Author: nbs_upload
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त (3 जानेवारी 1831)
सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी…
मुम्बई इकाई में नए साथियों को सदस्यता दी गयी
नौजवान भारत सभा द्वारा चलाए जा रहे देशव्यापी सदस्यता अभियान के तहत 23 दिसम्बर को नौभास की मुम्बई इकाई में नए साथियों को सदस्यता दी गयी। साथ ही पूर्व सदस्यों ने अपनी सदस्यता फिर से ली। नए साथियों ने, जो नौभास की गतिविधियों में शामिल होते रहे हैं, अपनी पहलकदमी और संकल्प को आगे बढ़ाते हुए नौभास की सदस्यता ली और क्रान्तिकारियों के विचारों को लोगों तक ले जाने और उनके सपनों के समाज को हकीकत में बदलने के लिए स्वयं को प्रतिबद्ध किया। नौजवान भारत सभा भगत सिंह और…
काकोरी ऍक्शन मधील क्रांतिकारकांच्या शहादत दिनानिमित्त मुंबईच्या मानखुर्द – गोवंडी भागात पोस्टरिंग
आज फॅशिस्ट ताकती देशभरात सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच संभळपासून अजमेरपर्यंत मंदिर-मशिदीचे राजकारण करत, भाजप आणि संघ परिवार जनतेला त्यांच्या खऱ्या मुद्द्यांपासून दूर भटकवण्याचे काम करत आहेत. या प्रतिक्रियावादी शक्ती समाजाला द्वेष आणि रक्तपाताच्या दलदलीत ढकलण्याचा कट रचत आहेत. मानखुर्द मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशचा झेंडा बनवून धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा काळात जनतेची एकी मजबूत करणे हा अत्यंत महत्त्वाचा कार्यभार बनला आहे, जेणेकरून आपण आपले खरे मुद्दे म्हणजेच शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आवास यावर एकत्र येऊन त्यांना साध्य करण्याच्या लढ्याला पुढे घेऊन…
काकोरी ऐक्शन के शहीदों के 97वें शहादत दिवस पर पर्चा
बेरोजगारीचे संकट अधिकाधिक गडद होत असताना कामगारांना युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये रोजगाराच्या संधी शोधण्यास भाग पाडले जात आहे
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष सुरू असतानाही हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतीय राज्यांमध्ये इस्रायलमध्ये नोकऱ्यांसाठी जाऊ इच्छिणाऱ्या कुशल कामगारांच्या लांब रांगा दिसल्या. प्रत्येक राज्याने सुतार, लोहार, टाईल बसविणारे आणि प्लास्टर करणारे अशा 10,000 हून अधिक काम करणाऱ्यांसाठी जागा जाहीर केल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील 28,237 हून अधिक कामगारांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला ज्यापैकी 1,069 कामगार इस्रायलमधील पदांसाठी नियुक्त केले गेले आहेत. इस्रायलमध्ये उच्च पगाराच्या ‘ब्लू कॉलर’ नोकऱ्या देऊ ह्या आश्वासनामुळे उत्तर प्रदेशातील शेकडो मजूर लखनऊमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेर (ITI) रांग लावून उभे आहेत. वाढत्या बेरोजगारी आणि गगनचुंबी महागाईमुळे आरोग्यसेवा, शिक्षण आणि मूलभूत…
शहीद राजेंद्र नाथ लाहिडी यांना शहादत दिनानिमित्त क्रांतिकारी सलाम
हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे सदस्य आणि काकोरी ऍक्शन मधील शहीद राजेंद्र नाथ लाहिडी (29 जून 1901 – 17 डिसेंबर 1927) ह्यांना त्यांच्या शहादत दिनानिमित्त आमचा क्रांतिकारी सलाम
मंदिर-मशिदीच्या नावावर खोटे संघर्ष उभे करून जनतेला दंगे करणाऱ्या गर्दीत रूपांतरित करण्याच्या संघी षडयंत्राला बळी पडू नका!!
काही वर्षांपासून मशीदीच्या खाली मंदिरे “सापडण्याच्या” घटनांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. या घटनांचा धार्मिक आस्थेशी काहीही संबंध नाही. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जनतेला दंगलींच्या आगीमध्ये ढकलणे! भाजपा आणि संघ परिवाराचा एकंदरीत हिंदू लोकसंख्येच्या हिताशी काहीही संबंध नाही. त्यांचं एकच काम आहे आणि ते म्हणजे बहुसंख्यक गरीब हिंदू लोकांचे लक्ष त्यांच्या बिकट जीवनापासून हटवून, अल्पसंख्यक मुस्लिम समुदायाला त्यांचा शत्रू म्हणून दाखवणे! धर्माच्या नावावर लढणारी जनता आपलं जीवन नरक बनवणाऱ्या या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढू शकत नाही. जनतेला एकमेकांशी लढवून भांडवलदारांची सेवा करणं हा भाजपच्या फॅशिस्ट राजकारणाचा सार आहे. फॅशिस्टांना त्यांच्या…
नौजवान भारत सभेतर्फे स्त्री मुक्तीचे पक्षधर आणि जाती-अंताचे योद्धे, ज्योतिराव फुलेंच्या स्मृतीदिनी क्रांतिकारी अभिवादन!
तब्बल 175 वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा उघडण्याचा निर्णय ज्योतिराव फुलेंनी घेतला होता. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशोपन थांबविण्यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन, मुलींना शिक्षण अशा एक ना अनेक गोष्टींतून ज्योतिराव-सावित्रीबाईंचा स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा दृष्टीकोन समोर येतो. स्त्री मुक्ती व जाती उच्चाटनाच्या ह्या दोन्ही ही संघर्षांमध्ये फुले दांपत्यानी महत्वाचे योगदान दिलेले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकारकडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्ध साधनांसहीत त्यांनी आपल्या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांबाबतही फुले शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्हणून चिन्हीत करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्या आणि…
स्वातंत्र्यलढ्यातील शूर योद्ध्या आणि क्रांतिकारी पक्ष ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ च्या नेत्या दुर्गावती वोहरा यांना इंकलाबी सलाम
साँडर्स हत्या प्रकरणानंतर भगतसिंहाला पोलिस आणि गुप्तचरांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यात दुर्गा भाभींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या क्रांतिकारी चळवळीच्या खंबीर समर्थक दुर्गा भाभी या भगवती चरण वोहरा यांच्या साथीदार होत्या. भगवती चरण वोहरा बॉम्बस्फोटात शहीद झाल्यानंतरही त्या क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभागी राहिल्या. दुर्गा भाभी यांनी सार्वजनिक संघर्षात अनेक वेळेस अत्याचार सहन केले आणि अनेक वेळेस तुरुंगावास ही भोगला पण त्या कधीच मागे सरल्या नाहीत! शहीदांचे जे स्वप्न अपुरे, याच शतकात होतील पुरे! याच शतकात नव्या वेगाने परिवर्तनाची लहर उठेल!! – नौजवान भारत सभा
