्यान ठिकठिकाणी सभा घेण्यात झाल्या आणि फ्रीडम पार्क येथे जाहीर सभा घेऊन यात्रा पुढे रवाना झाली.
नौजवान भारत सभेचे सुप्रीत, भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाच्या साथी शिवानी यांच्यासह श्रीहर्षा, सुजन, जेपी इत्यादींनी सभांना संबोधित केले व मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक यात्रेमध्ये सहभागी झाले.

Related posts

Leave a Comment

one × one =