भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला.

विद्यार्थी व तरुणांना समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठीच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आज भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. भगतसिंहाने विद्यार्थी आणि तरुणांना आवाहन केले होते की त्यांनी क्रांती चा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायला हवा. हे लक्षात घेऊन नौजवान भारत सभेचे सदस्य भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे समाज परिवर्तनाचे मूळ विचार युवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मानखुर्द गोवंडी च्या भागात सातत्याने क्रांतिकारी साहित्य असलेल्या पुस्तकांचा स्टॉल लावतात. आजवर आपल्या देशातील सरकारने आणि प्रसारमाध्यमांनी भगतसिहांच्या वास्तविक आदर्शांपासून सामान्य जनतेला अनभिज्ञ ठेवण्यासाठी एकतर मौन बाळगण्याचे किंवा त्यांच्या कार्याचे चुकीचे चित्रण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आपल्याला कळूनच दिले जात नाही की भगतसिंह एका शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघत होते. त्यांनी सांगितले होते की आपल्या देशातून इंग्रज जातील आणि त्यांची जागा भारतीय भांडवलदार घेतील व सामान्य जनतेचे शोषण चालूच राहील. त्यांचे हे विचार आजच्या युवकांपर्यंत पोहचू दिले जात नाहीत. म्हणून शहिदांच्या स्वप्नातील समतामूलक समाजाचा जिथे गरीब-श्रीमंतांमधील, जाती-धर्मातील भेदभाव नष्ट झाला असेल, प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे. स्टॉलवर येणाऱ्या विद्यार्थी व युवकांना नौजवान भारत सभेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे पत्रक देण्यात आली. त्यांना शहीद भगतसिंह पुस्तकालयाबद्दल सांगण्यात आले आणि नौभास तर्फे परिसरातील विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले गेले. पुढे नौभास तर्फे 23 मार्च रोजी डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात येईल, त्यानंतर फॅसिझम अंतर्गत देशाची सध्याची परिस्थिती आणि भगतसिंहाच्या विचारांची प्रासंगिकता यावर चर्चा केली जाईल. आपण नौभासच्या कार्यक्रमांमध्ये सामील व्हा तसेच शक्य तो अधिकतम आर्थिक सहयोग करा! आर्थिक सहयोग देण्यासाठी तपशील- Account Details AVINASH KUMAR STATE BANK OF INDIA. A/C NO. – 33887284635 IFSC CODE – sbin0016612 Google pay/Phone pay: 8826265960 नौभास चे सदस्य किंवा स्वयंसेवक होण्यासाठी – संपर्क: 7667230795 भगतसिंहांचा मार्ग, इंकलाबचा मार्ग!! इंकलाब जिंदाबाद!!

Related posts

Leave a Comment

eighteen − nine =